मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ३ ऑक्टोबर || Dinvishesh 3 October ||



जन्म

१. जे. पी. दत्ता, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९४९)
२. जेम्स बुकॅनन, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९१९)
३. गजेंद्र सिंघ शेखावत, भारतीय राजकीय नेते (१९६७)
४. जॉर्ज बॅन्क्राॅफ्ट ,अमेरिकन इतिहासकार (१८००)
५. कार्ल ऑस्सीट्झ्की, नोबेल शांतता पुरस्कार विजेते पत्रकार (१८८९)
६. थॉमस वोल्फे, अमेरिकन लेखक (१९००)
७. आशिष शेलार, भारतीय राजकीय नेते (१९७२)
८. रंगराज सुब्बियाह तथा सत्यराज , भारतीय चित्रपट अभिनेते (१९५४)
९. मंसुखलाल झवेरी, भारतीय गुजराती लेखक, कवी (१९०७)
१०. आर्तुरो सिल्वा, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९०२)
११. चार्ल्स जे. पीडर्सेन, नोबेल पारितोषिक विजेते जीवरसायन शास्त्रज्ञ (१९०४)
१२. नरहर पोहनेरकर, भारतीय लेखक ,कवी (१९०७)


मृत्यू

१. कादंबिनी गांगुली, भारतीय डॉक्टर (१९२३)
२. इलियास हॉवे, अमेरिकन संशोधक , शिवण मशीनचे संशोधक (१८६७)
३. जोगिंदर राव, भारतीय क्रिकेटपटू (१९९४)
४. ऑर्सन प्रॅट, अमेरिकन गणितज्ञ (१८८१)
५. गुस्ताव स्त्रेसेमांन, नोबेल शांतता पुरस्कार विजेते राजकीय नेते, जर्मनीचे पंतप्रधान (१९२९)
६. केदारनाथ सहानी, सिक्कीमचे राज्यपाल (२०१२)
७. अकिओ मोरिटा, सोनी कॉर्पोरेशनचे संस्थापक (१९९९)
८. दत्तू बांदेकर, भारतीय लेखक , स्तंभलेखक (१९५९)
९. गाॅय मॉलेट,  फ्रान्सचे पंतप्रधान (१९७५)
१०. एम. एन. विजयान, भारतीय लेखक (२००७)


घटना

१. इराकला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९३२)
२. जे. एस. थुर्मन यांनी कारमधील व्हॅक्यूम क्लिनरचे पेटंट केले. (१८९९)
३. जनिओ क्वेड्रोस हे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९६०)
४. हैती या देशात आलेल्या चक्रीवादळात ५०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर १००००० हून अधिक लोक जखमी झाले. (१९६३)
५. आर्तुरो दा सिल्वा हे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९६६)
६. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. (१९७७)
७. युनायटेड किंग्डमने अण्वस्त्र चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. जगातील ३रा देश परमाणू ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनला. (१९५२)
८. २०१० कॉमनवेल्थ गेम्सला भारतामध्ये दिल्ली येथे सुरुवात झाली. (२०१०)


महत्व

१. World Temperance Day
२. Global Smoothie Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...