मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ४ डिसेंबर || Dinvishesh 4 December ||




जन्म

१. अजित आगरकर, भारतीय क्रिकेटपटू (१९७७)
२. फ्रान्सिस्को फ्रँको, स्पेनचा हुकूमशहा (१८९२)
३. जावेद जाफरी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६३)
४. इंदर कुमार गुजराल, भारताचे १२वे पंतप्रधान (१९१९)
५. थॉमस करलील, स्कॉटिश इतिहासकार (१७९५)
६. जुल्स डफौर, फ्रान्सचे पंतप्रधान (१७९८)
७. रामास्वामी वेंकटरमण, भारताचे ८वे राष्ट्रपती (१९१०)
८. सॅम्युएल बटलर, इंग्लिश लेखक (१८३५)
९. बलवंत गार्गी, भारतीय थिएटर आर्टिस्ट (१९१६)
१०. शेर सिंघ, शीख साम्राज्याचे ४थे महाराजा (१८०७)
११. मोतीलाल राजवंश, भारतीय चित्रपट अभिनेते (१९१०)
१२. एमिल्लो मेदिकी, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९०५)
१३. रोह तै वू, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९३२)
१४. शॉन कार्टर, जे झी, अमेरिकन रॅपर (१९६९)


मृत्यू

१. पुरुषोत्तम नागेश ओक, भारतीय इतिहास संशोधक (२००७)
२. थॉमस हॉब्स, इंग्लिश तत्ववेत्ता (१६७९)
३. ज. ड. गोंधळेकर, भारतीय चित्रकार (१९८१)
४. विल्यम स्टर्जन, विद्युत मोटरचे संशोधक (१८५०)
५. हाना आरेंट, जर्मन तत्वज्ञ (१९७५)
६. रॉबर्ट जेंकिन्सन, इंग्लंडचे पंतप्रधान (१८२८)
७. चार्ल्स रीचेट, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रिया वैज्ञानिक (१९३५)
८. थॉमस मॉर्गन , नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (१९४५)
९. फ्रांसिस्को कॉर्नीरो, पोर्तुगालचे पंतप्रधान (१९८०)
१०. व्ही. आर. कृष्ण अय्यर, भारतीय वकील, न्यायाधीश (२०१४)
११. अली अब्दुल्ला सालेह, यमनचे राष्ट्राध्यक्ष (२०१७)


घटना

१. भारताचे लष्करप्रमुख म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक करण्यात आली. (१९४८)
२. लॉस एंजेलिस टाईम्स वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. (१८८१)
३. भारत पाकिस्तान तिसऱ्या युद्धात ऑपरेशन ट्रायडेंट भारतीय आरमाराने कराचीवर हल्ला केला. (१९७१)
४. जेम्स मॉनरोई हे अमेरिकेचे ५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१८१६)
५. गेट वे ऑफ इंडियाचे व्हाईसरॉय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. (१९२४)
६. जेम्स क्नाॅक्स पॉल्क हे अमेरिकेचे ११वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१८४४)
७. न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (२०१६)
८. द ऑब्जर्व्हर हे जगातील पहिले रविवारचे वृत्तपत्र प्रकाशित झाले. (१७९१)

महत्व

१. World Wildlife Conservation Day
२. International Cheetah Day
३. World Pear Day
४. Globa Fat Bike Day
५. Wear Brown Shoes Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...