मुख्य सामग्रीवर वगळा

आई || कथा भाग ३ || Marathi Katha ||




भाग ३

शीतल लांबुनच सर्वांना पाहताना थोडी आपल्याच विश्वात हरवून गेली. तिचे बाबा तिच्या जवळ केव्हा आले हे तिला कळलं ही नाही. 
" थोड बोलायचं होत तुझ्याशी शीतल !! शीतल !!"
शीतल भानावर आली आणि बाबांना म्हणाली.
"बोला ना बाबा !!
"डॉक्टर पाठक यांना भेटलीस ना ??त्यांनी मला सगळं काही सांगितलं !! तुला मी याबद्दल बोलणार त्यापूर्वी तुझ्या सासूबाईंचा फोन आला आणि माझं बोलणं राहून गेलं."
"बाबा ते ! मी .. मी!! "
"काही बोलू नकोस शीतल !! Abortion साठी गेलीस तू त्यांच्याकडे !! माहितेय ना तुला तो कायद्याने गुन्हा आहे ते !!  अस करता नाही येत ते बाळा !! डॉक्टर पाठक  माझे चांगले मित्र आहेत त्यांनी तुझी कशीतरी समजूत काढून तुला घालवून दिल. त्यांनाही हे अनपेक्षित होत !! "
"पण बाबा मला त्यावेळी काहीच सुचलं नाही !! माझ्या आयुष्यात हा असा अचानक कोणता खड्डा येईल असं मला कधी वाटलं ही नव्हतं !! "
"खड्डा ?? आयुष्यातल्या एवढ्या सुंदर गोष्टीला तू खड्डा म्हणतेय!!! त्यांना विचार शीतल दुःख म्हणजे काय असतं जे वर्षानुवर्षे आपल्याला मुल व्हावं !! तिन आई व्हावं, त्याने बाबा व्हावं म्हणून वाट पाहतात !! खूप सुंदर गोष्ट आहे ही बाळा !! "
"बाबा !! पण माझ्या करिअरच काय ?? "
" कित्येक स्त्रिया आज आपला संसार सांभाळून करतातच ना करिअर !!"
शीतल गप्प राहिली तिला पुढे काय बोलावं काहीच कळलं नाही. बाबा मात्र तिला बोलत राहिले.
"डॉ पाठक माझे चांगले मित्र आहेत म्हणून मला हे कळलं !! "
"चुकले बाबा !!"
"तू माझी माफी मागावी यासाठी मी बोलत नाहीये हे !! तू आपली जबाबदारी ओळखावी यासाठी बोलतोय मी !! तू एकुलती एक मुलगी आमची , तुझं चांगलं व्हावं एवढच मला वाटत !! बरं चल आता सगळ्यांना बोल तिथे जाऊन !!"

शीतल आणि तिचे बाबा पुन्हा सर्वात येऊन बसले. शीतल हळुच समीर जवळ येऊन बसली. तिच्यातील बदल समीरला लगेच कळाला. ते छोटे कुटुंब कित्येक वेळ गप्पा मारत बसले. शीतल आता आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी घेऊ लागली. समीर ,सासूबाई ,सासरे सारे तिला पाहिजे ते हवं ते देऊ लागले. त्या सुखी संसारात कोणीतरी नवीन येणार या आनंदाने ते सारे खूष होऊ लागले. आज्जी आजोबा आपल्या नातवासाठी नाव शोधू लागले. समीर आता पहिल्यापेक्षा शीतलची जास्त काळजी घेऊ लागला. समीरला आता दुसरे जग जणू दिसेनासे झाले. 

सहा महिन्या नंतर,

पाहता पाहता दिवसा मागून दिवस जाऊ लागले. पोटातले बाळ आता हळूहळू आकार घेऊ लागले.आणि अखेर या जगात येण्यासाठी जणू तेही आतुर झाले. शीतल बाळंतपणासाठी डॉक्टर पाठक यांच्या हॉस्पिटल मध्ये दाखल झाली. 

"समीर ,पाहता पाहता दिवस कसे गेले कळल नाही !!"
"होना !!" समीर शीतलच्या जवळ बसून बोलत होता. 
"डॉक्टर पाठकानी तारीख उद्याची दिली आहे !! उद्या तुझ्या आणि माझ्यामध्ये अजून कोणीतरी असेल !! आपलं " समीर बोलत राहिला.
" सगळं कसं भरून जाईल हे घर !! होना !! आणि मग आपण दोघं मिळून त्याला मोठ करू , त्याच्यावर संस्कार करू , त्याला बोलायला शिकवू !!"
"आपण ??"शीतल मध्येच बोलली.
"हो मग !! अजून कोण ??"
"तू !! मी फक्त जन्म देणार बाळाला !! बाकी सांभाळायचं वैगेरे तुझ्याकडे !!"
" बरं बरं !! करिअर ना !! " 
"हो !!" 

शीतल आणि समीर कित्येक वेळ बोलत बसले. शीतल नकळत येणाऱ्या बाळासाठी आपल्या मनाची समजूत काढत होती. एका बाजूने तिला मुक्त फिरायच होत, जिथे तिला आपल्या शिवाय दुसरं कोणी नको होत पण आता दुसर मन तिच्यातील आईपण जागे करत होत. पण नकळत ती त्याला गप्प करत होती. त्या आईपणाला नाकारत होती. 

"समीर !!" मध्यरात्री शीतल जोरात ओरडली. तिला असह्य होणाऱ्या कळा सुरू झाल्या होत्या. 
शीतलच्या आवाजाने समीर जागा झाला. त्याला शीतलला काय होतंय हे कळायला वेळ लागला नाही. तो पटकन जागेवरून उठला बाहेर आई बाबा , शीतलचे आई बाबा यांना शीतलला त्रास सुरू झाल्याचे सांगत तो थेट नर्सकडे गेला. हॉस्पिटल स्टाफ लगेच धावत शीतलला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले. सारे बाहेर बसून शीतल आणि मुलाच्या सुखरूप असण्याची प्रार्थना करू लागली. 

कित्येक वेळ शीतल त्या असह्य वेदना सहन करत होती. आपल्या आयुष्यात कोणीतरी येणार आहे यासाठी सार काही सहन करत होती. त्या असह्य वेदना आणि बाजूला तिला धीर देण्यासाठी थांबलेला समीर तिला क्षणभर खूप काही सांगत होते. शीतल तू एकटी नाहीयेस , ते येणारं बाळही तुला नकळत बोलत असेल ना !!, शीतलला जणू सगळं जग आपल्या जवळ थांबलं आहे असेच वाटू लागले होते. 


आणि अचानक त्या लहान बाळाचे रडू ऐकू आले. शीतलने त्या बाळाकडे पाहीले आणि शांत झाली. त्या बाळाला पाहताच ती जणू त्या वेदना विसरून गेली. समीर तिच्याकडे हसून पाहू लागला. शीतलही समीरकडे पाहून हसली. त्या साऱ्या वेदना विसरू ती हसली. समीरने बाळाकडे पाहिले. तो धावत बाहेर आला आणि सर्वांना सांगू लागला. आई बाबा मुलगी झाली !! मी बाबा झाली.!! समीरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आई बाबा एकमेकांना आनंदाने सांगू लागले. शीतलचे आई बाबा समीरच्या या आनंदाला पाहून अजून आनंदून जाऊ लागले. 

"समीर !! " डॉक्टर पाठकानी समीरला बोलावले. 
"बोला डॉक्टर !!" 
"थोड्याच वेळात शीतलला तिच्या रूममध्ये घेऊन येतील तुम्ही तिथेच वाट पाहिली तरी चालेल !!"
"ओके डॉक्टर !!"

समीर , आई बाबा , शीतलच आई बाबा शीतल आणि बाळ दोघांचीही आतुरतेने वाट पाहू लागले. 

क्रमशः 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...