मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २४ ऑक्टोबर || Dinvishesh 24 October ||




जन्म

१. कॅप्टन लक्ष्मी सेहगल, भारतीय सैन्य अधिकारी, आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन (११४)
२. अनुराग ठाकूर, भारतीय केंद्रीय मंत्री , राजकीय नेते (१९७४)
३. मल्लिका शेरावत, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७६)
४. बहादूर शहा जफर, मुघल सम्राट (१७७५)
५. रॉबर्ट मुंदेल्ल, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९३२)
६. सिसिर कुमार मित्रा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१८९०)
७. विल्यम डोबेल्ले, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रियाशास्त्रज्ञ (१९४१)
८. हिमानी शिवपुरी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६०)
९. विभूद्धभाषण मुखोपाध्याय, भारतीय लेखक ,कवी (१८९४)
१०. माल्कम तूर्नबुल, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९५४)
११. ऑब्रे ड्रेक ग्रॅहम, कॅनाडाचे अभिनेते ,गायक , रॅपर (१९८६)
१२. मार्क टुली, भारतीय पत्रकार (१९३५)
१३. आर. के. लक्ष्मण, भारतीय व्यंगचित्रकार (१९२१)
१४. माई भालजी पेंढारकर, भारतीय मराठी ,हिंदी चित्रपट अभिनेत्री (१९१०)


मृत्यू

१. मन्ना डे, भारतीय गायक (२०१३)
२. टायको ब्राह, डॅनिश खगोलशास्त्रज्ञ (१६०१)
३. इस्मात चुघताई, भारतीय लेखिका (१९९१)
४. पिअरे वेईस फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१९४०)
५. विडकुन क्विस्लिंग, नॉर्वेचे पंतप्रधान (१९४५)
६. एस. एस. राजेंद्रन, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते (२०१४)
७. माधवराव साने, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष (१९९५)
८. लुई रेनॉल्ट, रेनॉल्ट कंपनीचे संस्थापक (१९४४)
९. जॉर्ज कॅडबरी, कॅडबरीचे संस्थापक (१९२२)
१०. एमिले जोनासैंत, हैतीचे राष्ट्राध्यक्ष (१९९५)


घटना

१. संयुक्त राष्ट्रसंघाची (United Nations) स्थापना करण्यात आली. (१९४५)
२. भारतात पहिल्यांदाच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू करण्यात आला. (१९८४)
३. ब्रिटिश सरकारने सोविएत युनियन सोबत व्यापारी करार केला. (१९३२)
४. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसरा उत्सव साजरा केला. (१९०९)
५. युनायटेड नेशन्सने आपले पहिले टपाल तिकीट प्रकाशित केले. (१९५१)
६. युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयाचे काम सुरू झाले. (१९४९)
७. शेफिल्ड एफ. सी. हा सर्वात जुना फुटबॉल क्लब शेफिल्ड, इंग्लंड येथे सुरू झाला. (१८५७)
८. युरेनस ग्रहाच्या अब्रियाल व अरियेल चंद्राचा शोध विल्यम लसेल यांनी लावला. (१८५१)
९. सोविएत युनियनने हंगेरी ताब्यात घेतले आणि इम्रे नॅगी यांना हंगेरीचे पंतप्रधान केले. (१९५६)
१०. थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केंद्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. (२०००)

महत्व

१. World Tripe Day
२. World Polio Day
३. World Development Information Day
४. United Nations Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...