मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १६ नोव्हेंबर || Dinvishesh 16 November ||




जन्म

१. तेजस्वी सूर्या, भारतीय राजकीय नेते (१९९०)
२. श्रीराम लागू, भारतीय चित्रपट अभिनेते (१९२७)
३. जुल्स विओल्ले,फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (१८४१)
४. आदित्य रॉय कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८५)
५. ननामदी आझिकिवे, नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९०४)
६. मीनाक्षी शेषाद्री, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६३)
७. एल्पिदिओ क्विरिनो, फिलिपाइन्सचे ६वे राष्ट्राध्यक्ष (१८९०)
८. जोस सारमागो, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९२२)
९. संदीप कुलकर्णी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६४)
१०. बॉम्मिरेड्डी नरसिम्हा रेड्डी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९०८)
११. शिवकुमार जोशी, भारतीय गुजराती लेखक , अभिनेते (१९१६)
१२. धोंडो वासुदेव गद्रे, भारतीय कवी , लेखक (१८९४)


मृत्यू

१. सईद जाफरी, भारतीय चित्रपट अभिनेते (२०१५)
२. विष्णू गणेश पिंगळे , गदर पार्टीचे सदस्य, लाहोर कटातील क्रांतिकारक (१९१५)
३. डॉ. बॉब स्मिथ, अल्कोहोलिक्स अनोनिमसचे सहसंस्थापक (१९५०)
४. मॅक्स अब्राहम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१९२२)
५. राजेश पीटर, भारतीय क्रिकेटपटू (१९९५)
६. जयान, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८०)
७. गुलशन नंदा, भारतीय लेखक ,पटकथा लेखक (१९८५)
८. टोमाज्स अर्कीझेव्स्की, पोलंडचे पंतप्रधान (१९५५)
९. डॅनिएल नाथांस, नोबेल पारितोषिक विजेते सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (१९९९)
१०. हेन्री टॉबे, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (२००५)
११. रोशनलाल नागराथ, भारतीय संगीतकार (१९६७)
१२. मिल्टन फ्रीडमन, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (२००६)


मृत्यू

१. ओक्लाहोमा हे अमेरिकेचे ४६वे राज्य बनले. (१९०७)
२. UNESCO ची स्थापना करण्यात आली. (१९४५)
३. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी - मुंबई मार्गाचा शुभारंभ करण्यात आला. (१९९६)
४. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष गेटुलिओ वर्गास यांनी स्वतःला ब्राझीलचा हुकूमशहा घोषित केले. (१९३३)
५. कुवेत हे पहिले प्रजासत्ताक मुस्लिम राष्ट्र बनले. (१९६२)
६. क्लाऊस लोहांनिस हे रोमानियाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (२०१४)
७. गोटाबाया राजपक्षा हे श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१९)
८. भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी २४ वर्षाच्या आपल्या कारकिर्दी नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. (२०१३)
९. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरी येथे स्पृश्यअस्पृश्यचे पहिले सहभोजन केले. (१९३०)

महत्व

१. International Day For Tolerance

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...