का छळतो हा एकांत
मनातील वादळास
भितींवरती लटकलेल्या
आठवणीतल्या चित्रात
बोलतही नाही शब्द
खुप काही सांगते
ऐकतही नाही काही
सगळं मात्र बोलते
भिंतीही हसतात
छप्पर ही साथ सोडतेय
एकांतातल्या मला
घर ही नको म्हणतेय
मी जाऊ तरी कुठे
आपलस कोण म्हणतेय
मी बोलवु कोणाला
माझ कोण दिसते
का छळतो हा एकांत
एकटा मी जगतोय
भितींवरती लटकलेल्या
आठवणीतल्या चित्रात
- yogiii
नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे, कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण, नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply