मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १२ नोव्हेंबर || Dinvishesh 12 November ||




जन्म

१. अमजद खान, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४०)
२. जॉन विल्यम स्ट्रट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८४१)
३. डॉ. सलीम अली, भारतीय पक्षितज्ञ (१८९६)
४. रमेश वांजळे, भारतीय राजकीय नेते (१९६५)
५. ग्रेस केल्ली, अमेरिकन अभिनेत्री (१९२९)
६. पांडुरंग महादेव बापट तथा सेनापती बापट, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८८०)
७. गंगाधर व्ही. चित्तल, भारतीय कन्नड कवी ,लेखक (१९२३)
८. श्रीधर जोशी, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९०४)
९. जलाल तलाबनी, इराकचे राष्ट्राध्यक्ष (१९३३)
१०. हसन रौहानी, इराणचे राष्ट्राध्यक्ष (१९४८)
११. ॲने हॅथवे, हॉलिवूड चित्रपट अभिनेत्री (१९८२)
१२. ऐश्वर्या ऋतुपर्ण प्रधान, भारताच्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला अधिकारी (१९८३)

मृत्यू

१. मधु दंडवते, भारतीय राजकीय नेते, अर्थतज्ञ (२००५)
२. फ्रेडरिक हॉफमन, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१७४२)
३. मॅन्युएल ओरीबे, उरुग्वेचे राष्ट्राध्यक्ष (१८५७)
४. रवी चोप्रा, भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक (२०१४)
५. पंडित मदन मोहन मालवीय, बनारस हिंदू विश्व विद्यालयाचे सहसंस्थापक (१९४६)
६. पर्सिवल लॉवेल, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (१९१६)
७. शाकेब जलाली, पाकिस्तानी कवी, लेखक (१९६६)
८. केशवराव जेधे, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, शेतकरी कामगार संघटनेचे सहसंस्थापक (१९५९)
९. स्टॅन ली, कॉमिक पुस्तकाचे लेखक, व्यंगचित्रकार (२०१८)
१०. मासतोशी कोशीबा, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (२०२०)

घटना

१. पहिल्या गोलमेज परिषदेला सुरुवात झाली. (१९३०)
२. सुदान, ट्युनिशिया , मोरोक्को या देशांनी संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश केला. (१९५६)
३. स्पेनचे पंतप्रधान जोस कनलेजास वाय मेंडिस यांची हत्या करण्यात आली. (१९१२)
४. १२ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दीन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. (२०००)
५. ऑस्ट्रिया प्रजासत्ताक राष्ट्र बनले. (१९१८)
६. डेव्हीड बेन- गुरिओन यांनी इस्राएलच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. (१९५३)
७. जपानमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात १५०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९६३)
८. लेबनॉन मध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात ४०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१५)

महत्व

१. World Pneumonia Day
२. राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिवस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...