मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २ ऑक्टोबर || Dinvishesh 2 October ||




जन्म

१. लालबहादूर शास्त्री, भारताचे २रे पंतप्रधान (१९०४)
२. मोहनदास करमचंद गांधी तथा महात्मा गांधी, भारताचे स्वातंत्र्य सेनानी (१८६९)
३. के के मेनन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६६)
४. जॉन काप्पेयेन वान दे कॉपेलो, नेदरलँड्सचे पंतप्रधान (१८२२)
५. आशा पारेख, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४२)
६. पंडित दिनकर कैकिणी, भारतीय शास्त्रीय गायक (१९२७)
७. चार्ल्स फ्लोक्वेट, फ्रान्सचे पंतप्रधान (१८२८)
८. लीला रॉय, भारतीय स्वातंत्र्य सेनानी , राजकीय नेत्या (१९००)
९. रोहित रॉय, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९६८)
१०. पॉल वाॅन हिंडेनबर्ग, जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष (१८४७)
११. अलेक्झांडर टॉड, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९०७)
१२. कॉर्डेल हुल्ल, नोबेल शांतता पुरस्कार विजेते अमेरिकन राजकीय नेते (१८७१)
१३. विनायक पांडुरंग करमरकर, पद्मश्री पुरस्कार विजेते शिल्पकार (१८९१)
१४. पर्सिस खंबाटा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४८)
१५. स्वामी अभेदानंदा, भारतीय धर्मगुरू, रामकृष्ण वेदांता मठाचे संस्थापक (१८६६)
१६. तपन सिन्हा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९२४)
१७. जॉन बी. गुर्डोन, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रियाशास्त्रज्ञ (१९३३)
१८. कौशल इनामदार, भारतीय गायक संगीतकार (१९७१)
१९. प्रवीण कुमार, भारतीय क्रिकेटपटू (१९८६)
२०. हिना खान, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८७)


मृत्यु

१. राजा रवी वर्मा, सुप्रसिद्ध भारतीय चित्रकार (१९०६)
२. बोरिस बुक्रीव, रशियन गणितज्ञ (१९६२)
३. के. कामराज, तामिळनाडूचे मुख्यमंत्री (१९७५)
४. रॉक हडसन, अमेरीकन अभिनेते (१९८५)
५. पीटर मेडवर, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रियाशास्त्रज्ञ (१९८७)
६. मुक्तनंदा, भारतीय योग गुरू (१९८२)
७. स्वांते अर्हेनिअस, स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ (१९२७)
८. तमारा डॉब्सन, अमेरिकन अभिनेत्री (२००६)
९. जमाल खाशॉगी, सऊदी अरेबियाचे लेखक (२०१८)
१०. ख्रिस्तोफर डेरिक, ब्रिटिश लेखक (२००७)

घटना

१. महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दी निमित्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांची प्रतिमा असलेल्या २, ५ ,१० ,१००च्या नोटा चलनात आणल्या. (१९६९)
२. गिनी देशाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले. (१९५८)
३. रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली. (१९०९)
४. ब्रिटिश सरकारने काॅन्टॅश्टीनोपाल मधून सैन्य माघे घेतले. (१९२३)
५. अली चामेनेई हे इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९८१)
६. इराणमधील तेहरांमध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्यात ६०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर ५००हून अधिक लोक जखमी झाले. (१९८२)
७. इतामार फ्रँको हे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९९२)
८. जॉन लोगी बे यांनी पहिल्यांदाच दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले. (१९२५)


महत्व

१. World No Alcohol Day
२. World Farm Animals Day
३. International Day Of Non-violence

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...