मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २९ ऑक्टोबर || Dinvishesh 29 October ||




जन्म

१. क्रिती खरबंदा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८८)
२. माणिकराव गावित, भारतीय राजकीय नेते (१९३४)
३. बारुज बेनेसररफ, नोबेल पारितोषिक विजेते रोगप्रतिकारकशास्त्रज्ञ (१९२०)
४. विजेंदर सिंग, भारतीय बॉक्सर (१९८५)
५. कार्ल डजेरासी, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ (१९२३)
६. एल्लेन जॉन्सन सिरलीफ, लायबेरियाच्या राष्ट्राध्यक्ष (१९३८)
७. प्रभाकर तामणे, भारतीय साहित्यिक ,पटकथालेखक (१९३१)
८. जयी राजगुरू, भारतीय स्वातंत्र्यसैनिक (१७३९)
९. अब्दुल्ला गुल, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष (१९५०)
१०. जॉन मगुफुल्ली, टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष (१९५९)
११. रीमा सेन, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८१)


मृत्यू

१. दादा साळवी,भारतीय चित्रपट अभिनेते (१९८१)
२. के. पी. उम्मर, भारतीय चित्रपट अभिनेते (२००१)
३. विल्यम हरणेट्ट, अमेरिकन चित्रकार (१८९२)
४. पॉल पैनेलेव, फ्रान्सचे पंतप्रधान (१९३३)
५. अल्बर्ट कलमेट, फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (१९३३)
६. मारिओ स्केल्बा, इटलीचे पंतप्रधान (१९९१)
७. दत्ता माने, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९८०)
८. पीटर ट्वीन, इंग्लिश गणितज्ञ (२००४)
९. पेण सोवान, कंबोडियाचे पंतप्रधान (२०१६)
१०. कमलादेवी चट्टोपाध्याय, भारतीय समाजसुधारक (१९८८)

घटना

१. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार प्रदान केला. (१९५८)
२. टांगानिका झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश तयार झाला. (१९६४)
३. महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना करण्यात आली. (१८९४)
४. स्पेनने मोरोक्को विरुद्ध युद्ध पुकारले. (१८५९)
५. अरिस्टड ब्रियांड हे फ्रान्सचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९१५)
६. गेतुलिओ वर्गास यांनी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. (१९४५)
७. बोरिस पस्टरणक यांनी साहित्यासाठी दिला जाणारा नोबेल पारितोषिक पुरस्कार सोविएत सरकारने त्यांच्यावर पुरस्कार नाकारण्यास केलेल्या दबावामुळे पुरस्कार घेतला नाही. (१९५८)
८. संयुक्त अरब प्रजासत्ताक मधून सीरिया हा देश बाहेर पडला. (१९६१)
९. दिल्ली मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ६०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२००५)
१०. भारतामध्ये ओडिशा राज्यात आलेल्या चक्रीवादळात ९०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर कित्येक लोक बेघर झाले. (१९९९)
११. चीनने आपले एक मूल धोरण रद्द केले. (२०१५)

महत्व

१. World Stroke Day
२. World Lemur Day
३. World Psoriasis Day
४. International Internet Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...