मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २६ नोव्हेंबर || Dinvishesh 26 November ||



जन्म

१. राजा ठाकूर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९२३)
२. व्हर्गिस कुरियन, अमुलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे संस्थापक (१९२१)
३. कार्ल झिर्गलेर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८९८)
४. व्रजलाल शास्त्री, भारतीय गुजराती लेखक (१८२५)
५. मुन्नवर राणा, भारतीय उर्दू कवी, लेखक (१९५२)
६. क्रिस ह्युजेस, फेसबुकचे सहसंस्थापक (१९८३)
७. ग्रेगोरियो अल्वरेझ, उरुग्वेचे राष्ट्राध्यक्ष (१९२५)
८. चंद्रकांत कामत, भारतीय संगीतकार, तबला वादक (१९३३)
९. अर्जुन रामपाल, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७२)
१०. वेलुप्पल्ली प्रभाकरन , एल. टी. टी. ई. चे संस्थापक (१९५४)
११. अडॉल्फो एस्क्विवेल, नोबेल शांतता पुरस्कार विजेते समाजसुधारक, चित्रकार (१९३१)
१२. अब्दुल्ला बदावी, मलेशियाचे पंतप्रधान (१९३९)
१३. देबेनद्रा मोहन बोस, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१८८५)
१४. रोडणी जोरी, ऑस्ट्रेलियन भौतिकशास्त्रज्ञ (१९३८)
१५. प्रभाकर नारायण पाध्ये, भारतीय लेखक ,कादंबरीकार (१९२६)
१६. राम शरण शर्मा, भारतीय इतिहासकार (१९१९)
१७. मॉरिस मॅकडोनाल्ड, मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक (१९०२)


मृत्यू

१. हेमंत करकरे, भारतीय पोलिस अधिकारी (२००८)
२. थॉमस अंड्र्यूज, आयरिश रसायनशास्त्रज्ञ (१८८५)
३. गोपाळ गोडसे, नथुराम गोडसे यांचे लहान भाऊ (२००५)
४. हेन्री स्ल्टज, अमेरिकन अर्थतज्ञ (१९३८)
५. अल्बर्ट सारॉट, फ्रान्सचे पंतप्रधान (१९६२)
६. यशवंत दिनकर पेंढारकर, भारतीय मराठी कवी ,लेखक (१९८५)
७. अशोक कामटे, भारतीय पोलिस अधिकारी (२००८)
८. विजय साळसकर, भारतीय पोलिस अधिकारी (२००८)
९. चंद्रकांत कृष्णाजी जगताप, भारतीय शिल्पकार (२००१)
१०. तुकाराम ओबळे, भारतीय पोलिस अधिकारी (२००८)
११. सादिक अल महदी, सुडानचे पंतप्रधान (२०२०)

घटना

१. भारतात मुंबई या शहरात विविध ठिकाणी लष्कर - ए- तैय्यबा या पाकिस्तानमधील दहशदवादी  संघटनेने आतंकवादी हल्ला केला, यामध्ये १५०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर ३००हून अधिक लोक जखमी झाले. (२००८)
२. भारताची घटना मंजूर करण्यात आली. (१९४९)
३. लेबनॉन या देशाला स्वातंत्र्य मिळाले. (१९४१)
४. ग्रीसने जर्मनी सोबत युद्ध पुकारले. (१९१६)
५. महाराष्ट्रात संविधान दिवस म्हणून पहिल्यांदाच साजरा करण्यात आला. (२००८)
६. भारताचे राष्ट्रपती, शास्त्रज्ञ डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. (१९९७)
७. मोजविस्की यांनी पोलंडच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. (१९९०)
८. दिल्ली येथे ९वी आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. (१९८२)

महत्व

१. International Systems Engineer Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...