मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ५ ऑक्टोबर || Dinvishesh 5 October ||




जन्म

१. राणी दुर्गावती, गोंडवानाच्या महाराणी (१५२४)
२. कैलाशपती मिश्रा, गुजरातचे राज्यपाल (१९२३)
३. माधव आपटे, भारतीय क्रिकेटपटू (१९३२)
४. अदील हुसैन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६३)
५. वॉशिंग्टन सुंदर, भारतीय क्रिकेटपटू (१९९९)
६. चेस्टर ए. आर्थर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८२९)
७. रिने कॅसिन, नोबेल शांतता पुरस्कार विजेते फ्रेंच वकील (१८८७)
८. रैन्हार्ड सेल्टन, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९३०)
९. चो रामास्वामी, भारतीय तमिळ चित्रपट अभिनेते (१९३४)
१०. प्रभात कुमार, झारखंडचे राज्यपाल (१९४०)
११. यदुनाथ थत्ते, भारतीय लेखक (१९२२)
१२. नार बहादुर भंडारी, सिक्कीमचे मुख्यमंत्री (१९४०)
१३. शंकरसिंग रघुवंशी, भारतीय संगीतकार (१९२२)
१४. व्ही. वैथीलिंगम, पुदुचेरीचे मुख्यमंत्री (१९५०)
१५. एदुआर्दो दुहल्डे, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१९४१)
१६. इमरान खान, पाकिस्तानचे पंतप्रधान, क्रिकेटपटू (१९५२)
१७. विश्वास नांगरे पाटील, भारतीय पोलिस अधिकारी (१९७३)
१८. बाजी रौत, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, वयाच्या १२व्या वर्षी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले (१९२६)
१९. केट विन्सलेट, ब्रिटिश अभिनेत्री (१९७५)


मृत्यू

१. रामनाथ गोएंका, इंडीयन एक्स्प्रेसचे संस्थापक (१९९१)
२. स्टीव्ह जॉब्स, ऍपल कंपनीचे संस्थापक (२०११)
३. अब्दुल सत्तार, भारतीय राजकीय नेते (१९८५)
४. लार्स ओंसगेर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९७६)
५. माईकल कोवेक, स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष (२०१६)
६. प्रभू लाल भटनागर, भारतीय गणितज्ञ (१९७६)
७. अप्पासाहेब पंत, भारतीय मुत्सद्दी , पद्मश्री पुरस्कार विजेते (१९९२)
८. भगवतीचरण वर्मा, पद्मभूषण पुरस्कार विजेते लेखक (१९८१)
९. सॅम वॉर्नर, वॉर्नर ब्रदर्सच सहसंस्थापक (१९२७)
१०. बार्बरा निकोलस, अमेरिकन अभिनेत्री (१९७६)

घटना

१. मिरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या. (१९८९)
२. भारतातील कोलकाता शहरात आलेल्या चक्रीवादळात ६०,०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१८६४)
३. इटलीच्या सैन्याने ट्रिपोलीवर ताबा मिळवला. (१९११)
४. पोर्तुगाल हा प्रजासत्ताक देश बनला. (१९१०)
५. हर्णान झुआझो हे बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९८२)
६. ब्राझीलने संविधान स्वीकारले. (१९८८)
७. राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराने गौरविण्यात आले. (१९९८)

महत्व

१. World Teachers Day
२. International Day Of No Prostitution

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...