मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १३ ऑक्टोबर || Dinvishesh 13 October ||




जन्म

१. शरद पोंक्षे, भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार, लेखक (१९६६)
२. भुलाभाई देसाई , भारतीय स्वातंत्र्य सेनानी ,वकील (१८७७)
३. कुमुदलाल  गांगुली तथा अशोक कुमार, भारतीय चित्रपट अभिनेते (१९११)
४. अर्णा बोंतेम्पस, अमेरिकन ,कवी ,लेखक (१९०२)
५. मार्गारेट थॅचर, ब्रिटिश पंतप्रधान (१९२५)
६. चित्ती बाबू , भारतीय वीणा वादक, संगीतकार (१९३६)
७. पूजा हेगडे, भारतीय चित्रपट अभिनेत्री , मॉडेल (१९९०)
८. नुसरत फतेह अली खान, पाकिस्तानी सुफी गायक (१९४८)
९. मोतिरू उदयम, भारतीय राजकीय नेते (१९२४)
१०. स्पृहा जोशी, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री, कवयत्री, लेखिका (१९८९)
११. मथाई मंजूरण, भारतीय स्वातंत्र्य सेनानी , राजकीय नेते (१९१२)
१२. कादंबरी कदम, भारतीय मराठी चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८८)


मृत्यू

१. किशोर कुमार, भारतीय गायक, संगीतकार, अभिनेते (१९८७)
२. भगिनी निवेदिता, स्वामी विवेकानंदांच्या शिष्या (१९११)
३. डॉ. जाल मिनोचर मेहता, भारतीय प्रसिद्ध डॉक्टर, कुष्ठरोगतज्ञ (२००१)
४. रझिया सुलतान, दिल्लीच्या पहिल्या महिला सुल्तान (१२४०)
५. निरुपा रॉय, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००४)
६. मनुएल कॅमाचो, मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष (१९५५)
७. पॉल म्युलर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९६५)
८. वॉल्टर हाऊसेर ब्राट्टेन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९८७)
९. नीचिरेन ,नीचीरेन बौद्ध पंथाचे संस्थापक (१२८२)
१०. प्रेमांकुर अटॉर्थी, भारतीय लेखक (१९६४)
११. बेत्राम ब्रॉकहाऊस, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (२००३)
१२. भुमिबोल आद्युलादेज, थायलंडचे राजा (२०१६)
१३. अमीर मीनाई, भारतीय कवी ,लेखक (१९००)

घटना

१. पुण्यातील पर्वती मंदिर दलित समाजासाठी खुले करण्यात आले. (१९२९)
२. फिजी देशाचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९७०)
३. अँगोरा हे शहर तुर्कीची राजधानी घोषित करण्यात आले. (१९२३)
४. होस्नी मुबारक हे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९८१)
५. चार्ल्स मेसियर यांनी व्हर्लपूल गॅलेक्सीचा शोध लावला. (१७७३)
६. फ्रान्सने नव्या संविधानाचा स्वीकार केला. (१९४६)
७. भारतातील मध्य प्रदेश मध्ये झालेल्या चेंगरा चेंगरित १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर ११०हून अधिक लोक जखमी झाले. (२०१३)

महत्व

१. World Thrombosis Day
२. International Suit Up Day
३. International Plain Language Day
४. International Day For Failure
५. International Day For Disaster Risk Reduction

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...