मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २३ नोव्हेंबर || Dinvishesh 23 November ||



जन्म

१. अमृता खानविलकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४)
२. फ्रँकलिन पिर्से, अमेरिकेचे १४वे राष्ट्राध्यक्ष (१८०४)
३. अक्किनेनी नागा चैतन्य, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९८६)
४. जोहंनेस व्हॅन देर वाल्स, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८३७)
५. ना. सं. इनामदार, भारतीय लेखक (१९२३)
६. कार्ल ब्रंतींग, नोबेल पारितोषिक विजेते राजकीय नेते (१८६०)
७. निराद चौधुरी, भारतीय लेखक (१८९७)
८. साजिद खान, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७१)
९. सत्य साई बाबा, भारतीय धर्मगुरू (१९२६)
१०. निकोलस मादुरो, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (१९६२)
११. हर्षल पटेल, भारतीय क्रिकेटपटू (१९९०)
१२. मिले सायरस, अमेरिकन अभिनेत्री, गायिका (१९९२)
१३. गीता दत्त, भारतीय चित्रपट अभिनेत्री,गायिका (१९३०)
१४. वालचंद हिराचंद दोशी, भारतीय उद्योगपती (१८९७)

मृत्यू

१. कुमुद सदाशिव पोरे, भारतीय अर्थतज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या (१९९९)
२. जगदीशचंद्र बोस, नोबेल पारितोषिक विजेते वनस्पतीशास्त्रज्ञ (१९३७)
३. मरले ओबर्नोन, भारतीय अमेरिकेन चित्रपट अभिनेत्री (१९७९)
४. सीन ओकेली, आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष (१९६६)
५. युसुफ बिन इशाक, सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष (१९७०)
६. इद्रिस शाह, भारतीय लेखक (१९९६)
७. प्रकाश शास्त्री, भारतीय राजकीय नेते (१९७७)
८. नगुयेन व्हॅन टम, व्हिएतनामचे पंतप्रधान (१९९०)
९. दासरी योगानंद, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२००६)
१०. बाबुराव सडवेलकर, भारतीय चित्रकार, महाराष्ट्राचे कलासंचालक (२०००)
११. डग्लास नॉर्थ, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (२०१५)


घटना

१. चीनने संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत पहील्यांदाच भाग घेतला. (१९७१)
२. डकॉस दू हॉरोन यांनी कलर फोटोग्राफ बनवण्याच्या प्रक्रियेचे पेटंट केले. (१८६८)
३. जॉन ली लव यांनी पेन्सिल शार्पनरचे पेटंट केले. (१८९७)
४.  लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून प्रकाशित झाले. (१९३६)
५. आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला. (१९९२)
६. एमीले जान्सन हे बेल्जियनचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९३७)
७. कोकोज आयलंडस या द्वीप समूहाचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला. (१९५५)
८. अफगाणिस्तानमध्ये व्हॉलीबॉल प्रतियोगितेत झालेल्या तीव्र बॉम्बस्फोटात ४०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१४)


महत्व

१. International Image Consultant Day
२. Dr. Who Day !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...