मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १५ नोव्हेंबर || Dinvishesh 15 November ||




जन्म

१. संजय राऊत, भारतीय राजकीय नेते (१९६१)
२. विद्या सिन्हा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४७)
३. सानिया मिर्झा, भारतीय टेनिसपटू (१९८६)
४. विल्यम पिट्ट द एल्डर, ब्रिटिश पंतप्रधान (१७०८)
५. ज्योती प्रकाश नीराला, अशोक चक्र सम्मानित भारतीय सैन्य अधिकारी (१९८६)
६. बिर्सा मुंडा, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८७५)
७. ख्रिस्तोफर होरणसृद, नॉर्वेचे पंतप्रधान (१८५९)
८. गेरहर्ट हौपत्मंन, नोबेल पारितोषिक विजेते लेखक , साहित्यिक (१८६२)
९. शिरीष अत्रे- पै, भारतीय मराठी कवयत्री , लेखिका (१९२९)
१०. दत्ता डावजेकर, भारतीय संगीतकार (१९१७)
११. सुहास शिरवळकर, भारतीय लेखक , कादंबरीकार (१९४८)
१२. व्ही. आर. कृष्णा अय्यर, भारतीय वकील , न्यायाधीश (१९१४)
१३. मवाई किबाकी, केनियाचे राष्ट्राध्यक्ष (१९३१)
१४. उस्ताद युनूस हुसेन खाँ, आग्रा घराण्याचे गायक (१९२७)
१५. कॉर्णेलिया सोरब्जी, भारतीय वकील , लेखिका (१८६६)


मृत्यु

१.नथुराम गोडसे (१९४९)
२. जोहांनेस केप्लर, जर्मन खगोलशास्त्रज्ञ (१६३०)
३. संग्यांग ग्यास्तो, ६वे दलाई लामा (१७०६)
४. डॅनिएल रुथरफोर्ड, स्कॉटिश भौतिकशास्त्रज्ञ (१८१९)
५. डॉ. माधवराव सूर्याजी पवार, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू (१९९६)
६. हेन्रीक सिंकिविक, नोबेल पारितोषिक विजेते लेखक, साहित्यिक (१९१६)
७. आल्फ्रेड वर्नर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९१९)
८. वोलोडीमुर इवशको, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष (१९९४)
९. आचार्य विनोबा भावे, भूदान चळवळीचे प्रणेते ,शिक्षक (१९८२)
१०. सौमित्र चॅटर्जी, भारतीय चित्रपट अभिनेते (२०२०)

घटना

१. झारखंड हे भारताचे २८वे राज्य तयार झाले. (२०००)
२. व्हेनेझुएला या देशाचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९४५)
३. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. (१९८९)
४. महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. (१९४९)
५. किंग सी. जिलेट यांनी आपल्या दाढी करण्याच्या जिलेट ब्लेडचे पेटंट केले. (१९०४)
६. मॅकेंझी किंग हे २२ वर्षांनंतर आपल्या पंतप्रधान पदावरून निवृत्त झाले. (१९४८)
७. लुईस लॉरेंट हे कॅनडाचे १२वे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९४८)
८. पोलांड आणि युगोस्लाविया मध्ये व्यापारी करार झाला. (१९५५)
९. Space x या अंतराळ संशोधन कंपनीने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर Falcon 9 ही लाँच वेहिकल प्रक्षेपित केली. (२०२०)

महत्व

१. Steve Irwin Day
२. Day Of The Imprisoned Writer

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...