मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २७ मार्च || Dinvishesh 27 March ||


जन्म

१. रेणुका शहाणे, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६५)
२. विल्हेल्म रोंटगेन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८४५)
३. सटो ऐसाकु, नोबेल पारितोषिक विजेते जापनीज पंतप्रधान (१९०१)
४. जेम्स कॉलाघान, ब्रिटीश पंतप्रधान (१९१२)
५. चार्ल्स हेन्री प्लुंब, युरोपियन पार्लमेंटचे अध्यक्ष (१९२५)
६. इवन गस्पर्विकिक, स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष (१९४१)
७. राम चरण, दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९८५)
८. कार्ल बार्क्स, डोनाल्ड डक कार्टूनचे चित्रकार (१९०१)
९. अखिल कुमार, भारतीय बॉक्सर खेळाडू (१९८१)
१०. टेलर अटलेजन, अमेरिकेन अभिनेत्री (१९९५)

मृत्यु

१. प्रिया राजवंश, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२०००)
२. प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले, साहित्यिक (१९९२)
३. जेम्स देवार, स्कॉटिश भौतिकशास्त्रज्ञ (१९२३)
४. मॅकेल जोसेफ सेवेग, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१९४०)
५. पॉल लॉटरबुर, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (२००७)
६. भार्गवराम आचरेकर, गायक (१९९७)
७. सर सय्यद अहमद खान, भारतीय समाजसुधारक (१८९८)
८. पॉल झिंडेल, अमेरिकेन लेखक (२००३)
९. अल्बर्ट ड्राच, लेखक (१९९५)
१०. काईचिरो टोयोटा, टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक (१९५२)

घटना

१. अब्राहम गेंसेर यांनी रॉकेलचे पेटंट केले. (१८५५)
२. अँड्र्यू रँकिंग यांनी लघवीच्या भांड्याचे पेटंट केले. (१८५६)
३. मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार पंडीत भीमसेन जोशी यांना देण्यात आला. (१९९२)
४. सुहरतो हे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९६८)
५. भारताने यशस्वीरित्या लो ऑर्बिटल Satellite ला ballistic missile टेस्ट मध्ये ध्वस्त केले आणि भारत "स्पेस पॉवर" म्हणुन ओळखला जाऊ लागला. (२०१९)
६. अमेरिकन नौदलाची स्थापना करण्यात आली. (१७९४)

महत्त्व

१. जागतिक रंगमंच दिवस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...