मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ३० नोव्हेंबर || Dinvishesh 30 November ||




जन्म

१. सुभाष चंद्रा, एसेल ग्रुपचे अध्यक्ष, झी मीडिया कंपनीचे अध्यक्ष (१९५०)
२. विजय राज, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६३)
३. राजीव दिक्षित, भारतीय सामाजिक कार्यकर्ते (१९६७)
४. बाळकृष्ण बोरकर, भारतीय कवी ,लेखक (१९१०)
५. डॉ. जगदीशचंद्र बोस, भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ (१८५८)
६. थिऑडोर मोम्मसेन, नोबेल पारितोषिक विजेते लेखक,साहित्यिक (१८१७)
७. मुरली शर्मा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६३)
८. हंसराज हंस, भारतीय गायक (१९५३)
९. गुस्तफ डलेन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८६९)
१०. विन्स्टन चर्चिल, इंग्लंडचे पंतप्रधान (१८७४)
११. आनंद यादव, भारतीय मराठी लेखक (१९३५)
१२. एडगर एड्रियन, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रिया शास्त्रज्ञ (१८८९)
१३. हेन्री टॉब, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९१५)
१४. राशी खन्ना , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९०)
१५. जिवा, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९५२)
१६. वानी जयराम, भारतीय गायिका (१९४५)


मृत्यू

१. इंद्रकुमार गुजराल, भारताचे १२वे पंतप्रधान (२०१२)
२. ऑस्कर वाइल्ड, आयरिश कविन,लेखक (१९००)
३. कुलदीप मानक, भारतीय गायक (२०११)
४. वामनराव कृष्णाजी चोरघडे, भारतीय साहित्यिक (१९९५)
५. जर्बोम गॅमलिन, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री (२०१४)
६. रमेश दत्त, भारतीय इतिहासकार (१९०९)
७. पर्ताप शर्मा, भारतीय लेखक , नाटककार (२०११)
८. राजीव दिक्षित, भारतीय सामाजिक कार्यकर्ते (२०१०)
९. अहमदिऊ आहिदो, कॅमेरून देशाचे राष्ट्राध्यक्ष (१९८९)
१०. पिएरे बर्टन, कॅनडाचे लेखक (२००४)
११. पॉल वॉकर, हॉलिवूड चित्रपट अभिनेते (२०१३)
१२. जॉर्ज एच. डब्लू. बुश, अमेरिकेचे ४१वे राष्ट्राध्यक्ष (२०१८)

घटना

१. पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. (१९९६)
२. बार्बाडोसाला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९६६)
३. कलकत्ता येथे आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्यूची स्थापना करण्यात आली. (१९१७)
४. मेक्सिकोने फ्रान्स विरुद्ध युद्ध पुकारले. (१८३८)
५. एक्सॉन मोबिल यांच्यामध्ये ७३.७ बिलियन डॉलर्सचा करार झाला , त्यानंतर एक्सॉनमोबिल ही जागतिक दर्जाची सर्वात मोठी कंपनी तयार झाली. (१९९८)
६. ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म संपल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. (१९९५)
७. वलादिमिर वोऱ्यकीन यांना आयकाँनस्कॉप टीव्ही सिस्टिमचे पेटंट मिळाले. (१९२८)
८. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला गेला, यामध्ये ८लोक मृत्यूमुखी पडले. (१९५७)
९. रॉल अल्फॉन्सिन हे अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९८३)
१०. अफगाणिस्तानने संविधान स्वीकारले. (१९८७)
११. तबारे वस्क्वीज हे उरुग्वेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (२०१४)


महत्व

१. International Computer Security Day
२. Cities Of Life Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...