मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १४ नोव्हेंबर || Dinvishesh 14 November ||




जन्म

१. पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान (१८८९)
२. रोहिणी भाटे, भारतीय कथ्थक नर्तिका (१९२४)
३. रघुवीर मुळगावकर, भारतीय चित्रकार (१९१८)
४. लिओ बॅकेलड, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ (१८६३)
५. फ्रेडरिक बेटिंग, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८९१)
६. निर्मल कुमार वर्मा , भारतीय नौसेना स्टाफ प्रमुख (१९५०)
७. एम. आर. आचरेकर, भारतीय फिल्म आर्ट डायरेक्टर (१९०५)
८. पिलो मोडी, भारतीय राजकीय नेते (१९२६)
९. एस. आर. बालसुब्रह्मण्यम, भारतीय राजकीय नेते (१९३८)
१०. लीलाधर जोशी, मध्य भारतचे (आत्ताचे उत्तर - पश्चिमी मध्य प्रदेश) मुख्यमंत्री (१९०७)
११. आदित्य बिर्ला, भारतीय उद्योगपती (१९४३)
१२. सिंधुताई सपकाळ, भारतीय समाजसेविका (१९४८)
१३. डॉमिनिक डे विल्लेपिन, फ्रान्सचे पंतप्रधान (१९५३)

मृत्यू


१. अभय चरणारविंदा भक्तिवेदांता स्वामी, भारतीय धर्मगुरु (१९७७)
२. गोटफ्रॉईड विल्हेल्म लेईबेनिझ, जर्मन गणितज्ञ (१७१६)
३. मनोहर सिंघ, भारतीय चित्रपट अभिनेते (२००२)
४. सुधीर भट, भारतीय चित्रपट निर्माता (२०१३)
५. नारायण हरी आपटे, भारतीय मराठी लेखक, साहित्यिक (१९७१)
६. सी. के. नायडू, भारतीय क्रिकेटपटू (१९६७)
७. बुकर टी वॉशिंग्टन, अमेरिकन निग्रो समाजसेवक, लेखक (१९१५)
८. हरी कृष्ण देवसरे, भारतीय लेखक ,पत्रकार (२०१३)
९. वेंगायील कुंहिरमान  नयानार, भारतीय मल्याळम लेखक (१९१४)
१०. अजित कुमार पांजा, भारतीय राजकीय नेते (२००८)
११. प्रा. योगेश्वर अभ्यंकर, भारतीय गीतकार, कवी (२०००)
१२. डॉ. मनिभाई भिमभाई देसाई, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९९३)

घटना

१. जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची स्थापना करण्यात आली. (१९६९)
२. स्पेनने पश्चिम सहारा सोडून दिले. (१९७५)
३. गेल बॉर्डन यांना दुधाची भुकटी तयार करण्याच्या प्रक्रियेचे पेटंट मिळाले. (१८५६)
४. स्पेनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करण्यात आली. (१९२१)
५. दुसऱ्या महायुध्दात जर्मन वायुदलाने इंग्लंड मधील कोवेट्री शहरावर बॉम्बहल्ला केला. (१९४०)
६. कॅनडामध्ये ऑलिम्पिक पदक तयार करण्यास सुरुवात झाली. (१९७३)
७. जेम्स ब्रूस यांनी नाईल नदीचा स्त्रोत शोधला. (१७७०)
८. ब्रिटिश ब्राॅडकास्टिंग कंपनीने इंग्लंड मध्ये रेडिओ सेवा देण्यास सुरुवात केली. (१९२२)

महत्त्व

१. Children's Day- India
२. World Diabetes Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...