आई || कथा भाग ७ || मराठी कथा || Story ||



भाग ७

दिवसभराच्या कामानंतर शीतलला कधी एकदा फ्लॅटवर येते आहे अस झालं होत. ती ऑफिसमधून लगबगीने येते. सगळी कामे आवरून पुन्हा उद्याच्या प्रेझेंटेशनची तयार करू लागते. रात्रीच जेवण करण्याची सुद्धा आठवण तिला येत नाही. कामात व्यस्त असतानाच समीरचा फोन येतो, शीतल फोन उचलताच समीर तिला दिवसभर काय झाले ते सांगू लागतो. 

"आज दिवस नुसता कामात गेला. घरी येऊन पाहतो तर त्रिशा जणू माझी वाटच पाहत बसली होती. तिला पाहिलं आणि सगळा थकवा कुठच्या कुठे निघून गेला मला कळलं सुद्धा नाही!!" समीर शीतलला अगदी आनंदाने सगळं सांगत होता. 
"होका..!! पण माझं सगळं उलटच झालं!! "
"का काय झालं ?? काही प्रोब्लेम झाले का ??"
"प्रोब्लेम असे काही नाही !! पण आज बॉसनी एक फाईल दिली होती त्यात चुकाच चुका निघाल्या !!! मग थोडा मूड ऑफ झाला !!"
"एवढ्याशा कारणाने कोणी मूड ऑफ करून घेत का ?? इट्स ओके !! बॉसच बोलणं एवढं मनाला लावून नाही घ्यायचं !!"
" मनाला अस नाहीरे !! पण माझं काम अस कधी चुकत नाही !! सगळी कामे कशी १००% सक्सेसफुल व्हावी असं मला वाटतं !! "
" हो पण नेहमीच ते १००% होईल असं थोडीच असतं !! कधी कधी इकडे तिकडे होणारच ना !!"
" ते ही आहेच म्हणा !! आणि त्यातून उद्या मला प्रेझेंटेशन पण करायला सांगितलं आहे !! काय करावं काहीं सुचत नाहीये !! "
"अरे व्हा !! चांगलं आहे ना मग !! खूप मेहनत कर आणि मस्त प्रेझेंटेशन कर !! "
"हो !! त्रिशा झोपली ??"
"नाही !! हे बघ !! नुसती दंगा करते आहे नुसती !! बोलता येत नाही पण तिच्या भाषेत नुसता गोंधळ चालु आहे घरात !! " 
शीतलला त्रिशाचा आवाज ऐकू येतो. तिच्या मनात तिचा तो आवाज जणू अगदी तिला सगळं काही विसरायला लावतो.  ती क्षणभर तिचा आवाज ऐकत राहते.
"शीतल ?? शीतल !! आवाज ऐकू येत नाहीये का ??" 
शीतल गप्प राहिली. क्षणात ती भानावर आली आणि समीरला बोलू लागली.
"येतोय !! अरे थोड काम करत होते !!"
"ओके !! मग मी ठेवू का फोन ? तू कर उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी !!"
"हो !!"

शीतल फोन ठेवते. तिच्या मनात त्रिशाचा तो आवाज जणू तिला साद घालत होता. तिला जणू आपल्याकडे ओढत होता. ती मनात पुन्हा पुन्हा तोच विचार करत होती. ती आई आपल्या बाळाला अलगद जवळ करू पाहत होती. 

"आईपण किती सुंदर असतं ना ?? अस म्हणतात की या जगात आई सारखी दुसरी कोणी नाही !! ना तिची जागा दुसरे कोणी घेऊ शकते !! नाही ना !! ती फक्त आई असते !! माझ्यासारख्या दगडाच्या काळजाला सुद्धा आईपण आहे हे आज मल कळून चुकलं ! !! मी स्त्री, मी आई , मी बायको ,मी बहीण !!  किती रुपात मी आहे !! आणि मला वेडीला ती कधी दिसलीच नाहीत !! मी एक स्त्री म्हणून घडताना , मला घडवणारे माझे वडील , मला सांभाळून घेणारा माझा नवरा यांचही माझ्या आयुष्यात तितकंच महत्व आहे जितकं माझं त्यांच्या आयुष्यात !! त्यांनी माझ्या प्रत्येक निर्णयाला साथ दिली. आजही देत आहेत !! मग मी एक आई म्हणून , एक मुलगी म्हणून , एक सून म्हणून कुठे कमी तर पडत नाहीये ना ??". शीतल आपल्या विचारांच्या समुद्रात स्वतःला जणू हरवून गेली होती. 

"आपण जेव्हा हरवून जातो तेव्हा आपल्याला आठवण येते ती आपल्या आईची !!  किती आनंद झाला होता त्या सकाळी जेव्हा माझ्या आईला मी माझ्या समोर पाहिलं होत!!"

शीतल आपल्या विचारातून बाहेर येत आईला फोन करते, 

"शीतल !! किती दिवसांनी फोन करतेस ?? बरी आहेस ना बाळा !! मला किती काळजी वाटत होती तुझी !! एकटीच आहेस !! कुठे अनोळखी शहरात !! कोण शहर !! कुठली माणसं !! " शीतलची आई कित्येक प्रश्न शीतलला विचारते.
" आई !! "
"बोल ना बाळा !! काय झालं ??"
कित्येक दिवस मनामध्ये साठलेलं ते सार काही शीतलच्या ओठांवर येतं , आईचा आवाज ऐकताच नकळत तिला रडू येतं. शीतलच्या आईला हे कळायला वेळ लागला नाही.
" काय झालं शीतल ?? रडतेयस का ??" 
" तुझी खूप आठवण येत होती !! "
"आणि त्रिशाची पण ना ??" शीतलची आई लगेच बोलते.
" तुला कसं कळलं ??"
"मीही एका लेकराची आई शीतल !!" 
"आई पण हे असं का ?? सगळं काही माझ्या मनासारखं होऊनही मी पुन्हा तिथेच का ओढली जाते आहे ??" 
" कारण तू सत्य नाकारते आहेस म्हणून तुला त्रास होतोय !! तू एका बाळाची आई आहेस हे विसरण्याचा केविलवाणा प्रयत्न तू करते आहेस !! मला सांग तुझ्या आयुष्यात काहीही प्रोब्लेम झालाच तर तू कोणाला सांगतेस !! आईलाच ना !! "
"हो आई !! पण आता अस वाटतंय की मी चांगली आई नाहीये !! त्या बाळाला मी ऐकट सोडून आले !! समीर तिला माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो तिला तो काही कमी पडू नाही देणार !! पण एक आई म्हणून मला तिथे असावं  नेहमी वाटतं राहत !"
" तू वाईट नाहीस ग शीतल !! पण नात नाकारण्याची चूक तू करतेस इथ सगळं थांबत !! आपण कितीही नाही म्हटलं तरी नात नाकारू शकत नाहीत आपण !!"
" हे आता कळून चुकलं मला आई !! शेवटी नुसतं तोंडाने बोलणं सोपं असतं पण जेव्हा सत्य येत तेव्हा काहीच सुचत नाही !!"
"आता जास्त विचार करू नकोस !! मला सांग तुझ्यासारख्या कित्येक स्त्रिया या जगात आहेतच ना !! ज्या कामा निमित्त , आपलं घर , आपली मूलबाळ सोडून लांब कामाला जातात !! फरक फक्त एवढाच होता की ते नात्याला जोडून राहतात !! "
" खरंय आई !! आजपर्यंत त्रिशाच आणि माझं नात मी नाकारतच आले आहे !! पण यापुढे तस होणार नाही !! बघ तू आई मी तिला जगातलं सगळं सुख देणार !! वर्ल्ड्स बेस्ट ममा होऊन दाखवणार !!"
"नक्की होशील बर !!" शीतलची आई थोड्या हसऱ्या आवाजात बोलते.
"आई खर सांगू !! आज तुला बोलून मल खूप हलकं वाटतंय !! मला अगदी मोकळं वाटतंय !! माझ्या आणि त्रिशाच्या नात्याला जणू नव्याने ओळख मिळाल्या सारखं वाटतंय !! " शीतल मनातलं सगळं काही आपल्या आईला सांगत होती.
" नव्याने सुरुवात कर !! तू एक सुंदर स्त्री आहेस !! एक यशस्वी स्त्री आहेस !! "
"हो आई !! "

शीतल आणि तिच्या आईच बोलणं झाल्यावर शीतल पुन्हा जोमाने कामाला लागते. आईला बोलल्यानंतर जणू नवी ऊर्जा तिच्या मनात येते. सगळी कामं ती पटापट पूर्ण करते. उद्याच्या प्रेझेंटेशनसाठी छान तयारी करते. त्रिशाच्या आठवणीत तिला कधी झोप लागते तिलाही कळत नाही. 

सकाळच्या सातला उठताच , सगळं काही आवरू लागते. ऑफिसला जाण्यासाठी ती तयारी करते. समीरशी बोलून झाल्यावर ती पुन्हा आपल्या रूटीन मध्ये व्यस्त होते. कालच्या आईच्या बोलण्यातले कित्येक शब्द ती पुन्ह पुन्हा आठवू लागते.

" आज प्रेझेंटेशन नीट व्हावं !! बाकी काही नाही !! म्हणजे उद्या बॉसला विचारून दोन दिवसांची का होईना पण सुट्टी घेऊन घरी जाते !! मग दोन दिवस मनसोक्त त्रिशा सोबत राहते !! पण बॉस सुट्टी देईन की नाही काही सांगता येत नाही !! आधीच कालच्या प्रकाराने तिच्या मनात माझी इमेज खराब झाली नसावी म्हणजे मिळवलं !! नाहीतर आहे पुन्हा !! नुसतं फोनवर बोलणं !!  " शीतल ऑफिसमध्ये जाताना मनात नुसता विचारांचा गोंधळ करू लागली.

"पण सगळं काही आजच्या प्रेझेंटेशन वर अवलंबून आहे !! आज जर काही चूक झाली तर काही खर नाही !! त्यासाठी मला आधी शांत राहायला हवं !! शीतल शांत हो !! शांत हो!! " 

शीतल ऑफिसमध्ये आल्यावर तडक पहिल्यांदा ऑफीसमध्ये बॉसकडे गेली. आजच्या प्रेझेंटेशन विषयी चर्चा करू लागली. 

"गुड !! तयारी तू खूप छान केली आहेस !! पण थोडी इम्प्रूमेंट केलीस तर अजून छान होईल !! "
"ओके मॅम !! आणि ही फाईल कालच पुन्हा नीट केली. "
"गुड !! वेरी फास्ट हा !!"
"थॅन्क्स मॅम !!" 
एवढ बोलून शीतल केबिनमधून बाहेर येऊ लागली. तेवढ्यात बॉस तिला मागून बोलते, 
"शीतल !! "
"येस मॅम !!"
"गुड वर्क ! कीप ईट अप !!"

शीतल आनंदाने बाहेर येते. प्रेझेंटेशन नीट करण्यासाठी तयारीला लागते. 

क्रमशः 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...