मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २८ नोव्हेंबर || Dinvishesh 28 November ||



जन्म

१. यामी गौतम, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८८)
२. आर्तुरो फ्राँडीसी, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१९०८)
३. भागवत झा आझाद, बिहारचे मुख्यमंत्री (१९२२)
४. ईशा गुप्ता, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८५)
५. जे. सी. डॅनिएल, भारतीय चित्रपट निर्माता (१९००)
६. रामकृष्णबुवा वझे, भारतीय गायक, अभिनेते (१८७२)
७. अलेक्सांडर रँकोविक, युगोस्लावियाचे राष्ट्राध्यक्ष (१९०९)
८. चंद्र कुमार अगरवाल, भारतीय लेखक (१८६७)
९. विश्वास पाटील, भारतीय मराठी लेखक, साहित्यिक (१९५९)
१०. प्रतिक बब्बर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८६)


मृत्यू

१. संदीप उन्नीकृष्णन, भारतीय सैन्य अधिकारी (२००८)
२. पांडुरंग महादेव बापट, भारतीय सशस्त्र क्रांतीकारक (१९६७)
३. त्र्यंबक शेजवाळकर, भारतीय इतिहासकार (१९६३)
४. वॉशिंग्टन आयर्विंग, अमेरिकेचे लेखक (१८५९)
५. इंन्रिको फेरमी, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९५४)
६. अनंत काणे, भारतीय नाटक निर्माते (२००१)
७. चंद्र कृष्ण डे, भारतीय गायक , संगीत संयोजक ,अभिनेते (१९६२)
८. महात्मा फुले, भारतीय समाजसुधारक (१८९०)
९. मिटजा रीबिसिक, युगोस्लावियाचे पंतप्रधान (२०१३)
१०. हनुमानप्रसाद मिश्रा, बनारस घराण्याचे सारंगी वादक (१९९९)
११. जेम्स नेस्मिथ, बास्केटबॉलचे निर्माता (१९३९)
१२. झिग झॅगलर, अमेरीकन लेखक (२०१२)

घटना

१. पूर्व तिमोरला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले. (१९७५)
२. पनामाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले. (१८२१)
३. मॉरिटानियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले. (१९६०)
४. अरिस्तीदे ब्रिअंड यांनी फ्रान्सच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. (१९२५)
५. डॉमिनिकन रिपब्लिकने आपले संविधान स्वीकारले. (१९६६)
६. दक्षिण आफ्रिकेचे बोइंग ७४७ हे विमान इंडीयन ओसियन मध्ये अपघातग्रस्त झाले. यामध्ये १५०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९८७)
७. सीरिया मध्ये झालेल्या दोन बॉम्ब स्फोटात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१२)


महत्व

१. Red Planet Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...