मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २५ ऑक्टोबर || Dinvishesh 25 October ||




जन्म

१. शेहजाद खान, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६६)
२. विल्यम ग्रेंविल्ले, ब्रिटिश पंतप्रधान (१७५९)
३. नवनीत निशाण, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६५)
४. पाब्लो पिकासो, स्पॅनिश चित्रकार (१८८१)
५. मोहम्मद रेझा पहलावी, इराणचा राजा (१९१९)
६. बिभुती पटनाईक, भारतीय लेखक (१९३७)
७. मदुराई मनी अय्यर, भारतीय शास्त्रीय गायक (१९१२)
८. मृदुला गर्ग, भारतीय लेखिका (१९३८)
९. कृतीका काम्रा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८८)
१०. जोर्गे इबानेज, उरुग्वेचे राष्ट्राध्यक्ष (१९२७)
११. अपर्णा सेन, भारतीय चित्रपट अभिनेत्री, दिग्दर्शिका, पटकथा लेखिका (१९४५)
१२. उमेश यादव, भारतीय क्रिकेटपटू (१९८७)
१३. दाराशॉ वाडिया, भारतीय भूवैज्ञानिक (१८८३)
१४. कॆटी पेरी, अमेरिकन पॉप सिंगर (१९८४)


मृत्यू

१. जसपाल भट्टी, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (२०१२)
२. पांडुरंगशास्त्री आठवले, स्वाध्याय परिवाराचे संस्थापक, तत्ववेत्ते (२००३)
३. फिलीप्पे पिनेल, फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (१८२६)
४. फ्रँक पुग्लिया, इटालियन अभिनेता (१९७५)
५. बापूराव पलुस्कर, भारतीय शास्त्रीय गायक (१९५५)
६. चित्तरंजन कोल्हटकर, भारतीय चित्रपट अभिनेते (२००९)
७. सालुरी राजेश्वर राव, भारतीय संगीतकार , गायक (१९९९)
८. साहिर लुधियानवी, भारतीय कवी , गीतकार (१९८०)
९. हेमू अधिकारी ,भारतीय क्रिकेटपटू (२००३)
१०. मोहन राघवन, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२०११)
११. निर्मल वर्मा, भारतीय लेखक (२००५)


घटना

१. ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. (१९९४)
२. जॉर्ज तिसरा हा ब्रिटनचा राजा झाला. (१७६०)
३. टोरांटो स्टॉक एक्सचेंजची स्थापना करण्यात आली. (१८६१)
४. बेनिटो मुसोलिनी याने पुढच्या ३० वर्षांसाठी इटलीचा हुकूमशहा राहणार असल्याचे घोषित केले. (१९३२)
५. जपान सैन्याने हांकाऊ आणि वुहान शहर काबीज केले. (१९३८)
६. पहिले इलेक्ट्रॉनिक व्रिस्ट वॉच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले. (१९६०)
७. युगांडाचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९६२)


महत्व

१. World Pizza Makers Day
२. World Pasta Day
३. International Artist Day
४. MDS World Awareness Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...