मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १ डिसेंबर || Dinvishesh 1 December ||



जन्म

१. मोहम्मद कैफ, भारतीय क्रिकेटपटू (१९८०)
२. उदित नारायण, भारतीय गायक (१९५५)
३. मेरी तुस्सौद, मॅडम तुसो वक्स च्या संस्थापिका (१७६१)
४. लुंगतोक ग्यास्टो, ९वे दलाई लामा (१८०५)
५. बाळ सीताराम मर्ढेकर, भारतीय मराठी कवी ,लेखक (१९०९)
६. चार्ल्स बीरेंब्रॉउक, नेदरलँडचे पंतप्रधान (१८७३)
७. मेजर शैतान सिंघ, परमवीर चक्र सम्मानित भारतीय सैन्य अधिकारी (१९२४)
८. मार्टिन रोडबेल, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९२५)
९. हेमानंदा बिस्वाल, ओडिसाचे मुख्यमंत्री (१९३९)
१०. सिवामनी, भारतीय ताल वादक, संगीतकार (१९५९)
११. मेधा पाटकर, भारतीय समाजसेविका (१९५४)
१२. काका कालेलकर, भारतीय मराठी साहित्यिक लेखक (१८८५)
१३. मयुरी वाघ, भारतीय मराठी चित्रपट अभिनेत्री (१९८८)


मृत्यू

१. विजया लक्ष्मी पंडित, महाराष्ट्राच्या ६व्या राज्यपाल (१९९०)
२. प्राचार्य गंगाधर बाळकृष्ण सरदार, भारतीय मराठी लेखक, साहित्यिक (१९८८)
३. सुचेता कृपलानी, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री (१९७४)
४. डेव्हीड गुरियन, इस्राएलचे पंतप्रधान (१९७३)
५. अँटोनीओ सेग्नी, इटलीचे पंतप्रधान (१९७२)
६. जे. बी. एस. हल्डणे, ब्रिटिश वैज्ञानिक ,संशोधक (१९६४)
७. जॉर्ज स्टिग्लेर, नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ (१९९१)
८. शंकर त्र्यंबक धर्माधिकारी, भारतीय स्वातंत्र्य सेनानी , समाजसुधारक (१९८५)
९. संतिदेव घोष, भारतीय बंगाली लेखक , साहित्यिक (१९९९)
१०. जॅक कॉल्विन, अमेरिकन अभिनेते (२००५)

घटना

१. भारतीय सुरक्षा दल (BSF) ची स्थापना करण्यात आली. (१९६५)
२. नागालँड भारताचे १६वे राज्य बनले. (१९६३)
३. अँगोला या देशाचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९७६)
४. AIDS या विषाणूची पहील्यांदाच ओळख पटली. (१९८१)
५. झांबिया , मालावी , माल्टा या देशांचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९६४)
६. सॅटो डोमिंगो (डॉमिनिकन रिपब्लिकन) या देशास स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. (१८२१)
७. प्लुटरको एलियास कॅलिस हे मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९२४)
८. बेनझीर भुट्टो या पाकिस्तानच्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या, मुस्लिम देशाच्या त्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. (१९८८)
९. पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य मिळाले. (१९७३)


महत्व

१. World AIDS Day
२. Antarctica Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...