मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २० नोव्हेंबर || Dinvishesh 20 November ||




जन्म

१. सुहासिनी मुळे, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५०)
२. विल्फ्रेड लॉरेर, कॅनडाचे पंतप्रधान (१८४१)
३. शुरहोझेली लिएझियटसू, नागालँडचे मुख्यमंत्री (१९३६)
४. सेल्मा लेजर्लोफ, नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका,साहित्यिक (१८५८)
५. टिपू सुलतान, म्हैसूरचा राजा (१७५०)
६. वसंत पोतदार, भारतीय साहित्यिक (१९३९)
७. मोरो गणेश लोंढे, भारतीय कवी, लेखक (१८५४)
८. कार्ल फ्रिश्च, नोबेल पारितोषिक विजेते मधमाशी तज्ञ (१८८६)
९. कवी कांत, भारतीय गुजराती लेखक, कवी (१८६७)
१०. सतीश चंद्रा, भारतीय इतिहासकार (१९२२)
११. शिल्पा शिरोडकर, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९६९)
१२. नदिन गोर्दिमर, नोबेल पारितोषिक विजेते लेखक, साहित्यिक (१९२३)
१३. अंदर्झेज सचॅली, नोबेल पारितोषिक विजेते अंतस्त्रावी ग्रंथी वैज्ञानिक (१९२६)
१४. जो बाईडन, अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष (१९४२)
१५. तुषार कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७६)


मृत्यू

१. हिराबाई बडोदेकर, किराणा घराण्याच्या गायिका (१९८९)
२. दत्ता महाडिक पुणेकर, महाराष्ट्राचे तमाशा कलावंत (१९९९)
३. यशवंत देशपांडे, भारतीय मराठी संशोधक (१९७०)
४. लिओ टॉलस्टॉय, रशियन साहित्यिक, लेखक (१९१०)
५. दत्तात्रेयशास्त्री तांबे , भारतीय संस्कृत शास्त्र अभ्यासक (१९९८)
६. एडविन हॉल, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ (१९३८)
७. फ्रान्सिस विल्यम, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९४५)
८. कन्हैयालाल दत्त, बंगालमधील क्रांतिकारक (१९०८)
९. अल्फोन्सो पूमारेजो, कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष (१९५९)
१०. जॉन मॅकवीन , ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९८०)
११. ट्रीग्वे ब्रटी, नॉर्वेचे पंतप्रधान (१९८४)
१३. आरोन क्लग, नोबेल पारितोषिक विजेते सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (२०१८)


घटना

१. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित झाला. (१९९८)
२. न्यूजर्सी अमेरिकेचे पहिले राज्य बनले. (१७८९)
३. विल्लार्ड बुंडी यांनी टाईम कार्ड घड्याळाचे पेटंट केले. (१८८८)
४. युक्रेन प्रजासत्ताक राष्ट्र घोषित झाले. (१९१७)
५. अमेरिकेच्या कोलंबिया अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाश मोहिमेवर निघाली. (१९९७)
६. बुरुंडी देशाने आपले संविधान स्वीकारले. (१९८१)
७. अफगाणिस्तान राष्ट्राध्यक्ष बब्रक कर्माल यांनी देशातून पलायन केले. (१९८६)
८. थॉमस एडिसन यांनी ग्रामोफोनचा शोध लावला. (१८७७)
९. युनायटेड नेशन्सने बालहक्कांच घोषणा पत्रांची दखल घेतली. (१९५९)


महत्व

१. Universal Children's Day
२. International Transgender Day Of Remembrance
३. Africa Industrialization Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...