"पद्मावती" फिल्मचा विरोध सध्या जोरात चालू आहे. यामध्ये राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. खरंतर फिल्म आणि त्यांचा विरोध ही काही पहिली वेळ नाही. जे चुकीचं दाखवलं असेन किंवा इतिहासाचं विकृतीकर झाल असेन असं वाटतं त्याचा विरोध व्हायलाच पाहिजे. पण हा विरोध फक्त विशिष्ट समाजपुरता नसावा. जर चुकीच्या गोष्टी अस्तीन तर याचा विरोध सर्व स्तरातून व्हावा असं वाटतं. आज राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून ते विरोध करतात पण याच वेळी इतर समाज जर तो फिल्म हिट करत असतील तर विरोध नक्की का झाला असा सर्व बाजूचा विचार होतो. महाराष्ट्रात "दशक्रिया" फिल्म बद्दल ही विरोध चालू आहे. त्यात ब्राह्मणाच्या भावना दुखावल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. खरंतर य दोन्ही गोष्टी हिंदू धर्मातील आहेत पण फरक खूप आहे कोणाला तरी दुखावलं तरच ते विरोध करतीन असं का? जे चुकीचं असेन त्याचा विरोध नक्की व्हावा पण ते आपल्या जातीवर नाहीत ना मग जाऊद्या किंवा हे आपल्या धर्माबद्दल नाहीना मग काय व्हायचं ते होऊ द्या ही भावना खरंतर समाजाने कमी करायला हवी.
मध्यतरी "बाजीराव मस्तानी " ही फिल्म आली. यामध्ये चक्क" राऊ" कादंबरीचा आधार दिला. पण त्याचा आणि या फिल्मचा कुठेच संबंध दिसला नाही. ज्या काशीबाई नी कधीही मस्तानीला पाहिलं नाही त्या दोघी एका गाण्यात नाचत होत्या. हे विकृतिकरन का ? कित्येक अशा इतिहासाचं bollywood ने विकृतीकरण केलं. मनोरंजन म्ह्णजे काहीही दाखवणे होत नाही. आणि हे आता या bollywood नामक industry ला सांगणं गरजेचं आहे. "PK" नामक फिल्म ही अशीच काही विकृत तयार करण्यात आली. पण विरोध जितका जास्त तितकी film हिट होते हे यांचं समीकरणच असावं बहुतेक. काही मुद्दे मांडण्याची एक पध्दत असते. आणि बहुदा हेच यांना जमत नाही. सहसा त्या film मधल्या एखाद्या बड्या star ची image जपण्याच्या नादात हे सारं होत. आणि हे खरं आहे एखादा बडा star जर फिल्म मध्ये असेन तर त्याची image जपण्यासाठी हे काहीही करतात. मोडून तोडून कथानक वापरतात. "बाजीराव पेशव्यां सारखे महान योद्धा यांच्या film मध्ये ते विचित्र नाचताना दाखवतात. मग प्रश्न पडतो की हे आजचे star फिल्म स्टार इतिहासातल्या महान योद्धा पेक्षा मोठे आहेत?? कधीच नाही . मग हा कोणता विचार??
बरं हे झाल फिल्म आणि त्यांच्या मांडणी बद्दल पण यांची बाहेरील वक्तव्ह्य ही काय ? काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर नामक एका जुन्या कलाकाराने twitter वरून स्वतःचे POK बद्दल मत कळवले! याची गरजच काय हे कळत नाही. बरं यांना कोणी विचारलं होत का? मग कशाला नसती उठाठेव !! आणि खरंच या bollywood ला वेड लागलंय अस म्हणाव लागेन. वेळोवेळी यांचं पाकिस्तान बद्दलच प्रेम हे का दाखवतात तेच कळतं नाही. अस असेन तर यांनी तिकडेच जाऊन राहावं. मध्यतरी एका राजकीय नेत्यांनी म्हटले ते अगदी बरोबर आहे की यांनी ज्या गोष्टी बद्दल माहीत नसेल तिथे बोलूच नये. आणि ते खरं ही आहे. याचा अर्थ असा नाही की मी कोणत्या राजकीय पक्षांच समर्थन करतोय. पण त्यांचं हे मत पटण्या सारखं आहे. आणि आजची पिढी या film star ना वाजवी पेक्षा जास्त महत्त्व देते आहे हे बाकी खर.
आजचे bollywood film इतिहासाचे विकृतीकरण करतेय, माफिया , गुंड लोक यांवर फिल्म काढून यांना star करतेय, आजचा तरुणाईला मायाभाई आवडतो , सुलतान मिर्झा आवडतो तुम्ही म्हणाल यात यांचा काय दोष, पण महत्त्व यांनीच वाढवलं ना? मग film ही फक्त मनोरंजन म्हणून कशी पहायची ? "Shootout at lokhandwala " पहिल्या नंतर मुलांच्या डोक्यात आजही मायाभाई तसाच आहे. मग हे इतिहास विषयक फिल्म फक्त मनोरंजन म्हणून कसे पाहायचे? बहुदा याच उत्तर bollywood वाले देतील असे वाटत नाही. त्यामुळे bollywood वाल्यांनी नक्कीच विचार करावा की आपलं खरंच काही चुकत तर नाहीना..!! आणि कळलच तर सुधारणा करावी...!!
-योगेश खजानदार
"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply