मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २० ऑक्टोबर || Dinvishesh 20 October ||




जन्म

१. नवजोत सिंघ सिद्धू, भारतीय क्रिकेटपटू , राजकीय नेते (१९६३)
२. व्ही. एस. अच्यूतानंदन, केरळचे मुख्यमंत्री (१९२३)
३. हेन्री जॉन टेम्पल, ब्रिटिश पंतप्रधान (१७८४)
४. श्याम कुमारी खान, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९०४)
५. किरण कुमार, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९५४)
६. वीरेंद्र सेहवाग, भारतीय क्रिकेटपटू (१९७८)
७. जेम्स चॅडविक, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८९१)
८. जोमो केन्याटा, केनियाचे राष्ट्राध्यक्ष (१८९३)
९. गोवर्धनाराम त्रिपाठी, भारतीय गुजराती लेखक , साहित्यिक (१८५५)
१०. डॅनी बॉयले, हॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक (१९५६)
११. कमला हॅरिस, भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उप-राष्ट्राध्यक्ष (१९६४)
१२. जयंत पाठक, भारतीय गुजराती लेखक, कवी (१९२०)
१३. केल्विन ब्रॉड्स, स्नूप डॉग, कॅलिफोर्निया गायक , रॅपर (१९७१)
१४. गुंटूर संशेंदर शर्मा, भारतीय कवी (१९२७)

मृत्यू

१. सी. व्ही. श्रीधर, भारतीय पटकथा लेखक (२००८)
२. व्ही. एस. गुहा, भारतीय मानववंशशास्त्रज्ञ (१९६१)
३. पार्थसारथी शर्मा ,भारतीय क्रिकेटपटू (२०१०)
४. बाबा कदम, भारतीय लेखक (२००९)
५. बंडोपंत गोखले, भारतीय पत्रकार , युद्धशास्त्र अभ्यासक (१९९६)
६. हर्बर्ट हूवर, अमेरिकेचे  राष्ट्राध्यक्ष (१९६४)
७. योशिदा शिगेरु , जपानचे पंतप्रधान (१९६७)
८. पॉल डिरॅक, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९८४)
९. जेन वॅट, अमेरिकन अभिनेत्री (२००६)
१०. फारूख लेघारि, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (२०१०)
११. कृष्णाजी गणेश फुलंब्रिकर, भारतीय गायक ,अभिनेते (१९६४)
१२. मुअम्मर गद्दाफी, लिबियाचा हुकूमशहा (२०११)


घटना

१. नॅशनल ट्रांसिशनल कौन्सिलच्या सैन्याने लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी याला ठार केले. (२०११)
२. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना अकोला येथे करण्यात आली. (१९६९)
३. चीनने भारतावर आक्रमण केल्यामुळे भारत चीन युद्धास सुरुवात झाली. (१९६२)
४. केनियामध्ये आपातकालीन संकटाची घोषणा करण्यात आली. (१९५२)
५. नेपाळमध्ये मंदीच्या विळख्यात स्टॉक मार्केट कोसळले. (१९७१)
६. जूनियस रिचर्ड जयेवरदने हे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आले. (१९८२)
७. उत्तरकाशी मध्ये आलेल्या तीव्र भूकंपात १०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९१)
८. इराकमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ३०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
९. जोको विडोडो हे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (२०१४)


महत्व

१. International Chef's Day
२. World Osteoporosis Day 
३. The International Day Of The Air Traffic Controller

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...