मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १७ ऑक्टोबर || Dinvishesh 17 October ||




जन्म

१. अनिल कुंबळे, भारतीय क्रिकेटपटू (१९७०)
२. संजय कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६५)
३. स्मिता पाटील, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५५)
४. एस. सी. जमिर, महाराष्ट्राचे राज्यपाल (१९३१)
५. कार्ल हेनिझ, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (१९२६)
६. आर. के. शनमुखंम चेट्टी, भारतीय राजकीय नेते (१८९२)
७. ब्रिंदा खरात, भारतीय राजकीय नेत्या (१९४७)
८. सिमी गरेवाल, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४७)
९. एमिनेम, अमेरिकन रॅपर (१९७२)
१०. प्रणिता सुभाष, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९२)
११. तात्यासाहेब कोरे, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक (१९१७)
१२. नारायणराव बोरावके, साखर कारखानदार , उद्योगपती (१८९२)
१३. उषा चव्हाण, भारतीय मराठी चित्रपट अभिनेत्री (१९५५)
१४. कीर्ति सुरेश, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री (१९९२)
१५. सर सय्यद अहमद खान, भारतीय शिक्षणतज्ञ ,समाजसुधारक (१८१७)

मृत्यू

१. कन्नादासन, भारतीय लेखक ,कवी (१९८१)
२. दादोबा तर्खडकर, भारतीय ग्रंथकार , धर्मसुधारक (१८८२)
३. स्वामी रामतीर्थ, भारतीय कवी , तत्त्वज्ञानी (१९०६)
४. सरोजिनी वरादप्पण, भारतीय सामाजिक कार्यकर्त्या (२०१३)
५. विजय भट्ट, भारतीय चित्रपट निर्माता (१९९३)
६. संतिअगो रॅमन काज्ल, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रियाशास्त्रज्ञ (१९३४)
७. रवींद्र पिंगे, भारतीय लेखक (२००८)
८. गुस्ताव्ह किरचोफ, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८८७)
९. जोअन् हिक्सन, ब्रिटिश अभिनेत्री (१९९८)
१०. बिली विल्यम्स, अमेरिकन गायक (१९७२)

घटना

१. मदर तेरेसा यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. (१९७९)
२. अल्बर्ट आईन्स्टाईन नाझी जर्मन मधून पलायन करून अमेरिकेत आले. (१९३३)
३. थॉमस अल्वा एडिसन यांनी ऑप्टिकल फोनोग्राफचे पेटंट केले. (१८८८)
४. हेन्री बेसेमर यांनी स्टील बनवण्याच्या प्रक्रियेचे पेटंट केले. (१८५६)
५. बर्नहार्ड वाॅन बुलॉव हे जर्मनीचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९००)
६. मायकेल फॅरेडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला. (१८३१)
७. व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र अधिकृतपणे इंग्लंडमध्ये सुरू करण्यात आले. (१९५६)
८. बल्गेरिया , सर्बिया आणि ग्रीसने तुर्की विरूद्ध युद्ध पुकारले. (१९१२)
९. यीतहक रॉबिन हे इस्राएलचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९८६)
१०. बोटस्वाना आणि लेसोथो या देशांचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९६६)


महत्व

१. International Day For The Eradication Of Poverty
२. World Toy Camera Day
३.World Trauma Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...