मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १३ नोव्हेंबर || Dinvishesh 13 November ||




जन्म

१. वसंतदादा पाटील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (१९१७)
२. नोबुसुके किशी, जपानचे पंतप्रधान (१८९६)
३. गजानन माधव मुक्तीबोध, भारतीय हिंदी कवी,लेखक (१९१७)
४. जुही चावला, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६७)
५. इस्कंदर मिर्झा, पाकिस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष (१८९९)
६. गोविंद बल्लाळ देवल, भारतीय मराठी नाटककार (१८५५)
७. मकरंद दवे, भारतीय गुजराती कवी,लेखक (१९२२)
८. अमेय वाघ, भारतीय मराठी,हिंदी चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९८७)
९. बॅ. मुकुंद रामराव जयकर, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू (१८७३)
१०. हर्मन बावेजा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८०)
११. महाराजा रणजितसिंग, शीख साम्राज्याचे संस्थापक (१७८०)


मृत्यू

१. करुणा बॅनर्जी, भारतीय बंगाली चित्रपट अभिनेत्री (२००१)
२. जॉर्ज ग्रेनविल, ब्रिटिश पंतप्रधान (१७७०)
३. बी. एम. गफूर, भारतीय व्यंगचित्रकार (२००३)
४. इस्कंदर मिर्झा, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९६९)
५. कृष्णदयार्णव, भारतीय मराठी कवी,लेखक (१७४०)
६. स्वामी रामा, भारतीय योगगुरू (१९९६)
७. मार्गारेट मुरे, ॲग्लो इंडियन पुरातत्व वैज्ञानिक (१९६३)
८. अल्लान सॅन्डागे, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (२०१०)
९. गौरीश कैकिनी, भारतीय कन्नड लेखक, साहित्यिक (२००२)
१०. सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी, भारतीय ज्येष्ठ लेखिका (२००१)
११. ज्ञान मुखर्जी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९५६)

घटना

१. रविंद्रनाथ टागोर यांना स्वीडिश ॲकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पारितोषिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. (१९१३)
२. ग्रीसने नवीन संविधान स्वीकारले. (१८६४)
३. इजिप्त मध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध आंदोलन सुरू झाले. (१९३५)
४. फारूख लेघारी पाकिस्तानचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९९३)
५. पॅरिस मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १००हून अधिक लोक मारले गेले. (२०१५)
६. वामनराव पटवर्धन यांनी पुण्यात भोर संस्थान प्रजा सभा स्थापन केली. (१९२१)
७. सोविएत युनियनने AK 47 बंदूक तयार केली. (१९४७)


महत्व

१. World Kindness Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...