मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २८ ऑक्टोबर || Dinvishesh 28 October ||




जन्म

१. अशोक चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (१९५८)
२. केशव कानेटकर, भारतीय कवी ,लेखक (१८९३)
३. अरॅस्मस, डच धर्मशास्त्रज्ञ (१४६६)
४. कमला हम्पाना, भारतीय कन्नड लेखिका (१९३५)
५. रिचर्ड लॉरेन्स मिलिंगटन ,नोबेल पारितोषिक विजेते जीवरसायनशास्त्रज्ञ (१९१४)
६. स्वामी विजयानंदा, भारतीय धर्मगुरु (१८६८)
७. अदिती राव हैद्री, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६)
८. बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक (१९५५)
९. भगिनी निवेदिता, स्वामी विवेकानंदांच्या शिष्या (१८६७)
१०. ज्युलिया रॉबर्ट्स, हॉलिवूड चित्रपट अभिनेत्री (१९६७)

मृत्यू

१. अनांदा शंकर रे, भारतीय कवी, लेखक (२००२)
२. एरलींग पर्स्सन, एच अँड एमचे संस्थापक (२००२)
३. मॅक्स मुल्लर, जर्मन विचारवंत (१९००)
४. जॉन वॉलिस, इंग्लिश गणितज्ञ (१७०३)
५. एडवर्ड बचेट, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ (१९१८)
६. बिली हुजेस, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९५२)
७. टेड हुघेस, ब्रिटिश कवी ,लेखक (१९९८)
८. घुलाम अहमद, भारतीय क्रिकेटपटू (१९९८)
९. रिचर्ड स्मॉले , नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (२००५)
१०. तडेऊस्स मझोविकी, पोलंडचे पंतप्रधान (२०१३)


घटना

१. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरू झाले. (१९६९)
२. पनामा आणि उरुग्वे यांच्यात राजनैतिक संबंध सुरू झाले. (१९०४)
३. इटलीने ग्रीसवर सैन्य हल्ला केला. (१९४०)
४. मिंग साम्राज्याची राजधानी बिजींगला घोषित करण्यात आले. (१४२०)
५. एली व्हिटनी यांनी कापूस पिंजन्याच्या मशीनचे पेटंट केले. (१७९३)
६. इस्राईलने नव्या राष्ट्र ध्वजाचा स्वीकार केला. (१९४८)
७. जॉर्जस बिदौल्ट हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९४९)
८. बगदाद येथे झालेल्या बॉम्ब स्फोटात १५लोक मृत्यूमुखी पडले. (२०१२)


महत्व

१. International Animation Day
२. Wild Foods Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...