मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बंगला नंबर २२ || कथा भाग १० || मुक्ती || शेवट भाग || मराठी भूत प्रेत कथा ||

कथा भाग १० || मुक्ती || खोलीतल्या वस्तू देशमुखच्या बाजूने भिरकावल्या जाऊ लागल्या. तो कसाबसा त्यातून वाचला. पण त्याने लगेच आपल्या पँटच्या खिशातून एक पुस्तक काढलं. मोठमोठ्याने तो तंत्रमंत्र म्हणू लागला. तशी माया कमजोर होत चालली.  "नीच माणसा !! पुन्हा मी कैद होणार नाही ! पुन्हा तुझ्या कैदेत मी राहणार नाही !!" एक सावली देशमुखच्या बाजूने येऊ लागली. पण एक वर्तुळाच्या पुढे तिला काही येता येईना.  "रांडेचे !! तेव्हाही अशीच विरोध करत होतीस !! आणि आजही तेच !! जा तुला आता कायमच मी या खोलीत कैद करून टाकणार !! "  देशमुख जोरजोरात मंत्रतंत्र म्हणू लागला. बाहेर प्रिया पळतच श्रीधर जवळ गेली. त्याला मीठी मारून कित्येक वेळ रडत राहिली. श्रीधरला मात्र आत काय प्रकार घडतोय हे कळलं. तो धावतच आत आला. देशमुखला जोरात बुक्की मारत त्याने ते पुस्तक त्याच्यापासून हिसकावून घेतल. "भाडकाव !! माझ्या बायकोवर वाकडी नजर ठेवतोस !!थांब तुला मी सोडणार नाही !! " असे म्हणत श्रीधर देशमुखला मारत राहिला. तेवढ्यात मागून कोणीतरी क्षणात त्याच्या डोक्यात काठी हाणली. तो जगताप होता. "शाब्बास !! दत्तू !! ...

बंगला नंबर २२ || कथा भाग ९ || सुटका || मराठी भयकथा ||

कथा भाग ९ || सुटका || श्रीधर कित्येक वेळ त्या अपंग झालेल्या मंदार केळकरकडे पाहत राहिला. त्याला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. तेवढ्यात त्या कंपनीच्या बाहेर गाड्यांचा आवाज येऊ लागला.श्रीधर धावत खिडकी जवळ गेला, तर समोर दहा ते पंधरा लोक हातात काठ्या, चाकू, बंदूक घेऊन आले होते. श्रीधर पुन्हा धावत मंदार केळकरकडे आला आणि म्हणाला.  "चला इथून !! आपल्या मागावर लोक आलेत !! नक्की त्या देशमुखला सगळं खर खर कळलं असणार !!" "तू कोण पण !!" मंदार श्रीधरकडे बोट करत म्हणाला. "मी श्रीधर जोशी !! तुम्हाला इथून सोडवायला आलोय !!" "श्रीधर जोशी ?? पण मला का ??" मंदार केळकर कुतूहलाने विचारतात.  "सगळ तुम्हाला सांगतो नंतर !! पण आता प्लीज इथून चला !! आपल्या जिवाला धोकाय !! " "हो पण मी नाही हलू शकत जागेवरून !! जास्तीत जास्त हाताने जवळपास जाऊ शकतो !! तेही फरपटत!! " मंदार पायांकडे पाहत म्हणाला. "मी घेतो ना तुम्हाला माझ्या पाठीवर !! पण श्याम तू लक्ष ठेव त्यांच्यावर !! ते कुठे आलेत ते बघ !!"  "हो !! "  श्याम धावत पुन्हा खिडकीजवळ गेला. हळूच वाक...

बंगला नंबर २२ || कथा भाग ८ || शोध || मराठी भयकथा ||

कथा भाग ८ || शोध || श्रीधर केबिनमध्ये येताच आपलं काम करत बसतो. थोड्या वेळाने आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही हे पाहून तो लॅपटॉप मध्ये ऑफिसमधील सर्व कर्मचाऱ्यांचा डेटा चेक करू लागतो. दोन तीन वेळा त्याने मंदार केळकर नावाने जुना डेटा काढण्याचा प्रयत्न केला तरी त्याला अश्या नावाचा कोणी कर्मचारी नव्हताच हे दिसून येत होत. पुन्हा पुन्हा तो चेक करत होता पण उत्तर काही बदलत नव्हतं. शेवटी न राहून तो ऑफिसमधील जुन्या एका कर्मचाऱ्याला विचारतो. "पंडित , आपल्या ऑफिसचा कर्मचाऱ्याचा डेटा कुठे आहे ??" "तो आहे की लॅपटॉप मध्ये!!" "तो नाही !! जुना !! कारण नव्यात खूप एरर्स आहेत !! ते नीट करावे लागतील !!" "ऑफिसच्या खाली अडगळीच्या खोल्या आहेत त्यात असतील !!त्याची चावी मात्र साहेबांच्या केबिन मध्ये असते !!" "ठीक आहे पाहतो मी !! " श्रीधर हळू हळू देशमुख साहेबाच्या केबिनमध्ये जाऊ लागतो. पण त्याला समोर बघून तो क्षणभर थांबतो. दुसरीकडे पाहू लागतो. थोड्या वेळाने साहेब केबिन मधुन बाहेर जातो. श्रीधर सर्वांची नजर चुकवून आत जातो. सगळीकडे शोधाशोध करू लागतो. पण काही केल्या त्याला...

बंगला नंबर २२ || कथा भाग ७ || दोन दिवस || मराठी भुतकथा ||

कथा भाग ७ || दोन दिवस  "सकाळ उजाडली तरी हा दत्त्या कसा आला नाही अजून ?? त्या श्रीधरन याला धरला तर नसलं ना?? जाऊन बघू का तिथं ?? नको नको !! उगाच काहीतरी वेगळाच कांड होईल!! त्यापेक्षा हळूच जाऊन बघतो नेमक चाललंय तरी काय ??" देशमुख साहेब ऑफिसमध्ये बसून विचार करत बसला होता.  विचार करता करता गाडी घेऊन तो हळूच बंगल्या जवळ आला. बाहेरूनच सगळं पाहू लागला. नेमक आत काय चालू आहे याचा अंदाज काही केल्या त्याला येतं नव्हता. शेवटी त्याने न राहून जगतापला फोन केला. पण काही केल्या तो फोन उचलत नव्हता. तस तस् त्याच इकडे टेन्शन वाढायला लागलं होत. तेवढ्यात त्याने श्याम आणि श्रीधर दोघांना बाहेर पडताना पाहिलं. ते दोघे लगबगीने बाहेर निघाले होते. थोडा वेळ गेल्यानंतर त्यांच्यासोबत अजून कोणीतरी असल्याचं देशमुख साहेबान पाहिलं. देशमुख साहेब तिथेच लपून बसला. "आता सायली कशी आहे ??" सुहास घरात जात जात विचारतं होता.  "खरतर मला आता काय बोलावं काहीच कळत नाहीये !! पण ती खूप विचित्र वागते आहे !! " श्रीधर काळजीने बोलू लागला. "डोन्ट वरी !! सगळं ठीक होईल !! " तिघेही पटापट चालत सायलीच्या ख...

बंगला नंबर २२ || कथा भाग ६ || सत्य || Marathi Horror Story ||

कथा भाग ६ || सत्य || श्रीधर एकटाच त्यानंतर हॉलमध्ये शांत बसून होता. त्याच्या मनात कित्येक विचाराचं काहूर माजलं होत.  "आजपर्यंत सर्वांशी चांगलं वागुनही शेवटी ती माया मला वाईट का म्हणाली असेल !! तिलाही माझ्यात ती वासनेची नजर दिसली असेल तर यात माझी काय चूक !! मी आजपर्यंत कधीही माझ्या प्रिया शिवाय कोणत्याच स्त्रीकडे नजर वरही करून पाहिलं नाही !! पण ती काही म्हणो !! आता प्रश्न आहे माझ्या पत्नीचा !! जिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तो त्या नीच देशमुखला धडा शिकवायला हवा !! त्याला धडा शिकवायला हवाच !! माझ्या तावडी सापडला तर सोडणार नाही मी त्याला !! पण मी एक गोष्ट विसरतो आहे !! माया !!" अचानक श्रीधर भानावर आला तो थेट किचन मध्ये गेला. तिथे नंदा आणि प्रिया बोलतं बसल्या होत्या.  "नंदा !! ही माया कोण आहे ??" अचानक श्रीधरने प्रश्न केल्याने नंदा गोंधळून गेली. तेवढ्यात मागून श्याम आला.  "साहेब ! मी सांगतो माया कोण ते !!"  श्रीधर मागे वळून पाहू लागला.  "तू !! " "होय साहेब मी !! कारण मी तेव्हा इथेच बंगल्यात असायचो !!" "इथेच ?? काय घडलं होत श्...