मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १७ नोव्हेंबर || Dinvishesh 17 November ||




जन्म

१. रत्नाकर मतकरी, भारतीय मराठी लेखक, नाटककार (१९३८)
२. सूग्णे विग्नेर, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०२)
३. युसुफ पठाण, भारतीय क्रिकेटपटू (१९८२)
४. शोभना समर्थ, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९१६)
५. चंदा कोचर, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफ ICICI Bank, भारतीय उद्योजिका (१९६१)
६. शकुंतला महाजन, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९३२)
७. सोईचिरो होंडा, होंडा कंपनीचे सहसंस्थापक (१९०६)
८. इम्रात खान, भारतीय सितार वादक, संगीतकार (१९३५)
९. सीरील रमाफोसा, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९५२)
१०. मिथुन गणेशन, भारतीय चित्रपट अभिनेते , दिग्दर्शक (१९२०)
११. कमाल कुमार मजुमदार, भारतीय बंगाली लेखक (१९१४)


मृत्यू

१. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, (२०१२)
२. अशोक सिंघल, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष (२०१५)
३. कुसुमावती देशपांडे, भारतीय लेखिका, साहित्यिक (१९६१)
४. लाला लजपतराय, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, पंजाब केसरी (१९२८)
५. अक्षय मोहंती, भारतीय गायक , संगीतकार (२००२)
६. थॉमस पेल्हाम- हॉलेस, ब्रिटिश पंतप्रधान (१७६८)
७. हरप्रसाद शास्त्री, संस्कृत भाषा अभ्यासक, इतिहासकार (१९३१)
८. रॉबर्ट होफस्तस्टर, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९९०)
९. लॉईस फेलिक्स, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (२०००)
१०. गोपाळ कृष्ण देवधर, भारत सेवक समाजाचे सहसंस्थापक (१९३५)
११. संतोष महाडिक, भारतीय सैन्य अधिकारी (२०१५)
१२. देबाकी बोस, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७१)
१३. ओमप्रकाश वाल्मिकी, भारतीय लेखक, कवी (२०१३)
१४. सुरजित बिंद्राखिया, भारतीय पंजाबी गायक (२००३)

घटना

१. तिसऱ्या गोलमेज परिषदेला सुरुवात झाली. (१९३२)
२. पास्कल ऑर्टिझ रुबीओ हे मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९२९)
३. अमेरिकेने सोव्हिएत युनियनला मान्यता दिली. (१९३३)
४. डग्लस इंगेलबर्ट यांना पहिल्या कॉम्प्युटर माऊसचे पेटंट मिळाले. (१९७०)
५. ल्हामो डोड्रब हे १४वे दलाई लामा बनले. (१९५०)
६. रशिया मध्ये बोईंग ७३७ विमान दुर्घटनाग्रस्त झाले यामध्ये ५०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
७. ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन करण्यात आले, यानंतर इक्वेडोर आणि व्हेनेझुएला हे दोन देश अस्तित्वात आले. (१८३१)
८. गियर्गी मर्गेवेलाशिल हे जॉर्जियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (२०१३)
९. अब्दुल्ला यामीन हे मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१३)


महत्व

१. World Prematurity Awareness Day
२. International Students Day
३. International Happy Gose Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...