मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २९ नोव्हेंबर || Dinvishesh 29 November ||




जन्म

१. नेहा पेंडसे, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८४)
२. गोपीनाथ तळवलकर, भारतीय मराठी बालसाहित्यिक, आनंद मासिकाचे संपादक (१९०७)
३. ख्रीस्टियन डॉपलर, ऑस्ट्रेलियन भौतिकशास्त्रज्ञ (१८०३)
४. वारीस पठाण, भारतीय राजकीय नेते (१९६८)
५. प्रभाकर नारायण पाध्ये, भारतीय लेखक, पत्रकार (१९२६)
६. लुईसा मे अल्कॉट, अमेरिकन लेखिका (१८३२)
७. एरलं सुटेरलॅड, नोबेल पारितोषिक विजेते शरिरविज्ञानशास्त्रज्ञ (१९१५)
८. जक्स शिरॉक, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१९३२)
९. बेजी केड इसेब्सी, टूनिशियाचे राष्ट्राध्यक्ष (१९२६)
१०. सदानंद विश्वनाथ, भारतीय क्रिकेटपटू (१९६२)
११. एन. एस. क्रीश्णन, भारतीय तमिळ चित्रपट अभिनेते (१९०८)
१२. ठक्कर बाप्पा, भारतीय समाजसेवक (१८६९)
१३. शुभेंदू चॅटर्जी, भारतीय बंगली चित्रपट अभिनेते (१९३६)
१४. प्रथमेश परब, भारतीय मराठी चित्रपट अभिनेते (१९९३)


मृत्यू

१. गोविंद सखाराम सरदेसाई, भारतीय मराठी इतिहासकार (१९५९)
२. कृष्णाजी नारायण आठल्ये, कोकीळ मासिकाचे संपादक, ग्रंथकार (१९२६)
३. जे. आर. डी. टाटा, भारतीय उद्योगपती (१९९३)
४. बाया कर्वे, महर्षी आण्णासाहेब कर्वे यांच्या पत्नी (१९५०)
५. इंदिरा गोस्वामी, भारतीय कवयत्री, साहित्यिक (२०११)
६. जिन डायुडोंन, फ्रेन्च गणितज्ञ (१९९२)
७. जॉर्ज होरेसन, ब्रिटिश गायक, गीतकार (२००१)
८. प्रथमेश चंद्रा बरुआ, भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक (१९५१)
९. माधव त्र्यंबक पटवर्धन, भारतीय मराठी कवी, लेखक (१९३९)
१०. जॉन नॉलेस, अमेरिकन लेखक (२००१)

घटना


१. युगोस्लाविया हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले. (१९४५)
२. सर जेम्स जे यांनी अदृश्य शाईचा शोध लावला. (१७७५)
३. इंग्लंडमध्ये शिक्षण सक्तीचे केल्याचे सरकारने जाहीर केले. (१८७०)
४. थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफचे प्रात्यक्षिक दाखवले. (१८७७)
५. मायकेल जोसेफ सेवेग हे न्यूझीलंडचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९३५)
६. अटारी यांनी पोंग हा गेम प्रकाशित केला. (१९७२)
७. रॉबर्ट मॅकनेमार हे जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. (१९६७)
८. रॉबर्ट मुल्डून हे न्यूझीलंडचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९७५)
९. राजीव गांधी यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. (१९८९)


महत्व

१. International Day Of Solidarity With The Palestinian People
२. Electronic Greetings Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...