मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २ नोव्हेंबर || Dinvishesh 2 November ||




जन्म

१. शाहरुख खान, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९६५)
२. जेम्स कनॉक्स पॉल्क, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१७९५)
३. महेंद्रलाल सरकार, भारतीय बंगाली डॉक्टर (१८३३)
४. अनु मलिक, भारतीय गायक , संगीतकार (१९६०)
५. वॉरेन हर्डींग, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८६५)
६. आगा खान, ऑल इंडिया मुस्लिम लीगचे सहसंस्थापक (१८७७)
७. डायना पेंटी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८५)
८. ओड्यासेस एलीतीस, नोबेल पारितोषिक विजेते साहित्यिक ,लेखक (१९११)
९. हेन्री नम्फी, हैतीचे राष्ट्राध्यक्ष (१९३२)
१०. मेल्विन स्वार्ड्झ, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९३२)
११. ईशा देओल, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८१)
१२. अरुण गौरी, भारतीय केंद्रीय मंत्री ,राजकीय नेते (१९४१)
१३. योगेश्वर दत्त, भारतीय कुस्तीपटू (१९८२)


मृत्यू

१. बळवंत पांडुरंग किर्लोस्कर, भारतीय मराठी संगीत नाटककार (१८८५)
२. शरदचंद्र मुक्तिबोध, भारतीय मराठी साहित्यिक (१९८४)
३. जॉर्ज बर्नार्ड शॉ, नोबेल पारितोषिक विजेते साहित्यिक , लेखक (१९५०)
४. नगो दिन्ह दिएम्, दक्षिण व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष (१९६३)
५. श्रीराम शंकर अभ्यंकर, भारतीय गणितज्ञ (२०१२)
६. पीटर देब्ये, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९६६)
७. प्रा. गोपाळ तुळपुळे, ग्रीक साहित्याचे अभ्यासक (१९५४)
८. आबासाहेब गरवारे, गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक (१९९०)
९. झयेद बिन सुल्तान अल नह्यान, UAE चे पहिले राष्ट्राध्यक्ष (२००४)
१०. येरेन नायडू, भारतीय राजकीय नेते (२०१२)


घटना

१. दुसऱ्या महायुध्दात ग्रीसने इटली विरुद्ध युद्ध पुकारले. (१९४०)
२. पाकिस्तानने देशाचे नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान ठेवले. (१९५३)
३. रशियाने ऑट्टोमन साम्राज्य विरुद्ध युद्ध पुकारले. (१९१४)
४. वॉरेन हर्डिंग हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९२०)
५. कॅनाडियन ब्राॅडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली. (१९३६)
६. नगो दीन्ह दिएम यांना दक्षिण व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्ष पदावरून हटविण्यात आले आणि दक्षिण व्हिएतनामच्या सैन्याने त्यांना ठार केले. (१९६३)
७. पाकिस्तामधील लाहोर शहरात झालेल्या बॉम्ब स्फोटात ६०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर १००हून अधिक लोक जखमी झाले. (२०१४)


महत्व

१. International Day To End Impunity For Crimes Against Journalists

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...