मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ९ ऑक्टोबर || Dinvishesh 9 October ||




जन्म

१. के. परासरण, भारताचे सॉलिसिटर जनरल (१९२७)
२. एमिल फिश्चर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८५२)
३. इवो अंड्रिक, नोबेल पारितोषिक विजेते लेखक साहित्यिक (१८९२)
४. एम. भक्तवत्सलम, मद्रास राज्याचे मुख्यमंत्री (१८९७)
५. गोपाबंधू दास, भारतीय समाजसेवक, राजकीय नेते ,लेखक (१८७७)
६. लिओपोल्ड सेंघोर, सेनेगलचे राष्ट्राध्यक्ष (१९०६)
७. पीटर मॅन्सफिल्ड, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९३३)
८. अमजद अली खान, भारतीय सरोद वादक (१९४५)
९. हेनझ फिश्चेर, ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष (१९३८)
१०. जॉन लेनन, ब्रिटिश गायक , गीतकार, संगीतकार (१९४०)
११. खुदीराम दास, भारतीय तत्त्ववेत्ते , शिक्षणतज्ञ (१९१६)
१२. शुक्री घनेम, लिबियाचे पंतप्रधान (१९४२)
१३. डेव्हीड कॅमेरॉन, ब्रिटिश पंतप्रधान (१९६६)
१४. जगदीश जोशी, गुजराती कवी,लेखक (१९३२)
१५. झाहीदा हुसेन, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४४)


मृत्यू

१. रघुमुद्री श्रीहरी, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट (२०१३)
२. जयवंत पाठारे, भारतीय सिनेमाऑटोग्राफर (१९९८)
३. विनायक कोंडदेव ओक, भारतीय साहित्यिक (१९१४)
४. बेंजामिन बॅनेकर, आफ्रिकन खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ (१८०६)
५. गोविंदराव टेंबे, भारतीय चित्रपट अभिनेते, संगीतकार (१९५५)
६. एस. एस. चंद्रन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (२०१०)
७. कांशी राम, भारतीय राजकीय नेते, वकील (२००६)
८. पिटर झीमन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९४३)
९. एमिलियो मेदिसी, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९८५)
१०. अॅलेक डग्लस- होम , ब्रिटिश पंतप्रधान (१९९५)
११. गुरू गोपीनाथ, भारतीय कथकली नर्तक (१९८७)
१२. विल्फ्रेड मार्टिन्स, बेल्जियमचे पंतप्रधान (२०१३)
१३. रावबहादूर गोपाळ हरी देशमुख, भारतीय पत्रकार, समाजसुधारक , इतिहासकार (१८९२)

घटना

१. संपूर्ण भारतीय बनावटीचे मिग विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्त करण्यात आले. (१९७०)
२. रिकार्डो अरांगो हे पनामाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९४१)
३. ब्रिटिश सैन्याने पुन्हा अंदमान निकोबार बेटांवर आपला ताबा मिळवला. (१९४५)
४. पर्शियाने फ्रान्स विरुद्ध युद्ध पुकारले. (१८०६)
५. युगांडा देश ब्रिटिश सत्तेतून स्वतंत्र झाला. (१९६२)
६. कोण्राड अॅडेनाॅर हे पश्चिम जर्मनीचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९५३)
७. ब्रिटिश पंतप्रधान हॅराॅल्ड मॅकमिलन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांच्या जागी अॅलेक डग्लस - होम यांनी पदभार स्वीकारला. (१९६३)
८. फ्रान्समध्ये मृत्युदंडाची शिक्षा बंद करण्यात आली. (१९८१)
९. पाकिस्तानी समाजसेविका मालाला युसुफजाई यांच्यावर तालिबान्यांनी हल्ला केला. (२०१२)


महत्व

१. World Post Day
२. International Beer And Pizza Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...