मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ९ सप्टेंबर || Dinvishesh 9 September ||




जन्म

१. श्रीधर फडके, भारतीय संगीतकार (१९५०)
२. लीला चिटणीस, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९०९)
३. लिओ टॉलस्टॉय, रशियन लेखक , कादंबरीकार (१८२८)
४. विक्रम बत्रा, परमवीर चक्र सम्मानित भारतीय सैन्य अधिकारी (१९७४)
५. सर्गिओ ऑस्मेना, फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष (१८७८)
६. सुहास बिस्वास, भारताचे पहिले अशोकचक्र पुरस्काराने सन्मानित एअरफोर्स अधिकारी (१९२४)
७. कल्की कृष्णमूर्ति, भारतीय लेखक ,पत्रकार ,कवी (१८९९)
८. जॉन गोर्टन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९११)
९. डॅनिएल गाजडुसेक, नोबेल पारितोषिक विजेते शरीरशास्त्रज्ञ (१९२३)
१०. ऍडम सॅन्डलर, हॉलिवूड चित्रपट अभिनेते (१९५६)
११. नवलमल फिरोदिया, भारतीय उद्योगपती (१९१०)
१२. भारतेंदू हरिश्चंद्र, भारतीय हिंदी लेखक ,साहित्यिक (१८५०)
१३. जोगेंद्रनाथ हजारिका, आसामचे मुख्यमंत्री (१९२४)
१४. कोटचेरलकोटा राव, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१८९८)
१५. अक्षय कुमार, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६७)


मृत्यू

१. पुरुषोत्तम दारव्हेकर, भारतीय नाटककार, लेखक (१९९९)
२. अहमदशाह मसूद, अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष (२००१)
३. शिरीष कुमार, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९४२)
४. सत्यभामाबाई पंढरपूरकर, महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी (१९९४)
५. वसंत नीलकंठ गुप्ते, भारतीय समाजवादी कामगार नेते, लेखक (२०१०)
६. पी. एन. मेनन, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२००८)
७. पॉल फ्लोरी, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९८५)
८. एडविन मॅकमिलन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९९१)
९. वर्गीस कुरियन, अमुल कंपनीचे संस्थापक (२०१२)
१०. जॅक एल. वॉर्नर , वॉर्नर ब्रदर्सचे सहसंस्थापक (१९७८)
११. एडवर्ड टेलर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ (२००३)
१२. बिपिन गुप्ता, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८१)

घटना

१. कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१वे राज्य बनले. (१८५०)
२. ताजिकिस्तान सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र देश झाला. (१९९१)
३. भारताने स्पेस एजन्सीद्वारा २१ पीएसएलव्ही  यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले. (२०१२)
४. इंग्लिश खगोलशास्त्रज्ञ ,संशोधक जॉन हर्श्चेल यांनी पहिल्यांदा ग्लास प्लेट छायाचित्र घेतले. (१८३९)
५. लक्संबर्गला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१८६७)
६. ईस्टर आयलंडला चीलिने आपल्यात सामील करून घेतले. (१८८८)
७. ऑस्ट्रेलियामध्ये जकार्ताच्या दूतावासासमोर झालेल्या बॉम्ब स्फोटात १० लोक मृत्यूमुखी पडले. (२००४)
८. चीन आणि जपानमध्ये झालेल्या युद्धात जपानने चीनसमोर शरणागती पत्करली. (१९४५)


महत्व

१. International Sudoku Day
२. International Buy A Priest A Beer Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...