मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

भेटून त्या क्षणांना || मराठी कवितेच्या जगात || Marathi Poems ||

भेटून त्या क्षणांना, आठवांची चित्र द्यावी !! कुठे रंगीबेरंगी दिसावे, कुठे बेरंग असावी !! रंगात रंगून तेव्हा, आनंदाची उधळण करावी !! नुसत्याच त्या रेशांमधून, जीवनाची वाट पहावी !! सार काही इथेच, तरीही शोधाशोध करावी !! भरल्या त्या हृदयात, अनोळखी ती पाहावी !! ओळख त्या आपुल्यांची, अबोल होऊन जावी !! घर ते स्वप्नांचे , भिंत जिथे उरावी !! ओढ होईल जाण्याची, मनास आवर घालावी !! रमून जाईल मन, प्रेमाची उब दिसावी !! कुठे स्पर्श मायेचा, कुठे ती असावी !! प्रेम ते नितांत, क्षणास बोलून जावी !! थांबवावे मग क्षणास, आठवण ती भरावी !! जाऊच नये कूठे, जणू बांधून ठेवावी !! कितीही केले तरी, सहज ती सुटावी !! जून्यास सामावून घेता, लाट नवी यावी !!  आजचे ते क्षण, उद्याची आठवण व्हावी !!  सहज जगल्या क्षणांचे, जणू मोती बनवावी !! बेरंग त्या कागदावर, सहज उतरवून घ्यावी !! रंग भरल्या जीवनाची, कविता ती व्हावी !! © योगेश खजानदार All Rights Reserved 

बंगला नंबर २२ || कथा भाग १० || मुक्ती || शेवट भाग || मराठी भूत प्रेत कथा ||

कथा भाग १० || मुक्ती || खोलीतल्या वस्तू देशमुखच्या बाजूने भिरकावल्या जाऊ लागल्या. तो कसाबसा त्यातून वाचला. पण त्याने लगेच आपल्या पँटच्या खिशातून एक पुस्तक काढलं. मोठमोठ्याने तो तंत्रमंत्र म्हणू लागला. तशी माया कमजोर होत चालली.  "नीच माणसा !! पुन्हा मी कैद होणार नाही ! पुन्हा तुझ्या कैदेत मी राहणार नाही !!" एक सावली देशमुखच्या बाजूने येऊ लागली. पण एक वर्तुळाच्या पुढे तिला काही येता येईना.  "रांडेचे !! तेव्हाही अशीच विरोध करत होतीस !! आणि आजही तेच !! जा तुला आता कायमच मी या खोलीत कैद करून टाकणार !! "  देशमुख जोरजोरात मंत्रतंत्र म्हणू लागला. बाहेर प्रिया पळतच श्रीधर जवळ गेली. त्याला मीठी मारून कित्येक वेळ रडत राहिली. श्रीधरला मात्र आत काय प्रकार घडतोय हे कळलं. तो धावतच आत आला. देशमुखला जोरात बुक्की मारत त्याने ते पुस्तक त्याच्यापासून हिसकावून घेतल. "भाडकाव !! माझ्या बायकोवर वाकडी नजर ठेवतोस !!थांब तुला मी सोडणार नाही !! " असे म्हणत श्रीधर देशमुखला मारत राहिला. तेवढ्यात मागून कोणीतरी क्षणात त्याच्या डोक्यात काठी हाणली. तो जगताप होता. "शाब्बास !! दत्तू !! ...

बंगला नंबर २२ || कथा भाग ९ || सुटका || मराठी भयकथा ||

कथा भाग ९ || सुटका || श्रीधर कित्येक वेळ त्या अपंग झालेल्या मंदार केळकरकडे पाहत राहिला. त्याला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. तेवढ्यात त्या कंपनीच्या बाहेर गाड्यांचा आवाज येऊ लागला.श्रीधर धावत खिडकी जवळ गेला, तर समोर दहा ते पंधरा लोक हातात काठ्या, चाकू, बंदूक घेऊन आले होते. श्रीधर पुन्हा धावत मंदार केळकरकडे आला आणि म्हणाला.  "चला इथून !! आपल्या मागावर लोक आलेत !! नक्की त्या देशमुखला सगळं खर खर कळलं असणार !!" "तू कोण पण !!" मंदार श्रीधरकडे बोट करत म्हणाला. "मी श्रीधर जोशी !! तुम्हाला इथून सोडवायला आलोय !!" "श्रीधर जोशी ?? पण मला का ??" मंदार केळकर कुतूहलाने विचारतात.  "सगळ तुम्हाला सांगतो नंतर !! पण आता प्लीज इथून चला !! आपल्या जिवाला धोकाय !! " "हो पण मी नाही हलू शकत जागेवरून !! जास्तीत जास्त हाताने जवळपास जाऊ शकतो !! तेही फरपटत!! " मंदार पायांकडे पाहत म्हणाला. "मी घेतो ना तुम्हाला माझ्या पाठीवर !! पण श्याम तू लक्ष ठेव त्यांच्यावर !! ते कुठे आलेत ते बघ !!"  "हो !! "  श्याम धावत पुन्हा खिडकीजवळ गेला. हळूच वाक...

बंगला नंबर २२ || कथा भाग ८ || शोध || मराठी भयकथा ||

कथा भाग ८ || शोध || श्रीधर केबिनमध्ये येताच आपलं काम करत बसतो. थोड्या वेळाने आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही हे पाहून तो लॅपटॉप मध्ये ऑफिसमधील सर्व कर्मचाऱ्यांचा डेटा चेक करू लागतो. दोन तीन वेळा त्याने मंदार केळकर नावाने जुना डेटा काढण्याचा प्रयत्न केला तरी त्याला अश्या नावाचा कोणी कर्मचारी नव्हताच हे दिसून येत होत. पुन्हा पुन्हा तो चेक करत होता पण उत्तर काही बदलत नव्हतं. शेवटी न राहून तो ऑफिसमधील जुन्या एका कर्मचाऱ्याला विचारतो. "पंडित , आपल्या ऑफिसचा कर्मचाऱ्याचा डेटा कुठे आहे ??" "तो आहे की लॅपटॉप मध्ये!!" "तो नाही !! जुना !! कारण नव्यात खूप एरर्स आहेत !! ते नीट करावे लागतील !!" "ऑफिसच्या खाली अडगळीच्या खोल्या आहेत त्यात असतील !!त्याची चावी मात्र साहेबांच्या केबिन मध्ये असते !!" "ठीक आहे पाहतो मी !! " श्रीधर हळू हळू देशमुख साहेबाच्या केबिनमध्ये जाऊ लागतो. पण त्याला समोर बघून तो क्षणभर थांबतो. दुसरीकडे पाहू लागतो. थोड्या वेळाने साहेब केबिन मधुन बाहेर जातो. श्रीधर सर्वांची नजर चुकवून आत जातो. सगळीकडे शोधाशोध करू लागतो. पण काही केल्या त्याला...

बंगला नंबर २२ || कथा भाग ७ || दोन दिवस || मराठी भुतकथा ||

कथा भाग ७ || दोन दिवस  "सकाळ उजाडली तरी हा दत्त्या कसा आला नाही अजून ?? त्या श्रीधरन याला धरला तर नसलं ना?? जाऊन बघू का तिथं ?? नको नको !! उगाच काहीतरी वेगळाच कांड होईल!! त्यापेक्षा हळूच जाऊन बघतो नेमक चाललंय तरी काय ??" देशमुख साहेब ऑफिसमध्ये बसून विचार करत बसला होता.  विचार करता करता गाडी घेऊन तो हळूच बंगल्या जवळ आला. बाहेरूनच सगळं पाहू लागला. नेमक आत काय चालू आहे याचा अंदाज काही केल्या त्याला येतं नव्हता. शेवटी त्याने न राहून जगतापला फोन केला. पण काही केल्या तो फोन उचलत नव्हता. तस तस् त्याच इकडे टेन्शन वाढायला लागलं होत. तेवढ्यात त्याने श्याम आणि श्रीधर दोघांना बाहेर पडताना पाहिलं. ते दोघे लगबगीने बाहेर निघाले होते. थोडा वेळ गेल्यानंतर त्यांच्यासोबत अजून कोणीतरी असल्याचं देशमुख साहेबान पाहिलं. देशमुख साहेब तिथेच लपून बसला. "आता सायली कशी आहे ??" सुहास घरात जात जात विचारतं होता.  "खरतर मला आता काय बोलावं काहीच कळत नाहीये !! पण ती खूप विचित्र वागते आहे !! " श्रीधर काळजीने बोलू लागला. "डोन्ट वरी !! सगळं ठीक होईल !! " तिघेही पटापट चालत सायलीच्या ख...