मुख्य सामग्रीवर वगळा

​शून्यातल विश्व !

खूप दिवस झाले लेखणी बंद झाली आणि आतल्या आत कुठेतरी विचार कोंडल्या सारखे झाले. रोजच्या आयुष्यात जगताना आपण पूर्वीचे कुठेतरी हरवून गेल्याची जाणीव मनाला झाली. या विचाराना कुठेतरी वाट द्यावी वाटू लागल आणि सहजच विचारांचा वेग वाढत गेला. पूर्वी कॉलेज लाइफ मध्ये कविता लिहाव्या वाटायच्या एखाद ओळ सुचली तरी पूर्ण कविता व्हायची पण आता रोजच जगताना ते शब्द कुठेतरी हरवून गेलेत अस वाटू लागल आणि पुन्हा जमेल तस जमेल तेव्हा लिहाव हा निर्धार आज केला. 


खरतर खुप दिवस बंद असलेली गाडी चालू करताना जशी मेहनत घ्यावी लागते तशी लिखाण करतानाही माझी अवस्था झाली. विषयच सापडत नव्हता. आता पूर्वी सारखं प्रेमावर कविता लिहावी तर तेही अडगळीत कुठेतरी धुळ खात पडल होत आणि त्यावरची धूळ झटकली की पुन्हा नव्याने तिथेच यावं अशी अवस्था. पण मग लिखाण करावं तरी काय हा यक्ष प्रश्न होताच मग म्हटल विषय जाऊदे जे सुचेल ते लिहाव आणि हा विषय लिहायला घेतला जसे सुचेल तसे.


बर आता पूर्वी सारखं अगदी वाचनही होत नाही, अगदी नाही अस नाही पण  जरा कमीच, पण त्या बदल्यात माणूस रूपी पुस्तक मात्र भरपूर वाचायला भेटतात आणि त्यातले कित्येक लाख मोलाचे अनुभव शिकवून जातात. काही आनंदी असतात तर काही अगदी स्मशानात बसल्या सारखे गंभीर असतात. कोणी बडबड करत राहतात (माझ्यासारखे) तर काही बोला म्हटल तरी हसून शांत राहणारी असतात अशावेळी माझ्या सारख्या एकांत प्रिय माणसाचा खूप गोंधळ होतो आणि व्यक्ती तितक्या प्रकृती हे मनात ठेवून पुढे जाण्याचा विचार होतो. 


म्हणूनच की काय पुन्हा शून्यात पाहताना सार विश्व तिथे दिसायला लागत. म्हणताना ते शून्य म्हणजे काहीच नाही पण ते एका सोबत असेल तर ? दहा होत आणि तो एक म्हणजे मला मी वाटायला लागतो आणि पुन्हा सगळं आकाश आपल्या पुढ्यात आहे ही भावना येते आणि सगळं काही स्पष्ट दिसायला लागत .. अगदी पूर्वी सारखं .. 


✍️योगेश 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिनविशेष १९ मार्च || Dinvishesh 19 March ||

जन्म १. दादा चांदेकर, संगीत दिग्दर्शक (१८९७) २. तनुश्री दत्ता , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४) ३. जिन अस्तृद, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१६८४) ४. रॉक सरनोबत पेना , अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८५१) ५. सई परांजपे, लेखिका दिग्दर्शिका (१९३८) ६. जीन फेड्रिक जोलियोट, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९००) ७. लियनिदास अलाओगौ, ग्रीक गणितज्ञ (१९१४) ८. मुनरो चांबर्स, कॅनाडियन अभिनेता (१९९३) ९. मॅट लिटलेर, ब्रिटीश अभिनेता (१९८२) १०. विल्लेम एच दे बीअफोर्ट, डच इतिहासकार (१८४५) मृत्यु १. इ एम एस नंबुद्रिपाद, केरळचे मुख्यमंत्री (१९९८) २. केरूनाना लक्ष्मण छत्रे, गणितज्ञ (१८८४) ३. फिलिप माझेई , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१८१६) ४. ऑर्थर बॅलफोर, ब्रिटीश पंतप्रधान (१९३०) ५. गस्टोन ज्युलिया, फ्रेंच गणितज्ञ (१९७८) ६. फर्णांड लोडविक, इतिहासकार (१९९५) ७. आचार्य कृपलानी, स्वातंत्र्यसेनानी (१९८२) ८. केरोपंत छत्रे, गणितज्ञ (१८८४) ९. नरेन ताम्हणे, भारतीय क्रिकेटपटू (२००२) १०. खंडेराव होळकर, मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव (१७५४) घटना १. नेवाडा येथे जुगाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली. (१९३१) २. इंडोनेशियाने सर्व...

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

दिनविशेष १८ सप्टेंबर || Dinvishesh 18 September ||

जन्म १. प्रिया बापट, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६) २. जॉन डायफेनबकेर, कॅनडाचे पंतप्रधान (१८९५) ३. शबाना आझमी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५०) ४. विष्णुवर्धन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९५०) ५. शिवसागर रामगुलाम, मॉरिशसचे पंतप्रधान (१९००) ६. एडविन मॅकमिलन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०७) ७. काका हाथरसी, भारतीय हिंदी कवी, लेखक (१९०६) ८. जॉर्ज संपेओ, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९३९) ९. बिंदू भट्ट, भारतीय गुजराती लेखिका (१९५४) १०. मदनलाल धिंग्रा, भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी (१८८३) ११. राजा नेने, भारतीय चित्रपट, रंगभूमी अभिनेते, दिग्दर्शक (१९१२) मृत्यू १. अरुण वासुदेव कर्नाटकी, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९९९) २. शिवाजी सावंत, भारतीय मराठी लेखक, कादंबरीकार (२००२) ३. लियन्हार्ड युलेर, स्विश गणितज्ञ (१७८३) ४. वेलियाम भरगवण, भारतीय राजकीय नेते (२०१३) ५. पीटर स्टोल्यपिन, रशियाचे पंतप्रधान (१९११) ६. जॉन कॉक्रोफ्ट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६७) ७. मोहम्मद हिदयतुल्ला, भारताचे उपराष्ट्रपती (१९९२) ८. अमेरिको टोमास, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष ...