मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २७ नोव्हेंबर || Dinvishesh 27 November ||



जन्म

१. हरिवंशराय बच्चन, भारतीय लेखक ,कवी , साहित्यिक (१९०७)
२. अँडर्स सेल्सिअस, स्वीडिश खगोलशास्त्रज्ञ, संशोधक (१७०१)
३. सुरेश रैना , भारतीय क्रिकेटपटू (१९८६)
४. गणेश वासुदेव मावळंकर, लोकसभेचे पहिले सभापती (१८८८)
५. बप्पी लहरी, भारतीय गायक, संगीतकार, गीतकार (१९५२)
६. चार्ल्स स्कॉट शेरिंग्टन, नोबेल पारितोषिक विजेते जीवरसायनशास्त्रज्ञ (१८५७)
७. दत्तात्रय बळवंत पारसनीस, भारतीय इतिहास संशोधक (१८७०)
८. भूषण कुमार, टी सिरिजचे मॅनेजींग डायरेक्टर (१९८१)
९. कैम वेइस्मंन, इस्राएलचे राष्ट्राध्यक्ष (१८७४)
१०. जतींद्रमोहन बागची,  भारतीय बंगाली कवी, लेखक (१८७८)
११. ब्रूस ली, अमेरिकन अभिनेता, मार्शल आर्टिस्ट (१९४०)
१२. दिगंबर बाळकृष्ण मोकाशी, भारतीय मराठी कथा कादंबरीकार (१९१५)
१३. दामोदर बोताडकर, भारतीय गुजराती लेखक, कवी (१८७०)
१४. गौतम गुलाटी, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९८७)
१५. कोन्सुके मत्सूशीत, Panasonic कंपनीचे संस्थापक (१८९४)
१६. जेनिफर मिस्त्री, भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री (१९७८)

मृत्यू

१. दिगंबर विनायक पुरोहित, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक (१९९४)
२. लेओन मब्बा, गॅबॉन देशाचे राष्ट्राध्यक्ष (१९६७)
३. विश्वनाथ प्रताप सिंग, भारताचे ७वे पंतप्रधान (२००८)
४. शिवमंगल सिंग सुमन, भारतीय कवी ,लेखक (२००२)
५. युगेन ऑनील, नोबेल पारितोषिक विजेते नाटककार (१९५३)
६. डिर्क गीर, नेदरलँडचे पंतप्रधान (१९६०)
७. रॉस मॅक्वाहिरटर, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे सहसंस्थापक (१९७५)
८. उस्ताद सुल्तान खान, भारतीय सारंगी वादक (२०११)
९. लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका , राष्ट्रसेविका (१९७८)
१०. संजय जोग, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९५)
११. बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर, भारतीय साहित्यिक, दैनिक गोमंतकचे संपादक (२०००)

घटना

१. अमेरिकन स्टॅटिस्टीकल असोसिएशनची स्थापना बॉस्टन येथे करण्यात आली. (१८३९)
२. पोलंडने संविधान स्वीकारले. (१८१५)
३. स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांनी नोबेल पुरस्कार स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली. (१८९५)
४. अल्बेनियाने आपला राष्ट्रध्वज स्वीकारला. (१९१२)
५. लग्नान्सी पडेरिविस्की यांनी पोलंडच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. (१९१९)
६. होंडा मोटर कंपनीची स्थापना अमेरिकेत झाली. (१९४८)
७. उरुग्वे देशाने आपले संविधान स्वीकारले. (१९६६)
८. लुईस लॅसेल्ले हे उरुग्वेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९८९)

महत्व

१. International Aura Awareness Day
२. Turtle Adoption Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...