मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १६ ऑक्टोबर || Dinvishesh 16 October ||




जन्म

१. हेमा मालिनी, भारतीय चित्रपट अभिनेत्री, भरतनाट्यम नृत्यांगना (१९४८)
२. कूरोडा कियोटाका, जपानचे पंतप्रधान (१८४०)
३. इस्माईल क्युमली, अल्बेनियाचे पंतप्रधान (१८४४)
४. शार्दुल ठाकूर, भारतीय क्रिकेटपटू (१९९१)
५. राजीव खंन्डेल्वाल ,भारतीय चित्रपट अभिनेते (१९७५)
६. डेव्हीड बेन- ग्युरोन, इस्राएलचे पंतप्रधान (१८८६)
७. गुंतर ग्रास, नोबेल पारितोषिक विजेते लेखक, साहित्यिक (१९२७)
८. रोहिताश गौड, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९६७)
९. वल्लथोल नारायणा मेनन, भारतीय कवी ,लेखक (१८७८)
१०. अदिती सारंगधर, भारतीय मराठी चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८१)
११. नवीन पटनाईक, ओडिशाचे मुख्यमंत्री (१९४६)


मृत्यू

१. लियाकत अली खान, पाकिस्तानचे पंतप्रधान (१९५१)
२. गुरुनाथ ओगले, भारतीय उद्योजक (१९४४)
३. विरपदिया कट्टाबोमन, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१७९९)
४. माधवराव जोशी, भारतीय नाटककार (१९४८)
५. हरीश चंद्रा, भारतीय गणितज्ञ (१९८३)
६. घुलाम भिक नैरांग, पाकिस्तानी कवी ,राजकीय नेते (१९५२)
७. शिरले बूथ, हॉलिवूड अभिनेत्री (१९९२)
८. बार्बरा बिलिंगले, अमेरिकन अभिनेत्री (२०१०)
९. चेंबाई वैद्यनाथा भगवातर, भारतीय गायक (१९७४)
१०. रॉस डेविडसन, ब्रिटिश अभिनेता (२००६)

घटना

१. पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली. (१९५१)
२. अलास्काने ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले. (१८६७)
३. भारताची फाळणी ब्रिटिश सत्तेत व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी केली आणि बंगाल प्रांताची फाळणी करून बेंगाल हा वेगळा प्रांत घोषित करण्यात आला, पुढे सहा वर्षांनंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. (१९०५)
४. ब्रिटनने बल्गेरिया विरुद्ध युद्ध पुकारले. (१९१५)
५. डिस्ने ब्रदर्स यांनी द वॉल्ट डिस्ने कार्टून स्टुडिओची स्थापना करण्यात केली.  (१९२३)
६. जॉन हरवूड यांनी सेल्फ विंडींग वॉचचे पेटंट केले. (१९२३)
७. मयनर्ड जॅक्सन हे अटलांटाचे नवे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९७३)
८. डॉ जॉन वॉरेन यांनी शस्त्रक्रिया करताना पहिल्यांदाच इथर या रसायनाचा वापर केला. (१८४६)

महत्व

१. International Repair Day
२. World Spine Day
३. World Food Day
४. World Anaesthesia Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...