विरुद्ध.. ✍(कथा भाग २)

"मला कधी या प्रियाच काही कळलंच नाही !! इतक्यात ती मला माफी मागून गेली आणि लगेच अनोळखी असल्या सारखे मला काहीच न बोलता निघून गेली !! खरंच मी कधी ओळखु शकत नाही तिला !! पण नक्की ती काय शोधतेय ते सांगेन तर ना !! " सुहास कित्येक विचार मनातच बोलत होता.
"ती शोधत तरी काय होती बरं ?? " सुहासला त्या कागदाची आठवण झाली. तो पटकन स्वयंपाक घरात गेला. समोरच तो कागद होता. त्याकडे पाहून सुहास विचार करू लागला.
"प्रियाला नक्की हाच कागद हवा आहे का !! हा कागद मला प्रिया काल जिथे पडली तिथेच मिळाला होता !! बघुयात तरी !!" सुहास कागद उचलून तो वाचू लागला.
"प्रिया .. मला माहितेय तुझ माझ्यावर खुप प्रेम आहे !! तुझ्या वडिलांच्या हट्टामुळे तुला त्या सुहास सोबत लग्न करावं लागलं ते !! पण तू आजही परत येऊ शकतेस !! तुला माहितेय मी तुझ्या नवऱ्या इतका श्रीमंत नाहीये!!पण तरीही मी तुला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन !! तुझ्या पोटात वाढणार बाळ आपलंच आहे !! आणि त्याबद्दल तू तुझ्या नवऱ्याला काहीच बोलू नकोस !! फक्त अजून काही दिवस, आपलं काम झाल की तू माझ्याकडे निघून ये !!! .... तुझाच .. विशाल ..." सुहास पत्र वाचून सुन्न झाला. त्याला काय बोलावं तेच कळेना. एकटक त्या पत्राकडे तो पाहत बसला.
  "वेडी आशा लावून बसलो होतो मी !! आज नाहीतर उद्या कधीतरी प्रिया माझी होईल!! ती जुनं सार विसरून मला आपलंसं करेल !! पण नाही !! सार काही संपलय आता!! ज्या व्यक्तीला आपलं कधी व्हायचं नाही !! ज्याला आपल्या अश्रूंची साधी कवडी किंमत ही नाही अशा व्यक्तीला का माफ करायचं मी!!! नाही!!! आता उठतो नी माझ्या आयुष्यातून हाकलून देतो तिला..!! पण तिला पहिल्यांदा पाहिलं होत तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो ना!! त्याच काय !! नाही नाही !!!!! नाही!! बस्स्.!!! " डोळ्यातून ओघळणाऱ्या प्रत्येक अश्रुला खूप काही बोलायच होत.पण तरीही सुहास शांत होता..
"सुहास !! " बाहेरून प्रिया सुहासला बोलावत होती.सुहास स्वतः ला सावरत बाहेर गेला.
"काय ??" सुहास प्रिया जवळ जात म्हणाला.
"माझा एक महत्त्वाचा कागद मिळत नाहीये !! तू पाहिलास का??"
सुहास त्याला काहीच माहीत नसल्याचे भाव करत.
"नाही पाहिला!! काय एवढं महत्त्वाचं होत !!"
"अरे विशेष काही नाही !!"  एवढ बोलून प्रिया निघून गेली.
  प्रियाने सगळी खोली शोधली पण तिला विशालने लिहिलेले पत्र कुठेच मिळाले नाही. ती हताश होऊन मनात कित्येक विचार करू लागली. तिला ती चिठ्ठी सुहास वाचेल याची भीती वाटू लागली.
" विशाल माझ्यावर किती प्रेम करतो !! आजही त्याला भेटल्यावर सार जग कुशीत घेतल्या सारखं वाटतं!! पण हा सुहास आमच्या मध्ये कधी आला कळलंच नाही!! हा माझा आयुष्याचा जोडीदार फक्त समाजाला दाखवण्या पुरताच आहे !! पण खर माझं प्रेम माझा विशालचं आहे !! एकदा का काम झाल की मी, विशाल आणि आमचं बाळ !! एवढचं जग असेल आमचं !! या सुहासची सावलीही नको मला पुन्हा!! " तेवढ्यात दरवाजा वाजला आणि प्रिया सावध झाली.
"प्रिया !! तुला कोणीतरी भेटायला आले आहेत !!" सुहास दरवाजातून म्हणाला.
"आता यावेळी कोण आल आहे अजून !!" प्रिया सुहासला पाहत म्हणाली.
"विशाल !!!" सुहास प्रियाच्या बदलत्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला.
विशालच नाव सुहासने घेताच प्रिया थोडी गोंधळली. तिला पुढे काय बोलावं तेच कळेना. ती तडक बाहेर धावतच गेली.
खोलीच्या बाहेर येताच प्रिया सगळीकडे पाहू लागली.
"इथे तर कोणाचं नाहीये !! "
"आहे ना !! विशाल आहे ना !" सुहास तिच्या डोळयात पाहत म्हणाला.
"ही काय थट्टा लावली आहेस सुहास तू ??" प्रिया रागात विचारू लागली.
"थट्टा कुठे !! खरंच आलाय विशाल भेटायला तुला!! " सुहास प्रियाच्या पोटावर कान ठेवून म्हणू लागला.
" हा काय विशाल !! हा बघ तुला भेटायला आला आहे !!! "
"बरं !! म्हणजे तू पत्र वाचल आहेस तर !!"
"हो !!! " दुःख वाटलं की एवढ प्रेम करूनही तुला माझ प्रेम कधी कळलं नाही !! त्याच उत्तरही मिळालं !! हा विशाल !!  समाजाच्या लाजे खातर इथे माझी बायको असल्याचं फक्त एक नाटक करते आहेस तू !! " विशाल मनातलं बोलत होता.
"हो आहेच माझ त्याच्यावर प्रेम !! तू माझ्या आयुष्यात येण्या आधीपासून!! खरतर तूच आमच्या प्रेमाच्या मध्ये आलास !! " प्रियाच्या डोळयात राग दिसत होता.
"हो मग तू जाऊ शकतेस !! त्या विशालकडे !! मी तुला कधीच अडवत नाहीये !!"
"नाही !! मला ते करायचं नाहीये !!"
"पण का ??" सुहास अनावर होऊन म्हणाला.
"माहीत नाही !!" प्रिया एवढचं बोलून निघून गेली.
  सुहासच्या मनावर या सगळ्या गोष्टींचा खूप आघात झाला. तो अबोल झाला, त्याने स्वतःला अंधाऱ्या खोलीत बंद करून घेतले. तो अंधार त्याला काही सांगत होता..
"सुहास !! या अंधाराची सोबत खूप वाईट रे !! जेव्हा आपले दुरावतात तेव्हाच याची आठवण येते !! याला सुखही माहिती नी दुःखही..सुख त्या एकत्रीत क्षणाचे !! आणि दुःख त्या एकटेपणाचे!!  जी कधी तुझी झालीच नाही तिच्याबद्दल अश्रुंते काय वाहू द्यायचे !! जे नात कधी सुरूच झाल नाही त्याच दुःख तरी काय करायचं ..!! ती तुझी फक्त पत्नी झाली!!! सहचारिणी झालीच नाही !!

उगाच टिपूस गाळून
कालचे दुःख भिजायचे
आजच्या क्षणात थोडे
जगायचे राहून जायचे

भेटलेच नाहीं असे
नाते तरी काय जपायचे
दूर त्या क्षणात कोणी
अनोळखी वाट पाहायचे

बघ एकदा वाट बदलून
नव्या आकाशात फिरायचे
भेट त्या एका वळणावर
खूप काही सांगून जायचे

उगाच टिपूस गाळून
कालचे दुःख भिजायचे ..!!"  होणं !! सुहास त्या अंधारात हरवून गेला होता.

क्रमशः ..

✍© योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...