आई || कथा भाग ६ || मराठी कथा || Mother ||




भाग ६

"ज्या बाळाला या जगात येण्याआधीच मी मारण्याचा प्रयत्न केला त्या बाळाची एवढी ओढ मला का वाटावी. माझ्या छातीला बिलगून ते दूध पिताना माझ्या मनाला एक वेगळंच समाधान मिळत होत. ते मी कधीच कोणाला कळू दिल नाही कदाचित माझ्यातील तो अहंकार तिथे आड येत होता. पण माझ्याच हडामासाने तयार झालेल्या माझ्या त्रिशाला मी अस एकट सोडून यायला नव्हतं पाहिजे असं मला आता राहून राहून वाटतंय. कदाचित यालाच आई म्हणतात हे मला आता कळून चुकलं. पण मग मी आता करू काय ?? सकाळीच उठून पुन्हा घरी जाऊ की समीरलाच इकडे बोलावून घेऊ. काहीच कळत नाही. "

शीतल रात्रभर एकटीच विचार करत बसली होती. सकाळ झाली तेव्हा तिला कधी एकदा समीरला फोन लावते अस झाल होत. ती पटकन जागेवरून उठते. सगळं घर आवरू लागते. आणि पटकन समीरला फोन लावते. एवढ्या सकाळी शीतलचा फोन पाहून समीरलाही नवल वाटत. तिचा फोन उचलत तो तिला विचारतो.

"शीतल !! एवढ्या सकाळी कॉल केलास !! सगळं ठीक आहेना ??"
"हो समीर !! सगळं ठीक आहे !! त्रिशा उठली नाही का झोपेतून अजून ??"
"नाही !! नाही उठली अजून !! अक्च्युली ती रात्रभर झोपलीच नाही!! जागीच होती!! थोडा वेळ झोप लागलीच तर लगेच दचकून उठायची आणि रडायला लागायची !! पहाटे ४ला आईने तिला तिच्याकडे घेऊन गेली तेव्हा कुठे शांत झोपली. " 
" रात्रभर जागी होती !!" शीतल शांत आवाजात विचारतं होती. 
"हो!! पण आता काही टेन्शन नाहीये !! झोपली आहे आता शांत !! मी आता थोड्या वेळाने ऑफिसला निघतोय !! आई घेईन काळजी तिची !! खरतर माझ्यापेक्षा आईकडेच जास्त राहते ती. सतत आईच्या मागे रांगत रांगत फिरत असते ती !! काल तुझ्याशी बोललो ते मग इथेच माझ्याजवळ राहिली !! "
शीतल शांत राहिली. तिला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. ती फक्त समीर सांगेन ते ऐकत होती. तिलाही समीरला सांगायचं होत की तीही रात्रभर त्रिशाच्या आठवणीत झोपली नाही.

"शीतल !! तुलाही ऑफिसला जायचं असेलच ना??"
"हो निघते आहे मी आता !! "
"ठीक आहे !!! मी निघतोय ऑफिसला !!आल्यावर कॉल करेन मी !! तूही तुझी काळजी घे !! ठेवू आता फोन ??"
"ठीक आहे !!" 

शीतल जड मनाने फोन ठेवते. त्रिशाही रात्रभर झोपली नाही या विचाराने तिला काहीच सुचत नव्हतं. ती रात्रभर दचकून जागी होत होती. पण का ?? या प्रश्नाने तिच्या मनात काहूर माजल होत. माझ्या मिठीत असताना ती कधीच अशी दचकून जागी झाली नाही. किती शांत झोपी जात होती ना ती ?? मला वाटतं मी तिला भेटायला जाव. तिला मिठीत घ्यावं, माझ्यातील आईपण माझ्या लेकीच्या प्रेमाला किती आसुसले आहे हे तिला सांगावं.

शीतल सगळं आवरून ऑफिसमध्ये येथे. आपल्या कामात ती व्यस्त होते. पण मनाने मात्र ती त्रिशासोबत असते. 

"मॅम !! ही फाईल आज पूर्ण करायची आहे !! बॉस आज खूप रागावतील नाहीतर !!" मेघा शीतलकडे फाईल देत म्हणते.
"ठीक आहे !! " शीतल तुटक बोलते. मेघाच्या हे लक्षात आल्यावाचून राहत नाही. 
"मॅम !! सगळं ठीक आहे ना ?? काही प्रोब्लेम ??"
" नाही ग !! काही नाही झालं !! " 
"खरंच ??" मेघा शीतल समोर बसतं विचारते. 
"हो खरंच !! " शीतल तिच्याकडे न पाहताच बोलते. 
"आठवण येतेय ??"
"कोणाची ??" 
"मिस्टरांची !!"
"नाही ग !! आणि आठवण यायला विसरते आहे कुठ मी !!! ऑफिस टाईम संपला की त्याच्याशीच बोलणं चालू असतं सारखं !! अगदी रात्री झोपेपर्यंत !!" 
"मग प्रोब्लेम काय आहे ??" मेघा शीतलला आपल्याकडे पाहायचा हाताने इशारा करते. 
"त्रिशा !! माझी लेक !! तिची खूप आठवण येतेय मला!! इकडे येताना मला सगळं सहज सोप वाटत होत. मला वाटलं त्यात काय एवढं !! सासू सासरे नवरा !! सांभाळतील माझ्या लेकीला मी आपलं माझ आयुष्य , माझं करिअर घडवायला मोकळी होईल !! पण नाही ग !! हे नातं इतकं सहज सोप नाहीये हे आता मला कळून चुकलय !! माझ्या मुलीला सोडून मी क्षणभरही राहू शकत नाहीये!! "
"मग जा तिला भेटायला ! !"
"पण बॉस जाऊ देतील मला !! मी अशी न्यू जोईनिंग लगेच कशी मागू त्यांना सुट्टी ??"
"विचारून तर पहा !! " मेघा शीतल समोरून उठत म्हणते.

"खरंच एकदा विचारायला काय हरकत आहे ?? एक दोन दिवस थांबते आणि मग विचारते!! अजून थोडा विचार करायला हवा !! अस लगेच निर्णय घेणं बरोबर नाही"
शीतल बॉसला विचारायचं ठरवून आपल्या कामात पुन्हा व्यस्त झाली. दिवसभर तिचं मन कामात नीटसं लागलंच नाही. संध्याकाळी सगळं काम पूर्ण करून ती बॉसकडे गेली.

"मॅम !! "
 शीतलची बॉस शीतलकडे पाहत बोलते.
"येना !! शीतल ये बस !! !!"
शीतल केबिन मध्ये बॉस समोर येऊन बसते. 
" झाली ती फाईल ??"
"हो!!" 
" बघू !! "
शीतल बॉसकडे फाईल देते. बॉस फाईल वाचते. थोडावेळ फाईल वाचून झाल्यावर,
"काय हे शीतल !! किती चुका ?? कामात लक्ष लागत नाहीये का ?? असला हलगर्जीपणा मला चालायचा नाही बघ !! तू एवढी हुशार एम्प्लॉइ आहेस !! तुझ्याकडून अशा चुकांची अपेक्षा नाहीये मला !!  "
" सॉरी मॅम !! "
"ठीक आहे !! जिथे जिथे चूक झाली आहे ते हायलाईट केलंय मी !! पुन्हा एकदा फाईल बघ आणि दुरुस्त करून घेऊन ये !! उद्या संध्याकाळी फाईल क्लायंटला द्यायची आहे त्यादृष्टीने तयारी कर !!  आणि त्यांना प्रेझेंटेशन पण तुलाच करायचं आहे!! "
"नक्की मॅम !! मी सगळं काही नीट करते !! " 
"गुड !!" 

शीतल दिवसभराच्या कामानंतर घरी येते. उद्या प्रेझेंटेशन करायचं आहे हे लक्षात ठेवून कामाला लागते. 


क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...