मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ६ ऑक्टोबर || Dinvishesh 6 October ||




जन्म

१. विनोद खन्ना, भारतीय चित्रपट अभिनेते, राजकीय नेते (१९४६)
२. भजन लाल, हरयाणाचे मुख्यमंत्री (१९३०)
३. अर्नेस्ट वॉल्टन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०३)
४. जितन राम मांझी, बिहारचे मुख्यमंत्री (१९४४)
५. निलंबर देव शर्मा , पद्मश्री पुरस्कार विजेते लेखक (१९३१)
६. हाफीज अल असाद, सीरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९३०)
७. संजय मिश्रा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६३)
८. रिकार्डो गिअकॉनी, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९३१)
९. सलील कुलकर्णी, भारतीय संगीतकार ,गायक , गीतकार (१९७२)
१०. सनी सिंघ, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८५)
११. टोनी ग्रेग, इंग्लंडचे क्रिकेटपटू (१९४६)
१२. डॉ. रत्नाकर मंचरकर, भारतीय संत साहित्याचे अभ्यासक (१९४३)


मृत्यू

१. बाबासाहेब भोसले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (२००७)
२. व्ही. के. कृष्ण मेनन, भारतीय केंद्रीय मंत्री (१९७४)
३. गुरू हर राय, शिखांचे सातवे गुरू (१६६१)
४. पी. सुब्बरायन, मद्रासचे ( तामिळनाडू ) मुख्यमंत्री (१९६२)
५. लजोस बत्थेनी, हंगेरीचे पहिले पंतप्रधान (१८४९)
६. आल्फ्रेड टेनिसन, ब्रिटिश कवी लेखक (१८९२)
७. चित्ताजल्लू पुल्लय्या, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९६७)
८. ऑगस्ते बीर्नर्त, बेल्जियमचे पंतप्रधान (१९१२)
९. ऑटो मेरहोफ, नोबेल पारितोषिक विजेते जीवरसायनशास्त्रज्ञ (१९५१)
१०. अनवर सादात, नोबेल पारितोषिक विजेते राजकीय नेते , इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष (१९८१)


घटना

१. पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली येथे उपकेंद्र सुरू करण्यात आले. (१९६३)
२. फिजी हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले. (१९८७)
३. अमेरिकेचे ओत्रांतो नामक जहाज स्कॉटलंड समुद्र पट्टीत बुडाले यामध्ये ४००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९१८)
४. PEN International या जागतिक लेखक संघटनेची स्थापना लंडन येथे करण्यात आली. (१९२१)
४. इजिप्त आणि सीरियाने इस्राइलवर हल्ला केला. (१९७३)
५. युगोसलावियाचे राष्ट्राध्यक्ष सलोबोडण मिलोसेविक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (२०००)
६. केविन सिस्त्रॉम् आणि माईक क्रियेगर यांनी इंस्टाग्राम हे सोशल नेटवर्किंग ॲप्लिकेशन लाँच केले. (२०१०)
७. वॉर्नर ब्रदर्सचा जॅझ सिगर हा जगातील पहिला बोलपट प्रदर्शित करण्यात आला. (१९२७)

महत्व

१. World Cerebral Palsy Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...