मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २४ नोव्हेंबर || Dinvishesh 24 November ||




जन्म

१. सलीम खान, भारतीय चित्रपट अभिनेते, पटकथा लेखक (१९३५)
२. झकारी टेलर, अमेरिकेचे १२वे राष्ट्राध्यक्ष (१७८४)
३. अमोल पालेकर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४४)
४. केशव मेश्राम, भारतीय मराठी कवी,लेखक नाटककार (१९३७)
५. अंटनिओ कार्मोना, पोर्तुगालचे पंतप्रधान (१८६९)
६. इटझॅक बेन-जेवी, इस्राएलचे राष्ट्राध्यक्ष (१८८४)
७. सेलिना जेटली, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८१)
८. अन्वरा तैमूर, आसामच्या मुख्यमंत्री (१९३६)
९. सलाबत जंग, मुघल साम्राज्याचे नवाब (१७१८)
१०. अरुंधती रॉय, भारतीय लेखिका (१९६१)
११. ट्सुंग डाओ ली, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२६)
१२. विल्यम वेबल एलिस, रग्बी फुटबॉलचे जनक (१८०६)


मृत्यू

१. उमादेवी खत्री ,टूनटून, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००३)
२. मारोतराव कन्नमवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (१९६३)
३. विल्यम लंब, इंग्लंडचे पंतप्रधान (१८४८)
४. जमुना बारुआ, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००५)
५. आर्थर हैली, ब्रिटिश लेखक (२००४)
६. जॉर्जस क्लेमेन्सऊ, फ्रान्सचे पंतप्रधान (१९२९)
७. रॉबर्ट सिसिल, नोबेल पारितोषिक विजेते राजकीय नेते ,वकील (१९५८)
८. ॲन्ना जर्विस, मदर्स डेच्या संस्थापिका (१९४८)
९. हिराम मॅक्सिम, मॅक्सिम तोफेचे जनक (१९१६)
१०. समाक सुंदरावेज, थायलंडचे पंतप्रधान (२००९)
११. गुरू तेगबहादुर, शीख धर्मियांचे ९वें धर्मगुरु (१६७५)


घटना

१. जळगाव नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. (१८६४)
२. महाराणी ताराबाईंनकडून छत्रपती राजारामस यांस कैद करण्यात आले. (१७५०)
३. अपोलो १२ हे अंतराळयान पुन्हा पृथ्वीवर परतले. (१९६९)
४. जोसेफ ग्लिद्देन यांनी काटेदार तारेच पेटंट केलं. (१८७४)
५. तुर्कस्तानमध्ये झालेल्या तीव्र भूकंपात ५०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९७६)
६. इलियास ह्रावी हे लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९८९)
७. राच्मोन नाबिजेव हे ताझिकिस्तांचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९९१)
८. चार्ल्स डार्विन यांनी आपल्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारे पुस्तक ओरिजिन ऑफ द स्पिशिज प्रकाशित केले. (१८५९)


महत्व

१. DB Cooper Day
२. Celebrate Your Unique Talent Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...