मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २२ नोव्हेंबर || Dinvishesh 22 November ||




जन्म

१. मुलायम सिंग यादव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री (१९३९)
२. त्र्यं. वि. सरदेशमुख, भारतीय साहित्यिक (१९२२)
३. पॉल हेन्री दे कॉस्टंत, नोबेल पारितोषिक विजेते राजकीय नेते (१८५२)
४. किशोर साहू, भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता (१९१५)
५. आंद्रे गिड, नोबेल पारितोषिक विजेते लेखक, साहित्यिक (१८६९)
६. चार्ल्स दे गौल्ले, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१८९०)
७. कार्तिक आर्यन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८८)
८. झलकारी बाई, राणी लक्ष्मीबाई यांच्या महिला सैन्याच्या प्रमुख (१८३०)
९. दादासाहेब पोतनीस, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत (१९०९)
१०. सरोज खान, भारतीय नृत्य कोरिओग्राफर (१९४८)
११. पावलो गेंतीलोनी, इटलीचे पंतप्रधान (१९५४)
१२. स्कार्लेट जोहान्सन, हॉलिवूड चित्रपट अभिनेत्री (१९८४)
१३. मार्वेन अट्टापट्टू, श्रीलंकेचे क्रिकेटपटू (१९७०)
१४. डॉ. लक्ष्मीकांत झा, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर , अर्थतज्ञ (१९१३)
१५. हिराबाई पेडणेकर, भारतीय स्त्री नाटककार, गायिका (१८८५)


मृत्यू

१. सी. एस. नायडू, भारतीय क्रिकेटपटू (२००२)
२. सर आर्थर एडिग्टन, ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ (१९४४)
३. रवींद्र सदाशिव भट, भारतीय गीतकार (२००८)
४. एकनाथ पांडुरंग रेंदाळकर, भारतीय कवी ,लेखक ,संपादक (१९२०)
५. मास्टर तारा सिंघ, भारतीय राजकीय नेते (१९६७)
६. हर्मेश मल्होत्रा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२००५)
७. जॉन एफ. केनेडी, अमेरिकेचे ३५वे राष्ट्राध्यक्ष (१९६३)
८. पार्श्वनाथ आळतेकर, भारतीय नाट्यकर्मी (१९५७)
९. पी. गोविंद पिल्लई, भारतीय राजकीय नेते (२०१२)
१०. रेणे मोअवड, लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष (१९८९)
११. किम युंग- सम, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष (२०१५)


घटना

१. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या करण्यात आली. (१९६३)
२. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाची स्थापना करण्यात आली. (१९६५)
३. नायजेरिया मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेवर हल्ला झाला यामध्ये १०० लोक मृत्यूमुखी पडले. (१९९७)
४. लेबनॉन हा देश फ्रान्स पासून स्वतंत्र झाला. (१९४३)
५. आर्थर नाईट यांनी स्टील शाफ्ट गोल्फ क्लबचे पेटंट केले. (१९१०)
६. मार्शल जोझेफ पिल्सुडकी हे पोलंडचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९१८)
७. मुंबईमध्ये झालेल्या चक्रीवादळात कित्येक लोक मृत्यमुखी पडले तर १००हून अधिक लोक जखमी झाले. (१९४८)
८. अल्जीरिया मध्ये संविधान अमलात आले. (१९७६)
९. थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. (१९६३)
१०. कोलोराडो मध्ये डेनव्हर या शहराची स्थापना करण्यात आली. (१८५७)
११. अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवडून आल्या. (२००५)


महत्व

१. Start Your Own Country Day- United States
२. Go For A Ride Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...