मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १० नोव्हेंबर || Dinvishesh 10 November ||



जन्म

१. कुसुमावती देशपांडे, भारतीय मराठी लेखिका (१९०४)
२. केसरीनाथ त्रिपाठी, बिहारचे राज्यपाल (१९३४)
३. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सहसंस्थापक (१८४८)
४. दत्तोपंत थेंगडी, स्वदेशी जागरण मंचचे संस्थापक, भारतीय मजदुर संघाचे संस्थापक, भारतीय किसान संघाचे संस्थापक (१९२०)
५. जॉन थॉम्पसन, कॅनडाचे पंतप्रधान (१८४५)
६. ऐर्नस्ट फिश्चर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९१८)
७. रॉबर्ट एफ. एंगल, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९४२)
८. हांस मर्स, स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष (१९४२)
९. आशुतोष राणा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६७)
१०. मारिओ अब्दो बेनितेझ, पराग्वेचे राष्ट्राध्यक्ष (१९७१)
११. सुनंदा बलरामन, भारतीय लेखिका (१९५२)
१२. मिखाईल कलाशनिको, AK 47 चे निर्माता (१९१९)
१३. जॉर्ज जेनिग्स, फ्लश टॉयलेट्सचे निर्माता (१८१०)

मृत्यू

१. सुकुमार बोस, भारतीय कलाकार (१९८६)
२. सिंपल कपाडिया, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००९)
३. अफजलखान, विजापूरचा सरदार (१६५९)
४. गणेश सखाराम खरे, भारतीय गणितज्ञ, शिवकालीन जंत्रीचे कर्ते (१९२२)
५. माणिक वर्मा, भारतीय गायिका (१९९६)
६. विजयदन देठा, भारतीय लेखक (२०१३)
७. एच. एम. नायक, भारतीय लेखक (२०००)
८. मुस्तफा केमाल आतातुर्क, तुर्कीचे पहिले राष्ट्राध्यक्ष (१९३८)
९. कन्नान बनान, झिंबाब्वेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (२००३)
१०. ल. रा. पांगारकर, भारतीय संत चरित्रकार ,इतिहासकार (१९४१)

घटना

१. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केला. (१६५९)
२. भारताचे ८वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली. (१९९०)
३. ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता बंदर स्थानिक राजाकडून विकत घेतले. (१६९८)
४. ग्रणविल्ले टी वूड्स यांनी इलेक्ट्रिक रेल्वेचे पेटंट केले. (१८९१)
५. अनवर हॉक्सा हे अल्बेनियाचे हुकूमशहा झाले. (१९४५)
६. बिल गेट्स यांनी विंडोज १.० लाँच केले. (१९८३)
७. गुजरातमध्ये बडोद्याजवळ वेदसार येथे प्रायोगिक विहिरीमध्ये तेल सापडले. (१९५८)
८. मध्य प्रदेश सरकारतर्फे देण्यात येणारा तानसेन सन्मान पंडित सी. आर. व्यास यांना जाहीर करण्यात आला. (१९९९)


महत्व

१. World Science Day For Peace And Development
२. Windows Day
३. International Accounting Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...