मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ५ नोव्हेंबर || Dinvishesh 5 November ||




जन्म

१. देशबंधू चित्तरंजन दास, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकीय नेते (१८७०)
२. विराट कोहली, भारतीय क्रिकेटपटू (१९८८)
३. चार्ल्स दुपुये, फ्रान्सचे पंतप्रधान (१८५१)
४. भालचंद्र पेंढारकर, भारतीय गायक, नाटककार, ललित कलादर्श नाट्यसंस्था प्रमुख(१९२१)
५. वंदना शिवा, भारतीय लेखिका , समाजसुधारक , पर्यावरणवादी कार्यकर्त्या (१९५२)
६. अर्जुन सिंह, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री (१९३०)
७. विवियन लिघ,  ब्रिटिश अभिनेत्री (१९१३)
८. डौघलास नॉर्थ, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९२०)
९. बनारसी दासगुप्ता, हरयाणाचे मुख्यमंत्री (१९१७)
१०. ब्रायन अॅडम्स, कॅनाडाचे गायक , संगीतकार (१९५९)
११. सज्जाद झाहिर, भारतीय लेखक (१९०५)
१२. प्रा. राजाराव, भारतीय प्राध्यापक, लेखक (१९०८)
१३. प्रा. योगेश्वर अभ्यंकर, भारतीय कवी , गीतकार (१९२९)
१४. अथिया शेट्टी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९२)


मृत्यू

१. भूपेन हजारिका, भारतीय गायक, संगीतकार (२०११)
२. जेम्स क्लर्क मॅक्सवेल, स्कॉटिश भौतिकशास्त्रज्ञ (१८७९)
३. ख्रिस्टियन ऐंजकमन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९३०)
४. प्रभाश जोशी, भारतीय लेखक ,पत्रकार (२००९)
५. शकुंतला विष्णू गोगटे, भारतीय लेखिका , कादंबरीकार (१९९१)
६. फिरोजशहा मेहता, राष्ट्रीय सभेचे संस्थापक (१९१५)
७. बी. आर. चोप्रा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक (२००८)
८. एडवर्ड टॅटम, नोबेल पारितोषिक विजेते जीवरसायनशास्त्रज्ञ (१९७५)
९. सुब्रता गुहा, भारतीय क्रिकेटपटू (२००३)
१०. बुलेंत इकेवित, तुर्कीचे पंतप्रधान (२००६)


घटना

१. कोलंबिया देशाने संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश केला. (१९४५)
२. भारताने मंगळ ऑर्बिटर मोहिमेची सुरुवात केली. (२०१३)
३. उलिसेस एस. ग्रँट हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आले. (१८७२)
४. जॉन ए. मॅकडोनाल्ड यांनी कॅनडाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. (१८७३)
५. फ्रँकलिन डी. रुझवेल्ट हे अमेरिकेचे तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९४०)
६. Bombay Baroda And Central India रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे , जयपूर रेल्वे, कच्छ रेल्वे ,राजपुताना रेल्वे यांचे विलीनीकरण करून पश्चिम रेल्वेची स्थापना करण्यात आली. (१९५१)
७. गुगलने अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम लाँच केले. (२००७)
८. फिलिपिनचे राष्ट्राध्यक्ष एपलिदिओ क्विरीनो यांनी राष्ट्रीय आपत्काल संपलच्या घोषित केले. (१९५०)
९. इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. (२००६)
१०. इंग्रज आणि बाजीराव यांच्यात झालेल्या लढाईत बाजीरावाच्या सैन्याचा पराभव झाला. (१८१७)

महत्व

१. World Tsunami Awareness Day
२. Bank Transfer Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...