मुख्य सामग्रीवर वगळा

आई || कथा भाग २ || Marathi Katha ||




भाग २

दरवाज्याची बेल वाजते नी शीतल पटकन दरवाजा उघडायला जाते, दरवाजा उघडताच समीर तिला समोर दिसला. त्याला पाहताच ती थोडी चिडल्या स्वरातच बोलू लागली.
"काय हे वागणं समीर ??"
समीर फक्त तिच्याकडे पाहत राहिला.  तिला समीरच वागणं जरा वेगळं वाटू लागलं. 
"दारू पिऊन आलायस समीर ??"
"हो !! पिऊन आलोय मी दारू !!" समीर दरवाजातून आत येत म्हणाला. 
"बस एवढंच राहील होत आता !! "
"मग काय करू मी आता ?? तू सांग मी काय करू ??" समीर मोठ्या आवाजात बोलला.
समीर चा आवाज ऐकून आई बाबा आपल्या खोलीतून बाहेर आले. बाबांना काय घडतंय हे कळायला वेळ लागला नाही. ते लगेच समीरकडे जात म्हणाले,
"समीर दारू पिऊन आलायस !! लाज कशी वाटत नाही तुला !!  "
"कसली लाज बाबा ?? लाज तर या तुमच्या सुनेला वाटायला हवी ना ?? "
"काय बोलतोयस समीर ?? शुद्धीवर आहेस का तू ?" मध्येच आई समीरला म्हणाली. 
"कशाला राहू शुद्धीवर मी ?? सांग ना ?? मी बाप होणार आहे हे कळूनही मला त्याचा आनंद न होता दुःख होत असेल तर काय करू मी ??"
"काय ?? म्हणजे शीतल ?"
"हो आई मला दिवस गेलेत !!"
" पण मला मुल नकोय !! मला अबोर्शन करायचं आहे !! हे पण सांग !!" 
"समीर !!" शीतल समीरकडे पाहत म्हणाली. 
"सूनबाई काय ऐकतोय मी !! " मध्येच बाबा बोलले. 
"हो बाबा !! मला मुल नकोय !! "
"पण का ??"
"कारण मला यात पडायचं नाहीये !! चूल आणि मूल एवढच करायचं नाहीये मला!! मला मोठं व्हायचं !! काहीतरी करून दाखवायचं आहे !!"
"हो पण तुझं आईपण  यामध्ये येथच कुठे ??" बाबा प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहू लागले. 
"पण मी यामध्ये गुरफटून जाईल !!"
"आम्ही आहोतच ना शीतल !! तुझ्या बाळाची सगळी काळजी आम्ही घेऊ !! आमच्या अंगात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत त्याला आम्ही सांभाळू !! मग तर झालं सगळं !!"
शीतल शांत झाली. समीर बाजूला खुर्चीवर बसून होता त्याला कसलीच शुद्ध राहिली नव्हती. 
"मी विचार करेन आई बाबा !!" शीतल एवढं बोलून आपल्या खोलीत समीरला सावरत घेवून गेली. 

रात्रभर तिच्या डोक्यात फक्त तोच विषय होता. मुलाला जन्म देणं एवढंच तर मला करायचं आहे. नंतर त्याची काळजी घ्यायला आई बाबा , समीर आहेतच .पण मला मात्र ते जवळही नको. मी आणि माझं करिअर यामध्ये त्याची लुडबुड मी काही खपवून घेणार नाही. उद्या काही वाटलच तर समीरकडे सोपवून मी मोकळी होईल. मग समीर जाणो आणि ते आई बाबा. आणि जास्तच बोलले मला तर सरळ म्हणेन मी मुलाचा हट्ट तुमचा होता त्यामुळे त्याला सांभाळायची जबाबदारी तुमची. ठरलं तर मग , आणि असंही आता abortion हा विषय डोक्यातून काढून टाकावा लागेल कारण उद्या सकाळी माझ्या आईला माझ्या pregnancy बद्दल सासूबाई सांगतीलच. आणि असलं काही बोलले तर आई आणि बाबा एक गोष्ट माझी ऐकून घेणार नाहीत. त्यामुळे आता या सर्वांचं ऐकेन मी आणि ऐकदा का मुल झालं की मग यांना माझं ऐकावं लागेल. 

पाहता पाहता सकाळ झाली. समीर आणि शीतलच्या खोलीचा दरवाजा कोणीतरी जोरजोरात वाजवत होत. त्या आवाजाने शीतल जागी झाली. दरवाजा उघडताच समोर सासूबाईंना पाहून चकित झाली. 
"आई !! तुम्ही ??"
"घे !! तुझ्यासाठी नाष्टा घेऊन आली आहे मी !! आता तू एकटी नाहियेस !! त्या बाळाची काळजी सुद्धा घ्यावी लागेल ना आता !! आता फक्त तू नाहीस !! तुम्ही आहात !! कळलं का ??"
शीतल काहीच न बोलता नाष्टा करू लागली. तेवढ्यात मुख्य दरवाजाची बेल वाजली.
" एवढ्या सकाळी कोण आल आता ??" शीतल सासुबाईंकडे पाहत म्हणाली. 
"थांब बघते मी !!"
दरवाजा उघडताच शीतलला आश्चर्याचा धक्काच बसला. तिचे आई बाबा समोर दिसताच ती पटकन जागेवरून उठली. 
"आई !! " शीतलने आईला पाहून मिठीच मारली. 
"तुम्ही दोघे एवढ्या सकाळी इथे ??"
"अग तुझ्या सासूबाईंनी सकाळीच फोन करून आम्हाला आनंदाची बातमी सांगितली. मग म्हटलं कशाला फोन करा , तासाभराचा रस्ता आहे भेटायला यावं !! "
शीतल सासूबाईकडे पाहू लागली.
"मीच बोलावलं आहे त्यांना !!" 
शीतल त्या तिघांकडे पाहत राहिली. लांबुनच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत मनातच विचार करत होती.
"काय एवढं आनंदून जायचं काय कळतं नाहीये मला !! या समीरने सगळा घोळ घालून ठेवलाय नाहीतर आज abortion करून मोकळी झाली असते मी!!! पण आता हा विचार जरी केला तर हे सगळे मला काय रागावतील !! विचारच करवत नाही !!! शीतल बाई व्हा तयार पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी !! "

"शीतल !!  शीतल !! "
शीतल भानावर येत समोर पाहू लागली. समोर सासूबाई तिला हाक मारत होती.
"हो आई !! जा समीरला बाहेर ये म्हणावं !! "
शीतल खोलीत गेली. समीर अजूनही झोपलेला असतो. त्याला जोरजोरात आवाज देत ती उठवू लागली. 

"समीर !! ये समीर !! उठ !! उठ ना!! उठ बघ तुझ्या प्रताप बाहेर जाऊन !! "
समीर हळू हळू जागा झाला. डोळे चोळत तो विचारू लागला.
"काय झालं आता ??"
"काय झालं !!! सांगते ना !! तू जो काल दारू पिऊन गोंधळ घातलाय ना !! त्याचे परिणाम मला आता पुढचे किती दिवस सहन करावे लागतील माहितेय तुला??"
"काय म्हणतेय तू !! कसला गोंधळ ??"
"काल दारू पिऊन का आलास ते सांग मला पहिले ??"
"का म्हणजे माझी मर्जी !!"
"हो ना !! मग माझ्या मर्जी विरूध्द आई बाबांना माझ्या pregnancy बद्दल कशाला बोललास तू ??"
"मला काही आठवत नाही !! "
"जा बाहेर !! बघ बाहेर पार्टी करतायत माझ्या pregnancy ची !! त्यात माझे आई बाबा सुद्धा सामील झाले!! जा !!"
"क्या बात है !! आता तर मला त्या पार्टीत सहभागी झालच पाहिजे !! क्या बात है !!"
समीर मिश्किल हास्य हरकत शीतलकडे पाहत खोलीच्या बाहेर आला. पाहतो तर त्याचे आई बाबा सासू सासरे सगळे मजेत होते. शीतलला मुल होणार हे ऐकून शीतल सोडून बाकी सारे खुश होते. पाहता पाहता तोही त्यांच्यात सामील झाला.

शीतल लांबून हे सारं फक्त पाहत होती.

क्रमशः 

वाचा पुढील भाग : आई || कथा भाग ३ || Marathi Katha ||

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...