मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ७ सप्टेंबर || Dinvishesh 7 September ||






जन्म

१. उमाजी नाईक, भारतीय आद्य क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी (१७९१)
२. हेन्री कॅम्पबेल बॅनर्मन, ब्रिटिश पंतप्रधान (१८३६)
३. भानुमती रामकृष्ण, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९२५)
४. सुनील गंगोपाध्याय, भारतीय बंगाली कवी ,लेखक (१९३४)
५. राधिका आपटे, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८७)
६. बी. आर. इशारा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक (१९३४)
७. बिरेंदर सिंघ धनोआ, चीफ मार्शल इंडियन एअर फोर्स (१९५७)
८. जॉन कॉर्नफोर्थ, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९१७)
९. कुमारी राधा, भारतीय कवयत्री (१९३६)
१०. सचिन पायलट, भारतीय राजकीय नेते (१९७७)
११. ज्वाला गुट्टा, भारतीय बॅडमिंटन खेळाडू (१९८३)
१२. ओमार करामी, लेबनॉनचे पंतप्रधान (१९३४)
१३. भाऊ दाजी लाड, भारतीय समाजसेवक (१८२२)
१४. अब्दूरहमान वाहिद, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष (१९४०)
१५. मीना खडिकर, भारतीय गायिका (१९३१)
१६. खलिफा बिन झायेद अल नाह्यान, UAE चे राष्ट्राध्यक्ष (१९४८)
१७. चंद्रकांत खोत, भारतीय लेखक, संपादक (१९४०)

मृत्यू

१. मुकुल आनंद, भारतीय चित्रपट निर्माते दिग्दर्शक (१९९७)
२. भगवान रघुनाथ कुळकर्णी ,भारतीय मराठी लेखक कवी साहित्यिक (१९५३)
३. अश्फाक अहमद, भारतीय लेखक (२००४)
४. रेने विवियनी, फ्रान्सचे पंतप्रधान (१९२५)
५. टी. एन. श्रीकांतेह, भारतीय कवी लेखक (१९६६)
६. विल्हेल्म पियेक, जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष (१९६०)
७. रवी नारायण रेड्डी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक (१९९१)
८. जे. जी. नवले, भारतीय क्रिकेटपटू (१९७९)
९. पीटर गीब्रांडी, नेदरलँडचे पंतप्रधान (१९६१)
१०. पी. एल. संतोषी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७८)

घटना

१. ब्राझीलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले. (१८२२)
२. दुसऱ्या गोलमेज परिषदेला सुरुवात झाली. (१९३१)
३. मधुमेह नियंत्रित करणारे इन्सुलिन पहिल्यांदाच  जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात आले. (१९७८)
४. इथिओपियाने सोमालिया सोबत राजकीय संबंध तोडले.  (१९७७)
५. इजिप्तमध्ये पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या. (२००५)
६. बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. भारतातील पहिली स्वदेशी व्यापारी बँक. (१९०६)
७. चीनमध्ये आलेल्या भूकंपात ६०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर ५००हून अधिक लोक जखमी झाले. (२०१२)


महत्व

१. Superhuman Day
२. Google Commemoration Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...