मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १९ ऑक्टोबर || Dinvishesh 19 October ||




जन्म

१. शांताराम नांदगावकर, भारतीय गीतकार (१९३६)
२. प्रिया तेंडुलकर, भारतीय मराठी चित्रपट अभिनेत्री (१९५४)
३. सनी देओल, भारतीय चित्रपट अभिनेते,राजकीय नेते (१९५६)
४. मॅग्वेल अंनगेल अस्टरियस, नोबेल पारितोषिक विजेते लेखक, साहित्यिक (१८९९)
५. पांडुरंग शास्त्री आठवले, भारतीय विचारवंत, तत्वज्ञ (१९२०)
६. मातांगिणी हजरा, भारतीय क्रांतिकारी (१८७०)
७. निर्मला देशपांडे, भारतीय राजकीय नेत्या (१९२९)
८. डॉ. वामन वर्तक, भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ (१९२५)
९. सुब्रमण्यम चंद्रशेखर, नोबेल पारितोषिक विजेते गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ (१९१०)
१०. रायचंद बोराल, भारतीय संगीतकार , गायक (१९०३)
११. चंद्राबती देवी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९०९)

मृत्यू

१. बेबी नाझ, भारतीय बाल कलाकार (१९९५)
२. समोरा मेहल, मोझांबिक देशाचे राष्ट्राध्यक्ष (१९८६)
३. अर्नेस्ट रूदरफोर्ड ,नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९३७)
४. जोनाथन स्विफ्ट, आयरिश लेखक (१७४५)
५. मुनावर्शो नज्रिजेव, ताझाकिस्तांचे राष्ट्राध्यक्ष (१९९४)
६. अलीजा इझेटबेगोविक, बॉस्निया - हर्झेगोविनाचे राष्ट्राध्यक्ष (२००३)
७. अब्बास वासी, मरीज , गुजराती कवी , गझलकार (१९८३)
८. के. राघवन, भारतीय संगीतकार (२०१३)
९. विश्वनाथ कार, भारतीय लेखक , समाजसुधारक (१९३४)
१०. मोहन सेगल, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२००५)

घटना

१. आशा भोसले यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. (२०००)
२. नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरून माघार घेतली. (१८९२)
३. रशिया आणि इटलीने बल्गेरिया विरुद्ध युद्ध पुकारले. (१९१५)
४. इटलीच्या सैन्याने सोमालियावर ताबा मिळवला. (१९२५)
५. जॉन गरॉड यांनी सेमी ऑटोमॅटिक रायफलचे पेटंट केले. (१९२६)
६. इथिओपियावर आक्रमण केल्या कारणामुळे राष्ट्रसंघाने इटलीवर आर्थिक निर्बंध घातले. (१९३५)
७. अमेरिकेने जर्मनी सोबतची युद्धजण्य स्थिती संपवली. (१९५१)


महत्व

१. World pediatric Bone And Joint Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...