मुख्य सामग्रीवर वगळा

बंगला नंबर २२ || कथा भाग ८ || शोध || मराठी भयकथा ||




कथा भाग ८ || शोध ||

श्रीधर केबिनमध्ये येताच आपलं काम करत बसतो. थोड्या वेळाने आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही हे पाहून तो लॅपटॉप मध्ये ऑफिसमधील सर्व कर्मचाऱ्यांचा डेटा चेक करू लागतो. दोन तीन वेळा त्याने मंदार केळकर नावाने जुना डेटा काढण्याचा प्रयत्न केला तरी त्याला अश्या नावाचा कोणी कर्मचारी नव्हताच हे दिसून येत होत. पुन्हा पुन्हा तो चेक करत होता पण उत्तर काही बदलत नव्हतं. शेवटी न राहून तो ऑफिसमधील जुन्या एका कर्मचाऱ्याला विचारतो.
"पंडित , आपल्या ऑफिसचा कर्मचाऱ्याचा डेटा कुठे आहे ??"
"तो आहे की लॅपटॉप मध्ये!!"
"तो नाही !! जुना !! कारण नव्यात खूप एरर्स आहेत !! ते नीट करावे लागतील !!"
"ऑफिसच्या खाली अडगळीच्या खोल्या आहेत त्यात असतील !!त्याची चावी मात्र साहेबांच्या केबिन मध्ये असते !!"
"ठीक आहे पाहतो मी !! "
श्रीधर हळू हळू देशमुख साहेबाच्या केबिनमध्ये जाऊ लागतो. पण त्याला समोर बघून तो क्षणभर थांबतो. दुसरीकडे पाहू लागतो. थोड्या वेळाने साहेब केबिन मधुन बाहेर जातो. श्रीधर सर्वांची नजर चुकवून आत जातो. सगळीकडे शोधाशोध करू लागतो. पण काही केल्या त्याला चावी भेटत नाही. शेवटी टेबलच्या खाली एका कोपऱ्यात त्याला चावीच बंडल भेटत. 
"बहुतेक यातच असणार ती चावी !! "
हळूच खिशात बंडल ठेवत तो बाहेर येत असतो. तेवढ्यात त्याला समोर देशमुख साहेब भेटतो. 
"श्रीधर ?? माझ्या केबिनमध्ये ??"
"ते !! ते !! काही फाईल्स ठेवल्या होत्या इथे त्याच घ्यायला आलो होतो.!! "
"मग कुठे आहेत फाईल्स??" श्रीधरच्या रिकाम्या हाताकडे बघत देशमुख म्हणाला.
"जी पाहिजे होती ती नाही मिळाली !! बहुतेक जगतापांकडे असेल !!"
"बरं बर !! भेटले का मग जगताप ??"
"नाही ना !! सकाळपासून त्याची भेटच नाही !! आणि फोनही लागत नाहीये !! "
"मला भेटले की सांगतो मी त्यांना तुम्हाला भेटायला !!"
"ठीक आहे साहेब !!"

श्रीधर चावी घेऊन खाली खोलीत येतो. समोर त्याला दहा बारा खोल्या बंद असलेल्या दिसल्या. त्यातली प्रत्येक खोली तो अथक प्रयत्न करून उघडतो. त्यातील पाच सहा खोल्या तर रिकाम्याच होत्या. शेवटी एका खोलीत त्याला भरपूर रद्दी झालेले कागद दिसू लागतात. हळूच त्या खोलीत तो जातो.एक एक डाटा चेक करतो. खूप वेळ प्रयत्न केल्यावर त्याला जुन्या कर्मचाऱ्याचा डेटा मिळतो. जुने रजिस्टर बुक पाहतो. त्यात मंदार केळकरच नाव शोधतो. 
"असणार यात नक्की असणार !! त्याच नाव !! मंदार !! मंदार !! मंदार केळकर!! हे सापडलं !!" श्रीधर रजिस्टर मध्ये बघत म्हणतो.
थोडा वेळ वाचतो. 
"यात १७३ सोहम सुभेदार आहे !! आणि १७४ मंदार केळकर !" मंदार तिथे लावलेला मंदारचा! फोटो क्षणभर पाहत राहतो . आणि म्हणतो,
 "पण या पुढच्या महिन्याच्या बुकमध्ये त्याच नावच नाहीये !! मंदार केळकरच नाव एका महिन्यात या बुक मधुन गायब झालं. पण या दुसऱ्या बुक मध्ये कर्मचारी कोणत्या कामा निमित्त बाहेर गेलेत ते लिहिलं आहे !! यात मंदार केळकर १८ जुलैला मात्रो कंपनीला विजीट द्यायला गेले ते शेवटचं !! त्यानंतर या पुढच्या कुठल्याच रजिस्टर बुक मध्ये केळकरच नाव नाही. म्हणजे त्या मात्रो कंपनी मध्येच काहितरी गुड आहे!! शोधायला हवं !! "
श्रीधर खोलीतून बाहेर पडतो. चाविच बंडल तिथेच फेकून देतो.  धावत धावत आपल्या केबिनमध्ये येतो. सुहासला फोन करून सगळं सांगतो. तिथे काय परिस्थिती आहे हे जाणून घेतो. 
"मला वाटतं तू याबद्दल श्यामला विचार त्याला नक्की याबद्दल माहीत असणार !! "सुहास फोनवर श्रीधरला सांगतो. 
"आहे तो तिथे ??"
"हो माझ्या जवळच थांबलाय ! बोल त्याला!! "
सुहास फोन श्यामकडे देत म्हणतो. 
"हा साहेब ??"
"श्याम !! तुला मात्रो कंपनी विषयी काही माहीत आहे का रे ??"
"हो साहेब !! आपल्या साहेबांची आहे ती कंपनी !! पण खूप वर्षांपूर्वी म्हणजे वडील असतानाच बंद पडली ती !! "
"मला दाखवशील कुठे आहे ती ??"
"हो !! "
"मी आलो लगेच मग !! आपल्याकडे वेळ खूप कमी आहे !!"
"ठीक आहे साहेब !!"

श्याम असे म्हणताच मागे दरवाजा जोरात आदळला जातो. जगताप पूर्ण ताकदीनिशी खोलितून बाहेर पळत जातो. श्याम आणि सुहास त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात पण दोघेही अपयशी ठरतात. जगताप धावत धावत बंगल्यातून पळत बाहेर पडतो. दोन्ही हात रक्तबंबाळ झालेले तो तशेच घेऊन जिवाच्या आकांताने पळत सुटतो. 

इकडे मात्र श्रीधर फोन ठेवून विचार करत बसतो. थोडा वेळ विचार झाल्यावर तो साहेबांकडे जातो. आणि घरी जाण्याची परवानगी मागतो. 
"का रे ?? असे अचानक ??"
"सायलीला बर वाटत नाहीये !!"
"काय झालं तिला ??"
"माहीत नाही !! पण प्रिया म्हणाली तिला हॉस्पिटल मध्ये न्ह्यावं लागेल. "
"ठीक आहे!! जा तू !!"

श्रीधर लगबगीने बाहेर पडतो. मात्रो कंपनीकडे निघून जातो. श्रीधर जाताच , मागून जगताप धावत पळत येतो. ऑफिसमध्ये मोठ्यामोठ्याने रडत येतो. त्याला तसे पाहून सगळे अचंबित होतात. पाहू लागतात. देशमुख साहेब पळतच बाहेर येतो.
"साहेब !! " जगताप रडत म्हणतो. 
"काय झालंय दत्तू ?? कोणी केली तुझी अवस्था ही ??"
"तिने केली !! जीव घेतला असता माझा आज तिने !!"
जगताप असे बोलताच. देशमुख त्याला गप्प बसायला सांगतो.  जमलेल्या बाकीच्या कर्मचाऱ्यांना पाहून आपापल्या कामावर जायला सांगतो. जगतापला केबिनमध्ये घेऊन येत म्हणतो.
"कोणी केली अवस्था तुझी ??"
"माया ने !! तिच्या पोराने !! "
"साली रांड !! मेल्यावर सुद्धा हीचा जोर जात नाही तर !!" देशमुख रागाने म्हणतो. 
"त्या श्रीधरला सगळं कळलय साहेब ! त्या मंदार केळकर बद्दल सुद्धा कळलय !!"
"कोणी सांगितलं ?? "
"त्या श्याम आणि त्याच्या बायकोने !! "
"भाडकाव!! साला बापा सारखाच दगाबाज निघाला हा पण !!"
"त्या श्रीधरच्या पोरीच्या अंगात जाऊन बसलय ते पोर त्या मायाच !! " 
"एक मिनिट एक मिनिट !!" देशमुख साहेब लॅपटॉप जवळ जात म्हणाला. त्याला श्रीधरचा संशय येतो. 

लॅपटॉप मध्ये त्याने थोडया वेळा पूर्वीचे सीडीटीव्ही फुटेज पाहिले. आणि ते पाहताच तो धावतच खाली अडगळीच्या खोलीकडे गेला. समोर अस्थाव्यस्थ पडलेल्या फाईल्स आणि त्यात मंदार केळकर यांच्या नावाची फाईल समोर पाहून देशमुख रागाने लाल झाला. पुन्हा धावत तो जगताप जवळ आला. जगताप तेव्हा आपल्या झालेल्या जखमामुळे विव्हळत होता. 
"दत्ता !! ये दत्तू ?? आपल्या मात्रो कंपनीत आता कोण आहे का रे ??"
"नाही !! संध्याकाळी तेवढा किसण्या जातो तिथं !! "
"आत्ता जा म्हणावं!! फोन कर किसण्याला फोन कर !! म्हणावं आपली माणसं घेऊन कंपनीत जा !! "
"हा !! "जगताप फोन घेण्याचा प्रयत्न करतो पण काही केल्या त्याचा हात उचलत नाही. त्याला पाहून देशमुख म्हणातो.
"सोड जाऊदे !! मीच लावतो फोन !!" 
खिशातला फोन काढत म्हणाला. 

श्रीधर या पुढच्या येणाऱ्या संकटाला अनभिज्ञ होता. श्यामला घेऊन तो त्या कंपनीत जातो. पाहतो तर त्या कंपनीत खोल्याच खोल्या होत्या. 
"आता कुठ रे शोधायचं ??"
"तुम्ही खालच्या मजल्यांवर शोधा !! मी वरती पाहतो!! " श्याम वर जात म्हणाला.

चारही बाजूने घनदाट झाडी असल्याने त्या कंपनीत दिवसाही अंधार पडला होता. आजूबाजूला म्हणावं अस कोणच नव्हतं. अगदी निर्मनुष्य अश्या जागेवर ती बंद पडकी कंपनी जणू एखादा भुत बंगला वाटत होती.

"या मंदार केळकर विषयी काहीतरी पुरावा मला इथे मिळेल अस वाटतंय खर पण !!" समोर असलेली खोली उघडत श्रीधर म्हणाला. खोली उघडताच पाच सहा वटवाघळे त्याच्या डोक्यावर उडू लागतात. त्यांना तो हाकलून देण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात श्याम मोठ्याने ओरडतो. श्रीधर त्या दिशेने धावत जातो. पाहतो तर समोर हाडांचा सांगाडा खोलीत पडला होता. 
"श्याम !! मंदार केळकरला मारून तर टाकलेलं नसेल ना ??"
"काय सांगत येत नाही याच !! मला पण हेच वाटायला लागलंय !! नक्की त्या मंदार केळकरचाच असणार ह्यो सांगाडा !! "
"आता ??"
"इथच शोधू अजून काय भेटत का ते !! "
"हो चालेल !!शोध !! "

श्रीधर आणि श्याम कित्येक वेळ त्या खोलीच्या आजूबाजूला शोधत राहतात. पण त्यांना तिथे काहीच मिळत नाही. शेवटी दोघेही हतबल होऊन घरी जायला निघतात. तेवढ्यात त्यांना त्या सूनसान जागेत कोणी पुरुष गाणे म्हणत असल्याचा आवाज येतो,
"तुला आवाज येतोय श्याम ??"
"होय साहेब !!"
"या एवढ्या मोठ्या कंपनीत हा कोण असेल बर ??"
"जाऊद्या साहेब !! चला आपण !! नको जायला कुठ !! आपलं घरी जाऊ !! नक्की भुताटकी असणार !! "
"नाही रे !! बघ ना त्याच्या आवाजात किती दुःख जाणवत आहे !! अस वाटत कोणी प्रियकर आपल्या प्रेयसीच्या भेटीसाठी आतुर झाला आहे !! चल ना बघुयात कोण आहे तो ??"
"साहेब !! नको !! नको !! भुताटकी असणार !! उगा माग लागलं आपल्या !! "
"काही होत नाही चल !!"

श्रीधर आणि श्याम हळू हळू चालत चालत त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागतात. तसा तसा तो आवाज अजून मोठा येऊ लागतो. अगदी जवळ येताच श्यामच्या पायाचा आवाज होतो.  आवाजाने ते गान बंद होत. आणि पलीकडे खोलीतून आवाज येतो,
"ये !! ये ! कोणय ?? ये सांग की आज वार कोणता ते तरी सांग !! ये ये !! तू कोण आहेस ??"

आतून जोरात ओरडण्याचा आवाज येतो. श्रीधर धाडसाने त्याच्या समोरचा दरवाजा तोडू लागतो.श्याम मात्र भिऊन मागे थांबतो,

"नको साहेब !! आहो कोणी भुतं असलं हो इथे !! बघा ना किती सुनसान आहे !!" श्याम भीत म्हणाला.
"श्याम !! मलाही आता त्या भुताला भेटायचं आहे !! " श्रीधर जोरात एक दगड त्या दरवाज्यावर घालतो.
"ये !! मला घेऊन जायला आला तू ?? मला घेऊन जाणार ?? मला ???" आतून मोठ्याने हसण्याचा आवाज आला. 

श्रीधर आणि नंतर श्यामने मिळून दरवाजा तोडला. समोरच चित्र पाहून दोघेही स्तब्ध झाले. काय बोलावं त्यांना काहीच कला नाही,

" मला !! मला मला घेऊन जाणार तुम्ही ??"
समोर कोणी एक दाढी वाढलेला, केस पांढरे झालेला, म्हातारा पडून होता,. या दोघांना पाहून तो हाताच्या बळावर पुढे येण्याचा प्रयत्न करू लागला, दोघेही मागे मागे सरकू लागले. 
श्रीधर शांत होता. तो पुसटस बोलला
"मंदार केळकर ??"
"हो हो !! मीच मंदार केळकर !! मीच मंदार केळकर !!"

क्रमशः 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...