मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १८ ऑक्टोबर || Dinvishesh 18 October ||



जन्म

१. स्वप्नील जोशी, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९७७)
२. विल्यम्सन संगमा, मेघालयचे मुख्यमंत्री (१९१९)
३. इब्राहिम अल्काझी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक (१९२५)
४. इवानोइ बॉनोमी, इटलीचे पंतप्रधान (१८७३)
५. ज्योथिका सरावणान, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री (१९७८)
६. सिडनी हॉलंड, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१८९३)
७. पीअर्रे तृदेउ, कॅनडाचे पंतप्रधान (१९१९)
८. ओम पुरी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५०)
९. अमोल कोल्हे, भारतीय मराठी चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते, राजकीय नेते (१९८०)
१०. नारायण दत्त तिवारी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री (१९२५)
११. कुणाल कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७७)


मृत्यू

१. नारायण दत्त तिवारी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री (२०१८)
२. विजय मांजरेकर, भारतीय क्रिकेटपटू (१९८३)
३. हिराबाई पेडणेकर, पहिल्या स्त्री नाटककार ,गायिका (१९५१)
४. हेन्री जॉन टेम्पल, ब्रिटिश पंतप्रधान (१८६५)
५. थॉमस अल्वा एडिसन, अमेरिकन संशोधक, वैज्ञानिक (१९३१)
६. विश्वनाथ सत्यनारायण, भारतीय कवी ,लेखक (१९७६)
७. मणुएल गोम्स, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९४१)
८. चार्ल्स स्ट्रीट, अमेरिकन संशोधक (१९५६)
९. वसंतराव तुळपुळे, भारतीय कम्युनिस्ट कार्यकर्ते (१९८७)
१०. लालमोहन घोष, काँग्रेसचे १६वें अध्यक्ष , स्वातंत्र्य सेनानी (१९०९)

घटना

१. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंगची स्थापना झाली. (१९२२)
२. थिआॅसाॅफिकल सोसायटीची स्थापना झाली. (१८७९)
३. चार्ल्स स्ट्रीट यांना ऑटोमॅटिक पॉपअप टोस्टरचे पेटंट मिळाले. (१९२१)
४. अंद्रीस पापांद्रेओ हे ग्रीसचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९८१)
५. बेनेझिर भुट्टो आठ वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये परतल्या, त्यावेळी आत्मघातकी बॉम्बने हल्ला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत १००हून अधिक पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यु झाला. (२००७)
६. २०६० - चिरॉन हा अंतरिक्षातील सर्वात लांबचा लघुग्रह शोधण्यात आला. (१९७७)
७. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना. (१९०६)
८. एक दिवसीय तसेच कसोटी सामन्यात वीस हजार धावा काढणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला. (२००२)

महत्व

१. World Menopause Day
२. International Necktie Day
३. Alaska Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...