मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १२ ऑक्टोबर || Dinvishesh 12 October ||




जन्म

१. शांता शेळके, भारतीय मराठी कवयत्री, लेखिका (१९२२)
२. शिवराज पाटील, भारतीय राजकीय नेते (१९३५)
३. भुमिधर बर्मन, आसामचे मुख्यमंत्री (१९३१)
४. रामसे मॅकडोनाल्ड , ब्रिटिश पंतप्रधान (१८६६)
५. विजयराजे सिंधिया, ग्वाल्हेरच्या राजमाता, राजकीय नेत्या (१९१९)
६. शक्ती मोहन, भारतीय डान्सर, अभिनेत्री (१९८५)
७. दम्मिका रणतुंगा, श्रीलंकेचे क्रिकेटपटू (१९६२)
८. हुघ जॅकमन, ऑस्ट्रेलियन अभिनेता (१९६८)
९. मुहम्मद सालेह अकबर हायद्री, आसामचे राज्यपाल (१८९४)
१०. राजेंद्र शुक्ला, भारतीय गुजराती कवी ,लेखक (१९४२)
११. अशोक मांकड, भारतीय क्रिकेटपटू (१९४६)
१२. ऑगस्ट हॉच, ऑडी मोटर कंपनीचे संस्थापक (१८६८)
१३. कामिनी रॉय, भारतीय बंगाली कवयत्री , समाजसेविका (१८६४)
१४. पी. एस. रामकृष्ण राव, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९१८)


मृत्यू

१. सुखदेव सिंग कांग, भारतीय न्यायाधीश , राजकारणी (२०१२)
२. आल्फ्रेड केरे, ब्रिटिश लेखक (१९४८)
३. डेनिस रीतची, सी प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माता (२०११)
४. डॉ. राम मनोहर लोहिया, भारतीय राजकीय नेते (१९६७)
५. मुस्तफा झैदी, पाकिस्तानी उर्दू कवी, लेखक (१९७०)
६. जे वॉर्ड, अमेरिकन व्यंगचित्रकार (१९८९)
७. जॉन डेनवर, अमेरिकन गायक , संगीतकार (१९९७)
८. दिनाह क्राईंक, इंग्लिश लेखक (१८८७)
९. मॅक्स अटलिंगर, जर्मन तत्त्वेत्ते ,लेखक (१९२९)
१०. सेलिया लवस्की, अमेरिकन अभिनेत्री (१९७९)

घटना

१. भारतात ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राइब्स ॲक्ट या कायद्याद्वारे १६१ जाती व जमातीना गुन्हेगारी जमाती ठरवण्यात आले. (१८७१)
२. ब्रिटिश आणि फ्रेन्च सैन्याने बिजिंगवर ताबा मिळवला. (१८६०)
३. स्कॉटलंडचे चार्ल्स मंकिंटाॅश यांनी पहिला रेनकोट विकला. (१८२३)
४. अमेरिकेने पहिले महिला वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले. (१८५०)
५. ब्रिटिश सैन्याने अफगाणिस्तान मधील काबूलवर ताबा मिळवला. (१८७९)
६. भारतीय वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ सुरींदर के. वसल यांना सहस्त्रक जागतिक अन्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. (२०००)
७. इवो मोरालेस हे बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (२०१४)
८. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुजवेल्ट यांनी कार्यकारी इमारतीला व्हाइट हाऊस हे नाव दिले. (१९०१)

महत्व

१. World Arthritis Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...